Achut More

Tragedy

2.5  

Achut More

Tragedy

वरूण - वायू देवांचा संवाद

वरूण - वायू देवांचा संवाद

7 mins
1.5K


आकाशात विहार करतांना वायू आणि वरूण देवाची भेट घडली. देव लोकांतील कुशल मंगल विचारून झाले. दोघांचाही इंद्र दरबारी जाण्याचा बेत होता. वायू देवाच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. परंतु वरूण देव मात्र नाराजीचा सूर आळवत होते. त्यांच्या नाराजीचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी वायू देवाने त्यांना इंद्र दरबारी येण्याचे निमंत्रण दिले. बऱ्याच दिवसां पासून त्यांनीही रंभा,उर्वशीच्या नृत्याची बंदीश बघितली नव्हती. क्षणार्धात दोघेही अंतर्धान पावले.अन्‌ गतंव्यस्थळी पोहोचले. अप्सरांच्या नृत्य सौंदर्याचे नयनसुख घेऊन परत येतांना वायू देवाने वरूण देवाला नाराजीविषयी विचारले. मार्गस्थ होत असतांना दोघांच्याही कानी पृथ्वी वासियांचे आक्रंदन पडले. त्याचबरोबर पृथ्वीतलावरील यज्ञ यागाने निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणाने देव सुखावले. वायू देवाने पृथ्वीतलावरील दुष्काळी परिस्थितीची काळजी वाहत वरूण देवाला विचारणा केली, "देवा तुम्ही मानवांवर असे कृध्द का झालात? तुमच्या रागावण्याचा नेमकं कारण समजेल का ? तुम्ही असे भेदभाव केल्यासारखे का वागताय ? कुठे कृपादृष्टी तर कुठे वक्रदृष्टीमुळे मानव वैतागला आहे. तुम्ही लोकांचा अंत का पाहता?'त्यावर वरूण राजा उत्तरला हे वायू देवता तुम्ही सर्वत्र असूनही तुम्ही लोकांना दिसत नाहीत. पृथ्वीवरच्या लोकांना कशाचीही कमी नाही माझ्या विना ते जगू शकतात. परंतु त्यांना खरी गरज तुमचीच आहे. वायूदेवता आश्चर्यचकीत झाले आणि म्हणाले ते कसं काय हे वायूदेवता पृथ्वीवरच्या लोकांना पाणी मिळाले नाही, तर ते कोका कोला पिऊन तहान भागवू शकतात. नारळ पाणी पिऊन तहान भागवू शकतात आणि आता तर पाणी फिल्टर करण्याचे तंत्र मानवाने विकसीत केले आहे. त्यामुळे ते समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करू शकतात. परंतु वायू देवता तुम्ही जर 10 मिनीटासाठी जरी संप केला तर ही संपूर्ण पृथ्वीच स्मशानभूमी बनेल वरूण राजाचे शब्द ऐकून वायू देवता विचारात पडले आणि थोड्या वेळाने म्हणाले, वरूण राजे आपण म्हणालात ते ठीक आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.परंतु मानव जातीला खाण्यासाठी अन्न लागते. ते अन्न तर तुमच्या मानव जातीला खाण्यासाठी अन्न तर तुमच्या बरसण्यामुळेच मिळते ना आणि लोकांना खायला मिळाले नाही तर लोक कसे जगतील. वायू देवतेच्या बोलण्यावर वरूण राजाने स्मितहास्य करीत सांगितले, हे वायू देवता पृथ्वीतलावर अन्नाचा साठा खूप आहे.तो साठा ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा नाही. ते अन्न पूर्णपणे सडून जात आहे. त्यामुळे अन्न देवतेने नाराजी व्यक्त केली आहे. अन्न देवतेच्या सांगण्यावरून दि.4 जून रोजी भारत देशात फेरफटका मारला. तेव्हा मला असे दिसून आले की, माझ्या बरसण्यामुळे शेतकरी, कारखानदार खूपच खूश होते.परंतु त्याच भारत देशात शेतमजूर, कामगार, बेघर, अनाथ लोक मला पाहून खूपच घाबरले होते.वायू देवतेने मोठ्या आत्मीयतेने विचारलं वरूण राजे ते तुम्हाला का घाबरत होते. त्यावर वरूण राजाने एक प्रसंग सांगितला. हे वायू देवता एका शेतमजूराला मी जवळ घेऊन विचारले तू मला का घाबरतोस ? त्यावर त्याने सांगितले की, वरूणराज मी माझ्या छोट्या चिमुकलीला घरी एकटीच ठेऊन आले. माझे पती आणि मी दोघे दिवसभर राबून दोघांचं पोट भरतो आणि त्या आमच्या चिमणीला दाने (मुलीला अन्न) घेऊन जातो.परंतु देवा आम्ही आमच्या चिमुकलीपासून 5 कि.मी.दूर आहोत. घरात ती एकटीच आहे. घरावर साधे पत्रेही नाहीत, तुऱ्हाट्याची (तुरीच्या झाडाचे) भिंत आणि तुऱ्हाट्याचेच छत आहे. हे वरूणराज घरात सावली मिळते.परंतु पडणाऱ्या पावसामुळे सुरक्षा मिळू शकत नाही.घरातले कपडे भिजतील, राहायला जागा मिळणार नाही, आम्ही भिजायलाही तयार आहोत.