तुझ्या शिवाय नाही जगू शकत मी
तुझ्या शिवाय नाही जगू शकत मी
अजित आणि अंजली बालपणापासूनचे मित्र मैत्रीण. एकत्र खेळलेले वाढलेले चाल संस्कृती मध्ये त्यांचे बालपण गेले.दोघांचेही वडील सरकारी खात्यात कारकून .अजित ची आई शिक्षिका तर अंजली ची आई गृहिणी. चाळ म्हणजे एक कुटुंबच मुंबईत मध्यमवर्गीय चाळीत रहात असत.आजच्यासारखे फ्लॅट संस्कृती प्रमाणे बंद दरवाजे नव्हते. घराची मनाची हृदयाची दारे उघडी असायची माणसांची. सणवार सर्वजण एकत्र साजरे करायचे .सणवारासाठी खर्च करण्यासाठी जास्त पैसा पण आनंद समाधान मात्र पुरेपूर असायचं.
मध्यमवर्गीय कुटुंबाचे जीवन एक साचेबंध असायचे. ठरलेल्या चाकोरीतून जात असे. पगाराचे आधीचे दहा दिवस मधले दहा दिवस आणि शेवटचे दहा दिवस यांचाही ताळेबंद हिशोब असायचा.अंजली अजितपेक्षा दोन वर्षांनी लहान होती.पण दोघाची गट्टी पाहून सर्वाना नवल वाटायचे.शाळेत येण्याजण्यापासून ते अभ्यास करायला खेळायलाही एकमेकांशिवाय करमायचे नाही त्यांना.असेच दिवस चालले होते. बालपण सरले आणि दोघेही प्रौढ झाले आता.गट्टी मात्र कायम तशीच.लहानपणापासून दोघांवरही चांगले संस्कार झालेले. आजच्या सारखी मुले फॉरवर्ड नव्हती.एक सीमारेषा असायची वागण्याला. अंजली आता दहावी ला गेली आणि अजित बारावी ला .दोघाचेही शिक्षण व्यवस्थित सुरू होते.वयाप्रमाणे त्यांच्यात आता बदल होत चालले होते.शिक्षणामध्ये दोघेही हुशार होते.नाजूक अंजली आता अंगापिंडाने भरली होती.गहू वर्ण अजूनच खुलत चालला होता.लहानपणी। अजित तिला खोडकरपणे नकट नाक म्हणून चिडवायचा तेच नकट नाक त्याला आता उभारलेल धारदार दिसत होते. तिचे मोहक डोळे त्याला आकर्षित करत होते.ओठांच्या पाकळ्यातून तिच्या वागण्या बोलण्यातला बदल अजितच्या नजरेतून सुटत नव्हता. अजितपासून एक लक्ष्मणरेषा आखलेल्या मर्यादेत ती राहत होती आता.तिच्या या वागण्याचं अजितला कुतूहल आश्चर्य वातचत होते पण आधीपेक्षा तिचा सहवास आता जास्त हवा असे त्याला वाटत होते.आणि ती त्याला टाळत होती. उंचापुरा धिप्पाड अजित ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. जेवढं ती त्याला टाळत होती तेवढच तिला त्याच्या शिवाय राहणं कठीण जात होतं. पण हे ती ठरवून वागत होती. स्वतः ला तिने मर्यादा घालून घेतल्या होत्या. आणि याचा त्रास अजित ला होत होता अजित तिची आतुरतेने वाट बघत असे पण अंजली स्वतः चा कोंडमारा करून घेत होती.
