STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

खेळ न्यारा

खेळ न्यारा

1 min
195

इश्काचा वाहू लागला वारा 

प्रितीचा हा खेळ आहे न्यारा....


साधा भोळा तुझा रुबाब 

ओठांवर खुले जसा गुलाब 

लाजता रंग ही दिसे प्यारा....


नाकात तुझ्या गोड खडा 

पाहता तुला होई जीव वेडा 

तुझ्याच प्रेमाचा लावतो नारा....


बदकासारखी तू चाले 

हळूच लाजून तू काय बोले 

आठवणीत तुझ्या दिन सारा....


मला का दुराव्याची सजा 

राणी प्रेम करू नको वजा 

माझे अश्रुही होतील गारा.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance