विषय:- प्राधान्य नौकरीला की घराला
विषय:- प्राधान्य नौकरीला की घराला
तुम्हाला विश्रांतीची गरज आहे .... ...अशा परीस्थीतीत तुम्ही धावपळ कराल तर तुम्हच्या सोबत बाळालाही धोका आहे.…तुम्ही काही दीवस सुट्टी घ्या.... डॉक्टर म्हणाले.
सुचीताने फक्त मान हलवली.... बाहेर आली.तीने प्रेमाने गर्भावरुन हात फिरवला...
बाळा ...सुट्टया तर नाही घेऊ शकत आपण, ....तु बघतोय ना किती फीज घेतात हे डॉक्टर काका... सुट्टी घेणार तर त्यांची फीज कशी काय देणार?
जिव वाचवायचा असेल तर पैसा कमवावा लागेल तेही जीव पणाला लावुन .... कसल जीवन आहे हा?....
घरातही कुणी समझुन घेणार नाही ....प्रेग्नेंट असली म्हणुन काय झाल ? .... आम्ही नव्हतो का कधी प्रेग्नेन्ट?........असे टोमने.. ....सासुच आजुबाजुंच्या बायांना सांगन... की प्रेग्नेंट आहे... अन् भलतीच खादाडपण करते... पोरगाही खादाड होईल... ....क्षुल्लक चुकांवर तिखट, मीठ, मसाला शिंपडुन मोठया करुन इकडे तिकडे सांगने.... अस वाटत होत की नातु येणार म्हणुन खुशी नाही तर दु:खच जास्त आहे तीला...लग्नानंतर आपल पोरग बायकोच्या मुठीत जाऊ नये म्हणुन तीच्या सासुची खुप कसरत चालली होती. अन् आता माझा मुलगा बाळाच्याही प्रेमात पडणार म्हणुन कदाचीत?.... ... तीच्या मनात विचार येत होत की, आई तुमच्या मुलाला मुठीत ठेवायच नाही मला...अन् तेवढा वेळही नाही हो माझ्याजवळ....
.....खुप बुध्दीमान सासु मिळाली जी नेहमी तिच्या चुकाच काढत असते......आणि तिला हरवते याच तीला अभिमानही होता... त्यांच्याकडुन खुप शिकायला मिळत होत हे महत्वाच होत तीच्यासाठी .... पण त्या परीस्थीतीत जो सुचीताला मानसीक त्रास झाला... तो अतीशय वेदना देणारा होता.... अशा दुहेरी संघर्षात पडलेली सुचीता अन् तीच बाळ दोघांनाही आधाराची गरज होती.... पण तो कधी मिळालाच नाही.अशा कठीन परिस्थीतच तीच आहाराकडे स्वत:च्या व बाळाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल...त्यामुळे बाळही खुप वीक झाल तीच ... डॉक्टर म्हणाले, बाळाला जगवायच असेल तर त्याच्या हार्ट च ट्रीटमेंट कराव लागेल .... त्यासाठी फीज जास्त लागेल .. कारन बाहेरुन डॉक्टर बोलवावे लागेल.... आता मात्र तीच्या पायाखालची जमीन सरकली... कारण माझ कर्तव्य म्हणुन ती आपला पैसा सासुवर , नवर्यावर , घरच्यांवर खर्च करीत आली होती... . आता तीच्याकडे पाहीजे तेवढी शिल्लक उरली नाही... वरुन सासुच बोलन ... काय केलीस तुझा पगार? शेवटी बाळाच्या ट्रिटमेंट साठी तीने जड अंत:करनाने कर्ज काढलं... कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ती नाैकरीचा एकही दीवस बुडवत नव्हती...... नाैकरीची पायपीट अन् घरची किटकीट तीला हैरान करुन सोडत होती...... काही चुकी नसुनही अडल्या सडल्या गोष्टी मडकं तिच्याच माथी फोडल जात होत.... नौकरी अन् संसाराचा गाडा ओढता ओढता तिची स्वत:कडे व तिच्या बाळाकडे पुरेसा लक्ष दयायला वेळ नव्हतं.........पण तिचा नाईलाज होता....
....वर्षामागुन वर्ष जात होते...आता तिच्याकडे ...सारं काही होत.....नव्हती फक्त "वेळ".................................(तेरा वर्षानंतर.....)