परंतु भिजल्यावर आम्ही सारेच आजारी पडलो तर दवाखान्यात जाण्यासाठी पैसे नाहीत, औषधाचे भाव खूप वाढले आहेत. एका गोळीची किंमत देण्यासाठी आम्हाला दिवसभर काम करावे लागते पण आम्ही आजारी पडल्यावर काम कसे करणार आणि काम नसल्यावर दवाखान्यात कसे जाणार? मागच्या वर्षी वरूणराज तुम्ही आल्याने सारी जनता सुखी झाली होती. परंतु त्या पावसात भिजल्याने माझा मुलगा आजारी पडला. त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैसे नव्हते म्हणून सरकारी दवाखान्यात नेलं परंतु तेथंही औषधी उपलब्ध नव्हते.म्हणून त्यांनी कोऱ्या कागदावर औषधाची नावे लिहून दिली आणि बाहेरील मेडीकलवरून घेऊन येण्यास संागितले. तेव्हा माझ्याकडे 100 रूपयापेक्षा जास्त पैसे नव्हते पण औषधी मात्र 500 रूपयांची झाली होती. त्यामुळे त्यातून फक्त एकच औषध घेऊन माझ्या मुलीला घरी घेऊन आले.परंतु त्याला औषधांचा योग्य डोस मिळाला नाही म्हणून तो आमच्यापासून कायमचा दूर निघून गेला. असाच प्रसंग घडू नये.माझी एकुलती एक मुलगी आमच्यापासून दूर जाऊ नये याची आम्हाला काळजी वाटते म्हणून मला वरूणराजे तुमची भिती वाटते म्हणून सांगितलं. वरूण राजाने सांगितलेल्या घटनेमुळे वायू देवताही हतबल झाला होता. परंतु वायू देवाने पुन्हा विचारले हे वरूण राजा भारताने तर बेघर लोकांना घरे दिलीत ना.त्यावर वरूणराजा उत्तरला, हो वायूदेवाला त्यांना घरे दिलीत फक्त म्हणायला. परंतु या घरांचा लाभ त्यांना झालाच नाही, हे ऐकताच वायूदेवता थोडे विचारात पडले आणि म्हणाले ते कसं सरकारने एक घर बांधण्यासाठी 68,500 रूपये दिले. परंतु विटांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की 60 हजार तर विटांमध्येच जातात. त्यामुळे घर पूर्ण होत नाही म्हणून उर्वरित पैसे घर पूर्ण झाल्याशिवाय दिल्या जात नाहीत. या देशात अपूर्ण घर असणाऱ्या लोकांचे जे पैसे थकले आहेत. त्यावर हजारो घर बांधल्या जातील. परंतु नियमावर बोट ठेऊन सरकारने या गरीबांना अडकवून टाकले आहे. परंतु सरकारी कार्यालयात 10 बाय 10 ऑफीससाठी मात्र 2 लाखांपेक्षा जास्त खर्च केल्या जातो.त्यावर नियम लावल्या जात नाही.वरूण राजाच्या सांगण्यावर संशय व्यक्त करीत वायूदेवतेने पृथ्वीवरील भ्रमंती करायचे ठरवले आणि वायूदेवता व वरूणराजा पृथ्वीवर आले आणि अन्न देवतेला भेटले. अन्न देवतेकडे विचारपूस केली की, या देशातल्या लोकांची परिस्थिती कशी आहे. त्यावर अन्न देवता म्हणाले, हे वरूणराजे आपण आलात आपल स्वागत आहे. या भारत देशातील 50 टक्के जनता सुखी आहे. परंतु समाधानी नाही. लाखो करोडो रूपयांचा साठा करून ठेवतात. तरीही पैशासाठी खून करतात, ज्यांनी मला पिकवलं त्यांचापासून मी दूर आहे.मला एका अंधाऱ्या खोलीत वर्षानुवर्षे डांबून ठेवले आहे. 50 टक्के लोक माझ्यासाठी आक्रोश करतात. त्यांना एक वेळचे अन्नही मिळत नाही. गोर गरीबांना अन्न पुरवा, साठविलेले धान्य सडत असल्याचे पत्रकार बांधवांने दाखवलं. त्यामुळे न्यायालयाने गरीबांना धान्य वाटप, अन्न सडू देऊ नका, त्याची योग्य ठिकाणी सोय लावा म्हणूनआदेश दिले तरीही मी एकाच जागेवर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव इतके वाढले की मला गरीबी आणि भुकेल्यापर्यंत जायलाचं जमत नाही. म्हणून वरूणराजे व वायूदेवा आपण भारत भ्रमंती करा. माझ्या शुभेच्छा म्हणून अन्न देवतेने दोघांचा निरोप घेतला. वरूण राजे वायू देवतेला म्हणाले. बोला वायू देवता आता कुणाला भेटायचे. वायूदेवता म्हणाले, चला तर भारत मातेला भेटू भारत मातेला भेटल्यानंतर भारत मातेने दोघांचेही स्वागत केले. वरूणराजे मातेला म्हणाले, हे भारत माता मी जर पृथ्वीवर आलो तर काही लोक मला घाबरतात तर काहीचे संसार उध्दवस्त होतात. त्यामुळे मी कमी प्रमाणात येईल तू माझ्या विना जगू शकतेस का? माझ्या विना उत्पन्न देऊ शकतेस का? वरूण राजाच्या प्रश्नाने भारत मातेला गहिवरून आलं आणि म्हणाली, हे वरूण राजा कमी पावसावर येणारे पीक मानवाने शोधले आहे. त्यामुळे मी मानवाला कमी पावसात ही उत्पन्न देऊ शकते. परंतु याच मानवाने स्वत:च्या हितासाठी उत्पन्न वाढविण्यासाठी माझ्यावर विषारी द्रव्यांचा (रासायनिक खते, औषधी) वापर केला आहे. त्यामुळे मी कमजोर होत चालले आहे. वरूणराजे तुमच्या विना मला जगता आले असते.परंतु या विषारी द्रव्यांच्या अति वापराने मी किती दिवस जगेल, हे सांगता येणार नाही, असे बोलून भारत माता या मानव जातीबद्दल नाराजी व्यक्त करून रडू लागली.वरूणराजाने त्यांची समजूत काढली. तेवढ्यात एका ठिकाणी गॅस गळती झाल्याचे समजते.

