तो बाप असते
तो बाप असते
सकाऊनचा कामाले जायेल बाप संध्याकाई वावरातुन जा घरी येते, त्याले दिवसभराची वावरातली दगदग घरात पाय ठेवल्यावर घरच्या आनंदात त्याले माहीत पळत नाही, कधीकधी घरच्यांच्या गरजा पुरत्या पुऱ्या करता करता त्याचं त्याच्याईकळे लक्ष देनं होत अशीन काय? यावर आपुन कईच ध्यान देत नाही. जिन्दगीची जमापुंजी जमा करणारा बाप त्याले वाटत नशीन काय आपुनही कधी आराम करावं लेक, पण तो कधीच आराम करत नाही, रोजच्या सूर्यासारखा निश्तेच लखलख आपल्या घरादाराले ऊजिङ देत राहते, पण हे समजिन कोन आपल्याले त फक्त आपल्या गरजा पुरा करणारा बाप दिसते पण, त्याच्या पायातली बारा महिन्यांपासून चालत एयेल खिवे मारेल चप्पल काऊन दिसत नशीन बरं!
काय चुकते त्या बापाचं जो घरासाठी मरमर करुन जगते, पोटाले चिमटा देत जगते, कधी हॉटेलात घोटभर चा पेत नाही. कायत त्या पैशात लेकरासाठी पेन, पेनशिल, त कधी एखादा बिस्किटचा पुळा होईल, अरे एखाद्या दिवाईले बापाले ईचारुन पा बाबा तुमाले काई घ्या ना, कपळा-लत्ता, नवी चप्पल घ्या, धोतर घ्या बाङीसं घ्या, गरीब देहाचा बाप मनानं लेक मोठाच असते अन् श्रीमंत लय असते, त्याच्या वठावर एकच शब्द अशीन,"बाबू आमचं काय रायलं आता. घ्या तुमाले काय पायजे." तो बाप असते.