एके दिवशी दोघे बाजारात जात होते चालताना अजितने सहज विषय काढला."हल्ली तुझ्या वागण्यात बदल झाला आहे अंजू "अजित सहज बोलून गेला.म्हणजे? अंजली म्हणाली. "तू मला पूर्वी सारखी नाही वाटत मक तू पूर्वी पेक्षा जास्त आवडायला लागली आहेस आणि तू माझ्याशी बोलणं पण टाळते"अंजली च्या काळजाचा ठोका चुकला."नाही रे अस काही नाही "अंजली म्हणाली.मध्यमवर्गीय मुलींना एक चाकोरी सोडून वागायची हिम्मत होत नव्हती त्या वेळी.संस्काराचा पगडा होता.अजित विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे दयायला टाळाटाळ करत होती अंजली. अजितही संस्कारित असल्याने वावगेपणा नव्हता त्याच्या बोलण्यात. मुलांचंही तेच असे त्यांचं डेअरिंग एक ठराविक मर्यादेपर्यंतच. घरी परतताना अजित शेवटी धाडस करून बोललाच "अंजू तुझ्या शिवाय नाही राहू शकत मी आय लव यू "अंजलीची धडधड वाढली तिचा चालण्याचा स्पीड पण वाढला. ती काहीच बोलली नाही पण शांत पाण्यात खडा फेकून जसे तरंग उठतात तशी अवस्था अंजली ची झाली होती.त्या रात्री अंजली आणि अजितलाही झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी अजित कॉलेजवरून येताना शाळेकडे वळला. अंजलीची सुटण्याची वेळ झाली होती.ती शाळेच्या गेटबाहेर आली तर तिथे अजित तिची वाट वघट होता.तिला हे अनपेक्षित होत. न बोलताही तिचा होकार अजितला कळला होता."तुला नाही आवडल का? राग आला का माझा? मी नाही आवडत का तुला?"अजित ने विचारले." तस नाही रे पण भीती वाटते तू मला खूप आवडतो पण सर्व गोष्टी चा विचार करते आणि भीती वाटते आपले घरचे घरचे असपल प्रेम मान्य करतील का? खूप प्रश्न भेडसावतात" अंजली म्हणाली का नाही मान्य करणार अजित बोलला.तुझं माहिती नाही मला पण मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय.मला तू शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहेस" अंजलीचे डोळे भरुन आले "माझी पण तीच अवस्था आहे ' अंजली बोलली दोघाचेही नकळत प्रेमप्रकरण सुरू झाले. पण कधी त्यांनी विपर्यास केला नाही त्यामुळे कोणाच्या लक्षात येत नव्हते. चांगले शिकून आधी करिअर करायचे मग लग्न दोघानी पण ठरवले होते.अजितला डॉक्टर व्हायचे होते अंजली ला पण डॉक्टर व्हायचे होते पण आपल्याला झेपेल की नाही याची तिला शनका वाटत होती तिने तसे बोलून दाखवले अजितला "का नाही होणार तू नक्की करशील मी आहे सोबत " अजितने तिला हिम्मत दिली."पण नंतर मला स्थळे येऊ लागतील तेव्हा?"अंजली बोलली ."तेव्हा बघू आपण योग्य वेळ येईल तेव्हा सांगू घरी"अजित बोलला
दहावी बारावी च्या परीक्षा झाल्या. अजित आणि अंजलीला पण चांगले मार्क्स मिळाले.त्या वेळी आजच्या सारख्या इन्ट्रान्स एक्साम नव्हत्या .दहावी बारावीच्या बोर्ड मार्कांवरून ऍडमिशन मिळत असे.अजितला पुण्यातील मेडिकल कॉलेज ला ऍडमिशन मिळाले तर अंजलीचे मुंबईत सायन्स घेवून कॉलेज सुरू झाले.भेटीगाठी थाम्बल्या होत्या दोघानाही विरह जाणवत होता पण एकमेकांवर पूर्ण विश्वास होता.एकमेकांसाठीच होते ते याची जाणीव होती त्याना.अंजली पण बारावी झाली तिला कोल्हापूर ला मेडिकल ला ऍडमिशन मिळाले शेवटच्या वर्षला असताना तिला स्थळे येऊ लागली होती अजितची पण प्रॅक्टिस सुरू झाली होती अंजलीने ही गोष्ट अजितला सांगितली.अजित बोलला "मी बोलतो घरी" दोघाच्याही घरी समजले आता कोणाचाच विरोध नव्हता. अंजलीची शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करून दोघे पुण्यात आले.आधी दोघेही नोकरी करत होते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये. मग हळूहळू जम बसू लागला वैवाहिक जीवनही सुरळीतपणे सुरू होते.आता त्यानी स्वतः च हॉस्पिटल सुरू केलं.अंजली एमबीबीएस होती तर अजित इनटी सर्जन होता .दोघेही एकमेकांना वेळ देत होती.हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट साठी वेगवेगळे स्पेशालिस्ट अपॉइंट केलेले होते. हॉस्पिटल सुरळीत सुरू होते.सर्व सुबत्ता होती पण सात वर्षे झाली लग्नाला तरी पाळणा हलला नव्हता. दोघेही वाट बघत होते गोड बातमीची पण काहीच नाही .दोघांच्याही मनात येत होते की कोणाच्यात तरी दोष आहे पण नेमका कोणाच्यात हे समजत नव्हते. लैंगिक सुख समाधान दोघानाही मिळत होते अतृप्त असे काहीच नाही मग असे का?हा प्रश्न मनातच होता .