या गॅस गळतीमुळे हजारो लोक मेले होते. याचे वायूदेवतेला वाईट वाटले. त्यामुळे वायूदेवतेने हा गॅस मानवापासून दूर नेण्यासाठी जोरदार वायू (हवा) सोडला. जोरदार हवेमुळे त्या ठिकाणी शुध्द हवा मिळाली. लोकांचे प्राण वाचले. वायूदेवतेने व वरूणराजाने भारत मातेला निरोप दिला आणि भारत भ्रंमतीला निघाले. वरूण राजे पुढे आणि वायू देवता मागे चालत असतांना एका घरात सर्वच्या सर्वजण आजारी पडलेले दिसले. आजारी लोकांना भेटण्याची इच्छा वायू देवतेने व्यक्त केली. वरूणराजे आणि वायूदेवता त्या घरी गेले आणि म्हणाले, तुम्ही सर्वच्या सर्व आजारी कसे, त्यावर एक आजारी गृहस्थ म्हणाला, काय सांगावं तुम्हाला आमच्या घराच्या बाजूला मोठ मोठे कारखाने आहेत. त्यातून निघणारा धूर आमच्या नाका-तोंडात जातो. त्या कारखान्यास विरोध करूनही सरकार आमचे ऐकत नाही.आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आम्ही असेल त्या स्थितीत जगत आहोत.हे ऐकल्यावर वायू देवतेला वाईट वाटले. वायूदेवतेने ठरवले की, कारखान्यातून निघणारा धूर आपल्या माध्यमातून दूर घेऊन जायचा आणि लोकांना शुध्द हवा द्यायची. म्हणून वायू देवता आणि वरूण राजाने ठरवलं की जोपर्यंत या देशात गरीब श्रीमंतांची दरी कमी होत नाही. सर्वांना अन्न, वस्त्र,निवारा मिळत नाही. तोपर्यंत आपण पृथ्वीवर जायचे नाही. परंतु वायू देवता म्हणाली, वरूणराजे पण या देशात असे काही ठिकाणे आहेत की जिथे मुळीच प्रदूषण नाही, सर्व समान लोक आहेत त्याच काय ? त्यावर वरूणराजे म्हणाले, हे वायू देवता आपण दोघे फिरत राहू जिथे लोकांना रहायला घरे, पोटाला अन्न आणि लाज झाकायला वस्त्र असतील तिथे मी थांबेल. त्यावर देवता म्हणाली, राजे तुमचं खरं आहे. परंतु तुम्ही म्हणालात त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा आहे. परंतु त्या ठिकाणी अन्न, वस्त्र,निवारा आहे. परंतु त्या ठिकाणी प्रदूषण आहे तिथे मात्र मी तुम्हाला थांबू देणार नाही. वरूणराजाने वायू देवतेला होकार दिला. वरूणराजे पुढे व वायू देवता मागे चालत आहेत. परंतु वरूण राजे थांबले की वायू देवता आपल्या हवेने त्यांना पुढेच घेऊन जात आहे. म्हणून आभाळ आलं की हवा येते आणि हवा आली की आभाळ जाते म्हणून पाऊस पडतचं नाही.


Rate this content
Log in