हँपी बर्थडे.....माय डीअर .... सॉरी मला जरा ऊशीर झाला....तुला काय हव आहे सांग? आज तु जे मांगशील ते मीळेल.... (आपल्या बाळाला जवळ घेत...)
जरा ऊशीर ...(ओरडुन)......तब्बल दोन तासापासुन वाट बघतोय रोहन....त्याचे सारे मीत्र घरी गेलेत ... आता कुणासोबत सेलीब्रेट करणार...?.. तीचा नवरा रागाने तीच्यावर आेरडला...
अरे मीत्र गेले म्हणुन काय झाल आपण आहोत की... चला केक कापुया....( ती रोहन ला केक देत म्हणाली.) (केक जोरात खाली फेकत) ...तु फक्त स्वत:साठी जगतेस.... आम्हाला कधीच तु वेळ दीलास नाही .... आय हेट यु मम्मा... (रोहन रागाने निघुन जातो) आता फक्त हेच बघायच ऊरल होतं....विजय, अरे जखमेवर मीठ कशाला चोळतोस... तु तरी समझुन घे मला...
रागाने बघुन .... आम्हा दोघांच्याही मनापासुन खुप दुर गेली आहेस तु सुचीता ..... (रागावुन रुम मध्ये जातो)(पण त्याचे शब्द वारंवार तिच्या कानात गुंजु लागतात... तिच्या ह्रुदयावर खोल आघात करुन जातात.)..... मी खरच खुप दुर गेलीय दोघांच्या मनापासुन..... तीच्या शरीरातील सर्व शक्ती क्षीण झाली... ज्यांच्यासाठी ती सतत झटत होती... त्यांच्यासाठीच ती तिरस्कार पात्र ठरली होती.... सुचीता धपकन् सोप्यावर बसली.. तिच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता ....माझी चुक काय?...उर आणि कंठ एकाचवेळी भरुन आला...डोळयात अनेक वर्षांपासुन दाटुन ठेवलेले अश्रु आज गालाला स्पर्शुन टप टप खाली पडत होते.. ह्रुदयातील आक्रोश आवेगाने बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता...पण तीने स्वत:चे तोंड दाबले...
बाळा.... 'वेळच तर नाही माझ्याजवळ'...... सुचीता रडु लागली.... वीस वर्षापुर्वीचे चीत्र तीच्या डोळ्यासमोर फीरत होते.... ती विचार करु लागली... ....सुचीता जे आजपर्यंत सहन करीत आली होती....... आता मात्र तिला सहन होत नव्हतं.... तीने डोळे पुसले. ती झपझप् रुम मध्ये गेली. आणि अचानक ओरडली ..... काय म्हणालास तु? ... मी मनातुन उतरली तुझ्या?...मला जॉब करण्याची हौस नव्हती, तु म्हणालास म्हणुन स्विकारल मी जॉब ... जॉब करुन घर सांभाळन वरुन सुन, पत्नी, आई म्हणुन सारे कर्तव्य पार पाडण साेप्पं नव्हत माझ्यासाठी पण सर्व केलं.... काही कसुर झाल्यावर टोमणे ही सहन केले.... तुझ घराच, कारच , प्लॉटच स्वप्न पुर्ण करण्यासाठी , रोहन व तुला काही कमी पडु नये ... या साऱ्या गोष्टीसाठी माझा सर्व आयुष्य खर्च केला.... .... जिथे मला दोन घास सुखान बसुन खायला वेळ नाही.......सांग ना कुठुन देणार मी तुम्हाला वेळ?..... ...तु नेहमी म्हणतोस तु आधीच्यासारख फ्रेश दीसत नाहीस.... जिथे ऊन, वारा, पाऊस झेलुन मी जॉब करते... सांग ना कशी दिसणार मी फ्रेश?.... सांग ना मला.... तीचा आजपर्यंत साठवुन ठेवलेला आक्रोश ज्वालामुखी बनुन बाहेर पडत होता... तो मान खाली घालुन .... सार काही ऐकत होता......
प्राधान्य नौकरीला की घराला??? .... हेच प्रश्न सुचीता समोर संकट बनुन ऊभे होते......