एके दिवशी वेळ बघून अजितने अंजली जवळ हा विषय काढलाच "अंजू आपल्या दोघांनपैकी कोणाच्यातरी दोष आहे पण नेमका कोणाच्यात तो नाही माहिती पण दोष तुझ्यात की माझ्यात हे मला नाही जाणून घ्यायचे . ट्रीटमेंट सुरू की तर समजेल. मला मूल नसलं तरी चालेल पण तू हवीस. तू बाई आहेस तुझी इच्छा असेल आई होण्याची आई होण्यासाठी तू आतुर असशील तू म्हणत असशील तर जाऊ आपण डॉक्टरकडे " त्या वेळी आजच्या सारख आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सरोगसी मदर हे पर्याय नव्हते त्यामुळे उपायही कमी होते.अंजलीच्या मनात आले सर्वात प्रथम म्हणजे दोष कोणाच्यात हे समजल्यावर ते मन नाराज होणार दोष तुझ्यात की माझ्यात हे समजायलाच नको आपल्या प्रेमात बाधा नको जे आहे ते स्वीकारायचे अंजलीने ठरवले. ती म्हणाली " मला नाही डॉक्टकडे जायचं आणि तू पण नको जाऊस .दोष कोणाच्यातही असू दे आपण जाणूनच नाही घायचे "त्या दिवसापासून त्यांचे एकमेकांवरचे प्रेम द्विगुणीत झाले.अजितच्या मिठीत अंजली पूर्ण समाधानी होती.अशीच वर्षे निघून जात होती.दोघेही जोमाने हॉस्पिटलचे काम करत होते.काहीतरी समाजसेवा आपण केली पाहिजे या समाजाचे आपण देणेकरी आहोत असा विचार ते आता करू लागले.अनाथ मुलांसाठी आश्रम काढावा असा निर्णय सहमताने झाला.सरकारच्या परवानगी त्यानी एक अनाथ आश्रम काढला.आश्रमाचे काम अंजली पाहू लागली हळूहळू आश्रमाच्या मुलांचीसंख्या वाढत होती आणि अंजलीचा व्यापही वाढला होता.अंजलीने चाळीशी ओलांडली होतीआ ता पाचशे अनाथ मुलांची ती आई झाली होती.अजितही तिला अधून मधून मदत करत होता त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले.अनाथ मुलांचे सर्व करताना व त्यांच्या साठी उपलब्ध असलेल्या स्टाफचेही आपण कल्याण करत आहोत याचे अंजलीला मोठे समाधान मिळत होते.पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे नाव लौकिकात होते.सर्वाना त्यांच्या कामाचा हेवा वाटत होता. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केले.
एके दिवशी अचानक अंजलीची तब्बेत बिघडली.काहीच कळत नव्हते नेमके काय झाले पण अंजलीची तब्बेत दिवसेंदिवस ढासळत चालली होती अजित सर्व उपचार करत होता परंतु काहीच उपयोग होत नव्हता .एके दिवशी ती गेलीच. अजितला खूप मोठा धक्का बसला.
सर्व विधी करून तो घरी आला सर्व आठवणींचे ढग त्याच्या डोळ्यासमोर दाटून आले होते. एकांतात बसून अश्रुंचे पाट वाटत होते फ्लॅशबॅक च्या रूपाने सर्व क्षण समोर उभे राहत होते.तू गेली हे स्वीकारणे त्याला शक्यच होत नव्हते. ती संध्याकाळ त्याला कातरवेळ वाटत होती.एक क्षणही तो तिच्या शिवाय राहिला नव्हता. न जेवताच बिछान्यावर पडला. मानसिक थकव्याने त्याला मध्यरात्री केव्हातरी झोप लागली ती कायमचीच.