Rakesh More

Romance

4.2  

Rakesh More

Romance

वेड लावून जाते ती

वेड लावून जाते ती

1 min
186


कधी वेड लावून जाते ती 

कधी भाव खाऊन जाते ती 

झुरणं माझं जाणते ती 

नेहमी हृदयात मावुन जाते ती ||0||

 

तीच माझं काव्य आहे 

तीच माझे शब्द ही 

तीच माझं वादळ आहे 

अनं तीच शांत स्तब्ध ही 

मनात माझ्या प्रीतीचं 

गाणं गाऊन जाते ती ||1||

 

परीक्षा ही घेते माझी 

असाच पास होत नाही 

एक क्षण असा नाही की 

तिचा भास होत नाही 

प्रश्न इतके जीवघेणे 

सुलाखून तावून जाते ती ||2||

 

वेड्या अल्लड मनाला 

प्रेमाचा आसरा देते 

संभ्रमित या मनाला 

प्रत्येक क्षण हासरा देते 

तिच्याच चिंतेत असताना 

हृदय सुखावून जाते ती ||3||


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance