तिची कहाणी
तिची कहाणी
तसं मला सोडून जायला तिला सहा महिने झाले होते.पण तिच्या सोबत घालवलेला क्षण मला सोडून जायला तयार नव्हते. सारख ती आणि तिच्या आठवणी मनाच्या खडकावर चिपकुन बसलेले.. विसर म्हणावं पण विसरता येईना नवा क्षणही उमजू देईना. रोजच ती आणि तिच्या बरोबर घालवलेला क्षण भवऱ्या घेत मनाभवती फिरतात अन मीही फिरत असतो तिला भेटलेल्या जागेवर. सतत आठवत असते ती तिचे बोलणे,सोंदऱ्यावर मोहित होऊन अनुभवलेल्या सुखाच्या रात्री, ती का सोडून गेली मला ? तीच माझ्यावर प्रेम शारीरिक सु:ख अनुभवण्या पुरतच होत का ? अजून ही मनातलं कोड सुटत नाही ..
तुषार मला नेहमी म्हणायचाही..
"पोरा -पोरींच्या प्रेमात जेंव्हा वासनेचा गंध पसरतो तेंव्हा प्रेमाचा नाश होतो आन त्याचं रूपांतर लफडयात होतं "
जेंव्हा ती मला सोडून गेली ,तेव्हा तो म्हणाला होता की
"मित्रा! आयुष्य खूप सुंदर आहे पण मुलांना जगता येत नाही, मुलीच्या प्रेमात पडतात मात्र प्रेमातल्या मुलींना ओळखता येत नाही.
तोंडात सुपारी चघळावी तस विचार चघळत मी माळरानातल्या जीन बाबाच्या मंदिराला टेका लावून बसलो होतो तसा नाम्या फटफटी घेऊन आला.
"काय कविराज, कसला विचार करत बसलेत..!"
"काही नाही.आपलं मी ..तिला विसरण्याचा प्रयत्न करतोय.."
मी हळूच आवाजात बोललो. तसा नाम्या गाडीला स्टँड लावत माझ्या जवळ येऊन बसला .
"माझा अनुभव सांगतो ..तू तिला विसरुच शकत नाही"
"का? करणी बिरणी केली का माझ्यावर तिने..तिला न विसरता यावं म्हणून..?"
"तस नाही रे लेका, ती तुझं प्रेम होतंना म्हणून""
"मग त्यात काय झालं"?
"प्रेमाला सहसा विसरता येत नाही मुळात ते विरण्या साठी नसतंच.
तुला दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध जोडावे लागतील,
नाहीतर सतत छाडत राहतील तुला तिच्या बरोबर घालवलेला क्षण !.
"काही सुचत नाही रे मला असं वाटतय की तिच्या -बरोबर संबंध वाढवून आत्मविश्वास खचला आहे माझा"
"म्हणून तर कागद कोराच दिसतोय खिश्यातला"
खिशातला कागद कळला त्याने ते दोन शब्द वाचले मात्र ,मला पुढे काही केल्या सूचना.
"दुःख लिहायला शिक लेका, दुःख लिहायला शिक!तेव्हाच तू दुनियादारी अनुभवाशील.."
"बरोबर म्हणतोस तू दुःख लिहिले पाहिजे ! पण माझ्या नजरी दुःख पडत नाही सद्या ,मग मी दुःख शोधाव तरी कुठे?"
"अरे हा ! तुझ्याशी बोलताना विसरलोच चल तुला आज ,एक ठिकाणी घेऊन जायच आहे .."
"अरे पण कुठे"?
"तुला तुला दुःख लिहावंसं वाटताना ?"
"हो ..मग !"
"चल मग"
"अरे पण"
"चालना यार"
त्याने माझा हात धरुन मला बसल्या जागेवरुन उठवलं
आणि गाडीला किक मारत त्याच्या मागे बसवलं तशी गाडी भुर्रर्र ,,,कन चालू लागली.
"नाम्या, आपण जतोय कुठं ?"
"सांगतो ..सगळं सांगतो आधी गाडी मेन रस्त्याला लागू दे.."
खादड-बदड करत पाठीचे मनके मोडत केंव्हा तरी गाडी मेन रस्त्याला लागली..
मी रस्त्याभर बडबडत राहीलो मनातलं सार काही उकरत राहिलो ,तो मात्र नुसता हू,हू करत राहिला
गाडीचे, गियर खटा खट माघे पुढे करत राहिला,तालुक्याच्या अश्या अनओळखी रस्त्याला गाडी नेली जिकळे मी कधीही आलो नव्हतो..
अन गाडी अश्या ठिकाणी थांबवली जिथे पाखर फिरकायचाही संकेत नव्हता.
रंग उडालेल्या पडक्या भिंती...अस्तित्व हरवलेला रस्ता
नजर फिरवून पाहताना दिशाभूल झाल्या सारख वाटत होतं..
तितक्यात गल्ली मागच्या गल्लीत स्त्रीमुख हसण्याचा आवाज आला .वाऱ्याच्या स्पर्शान सेंटेट वास शरीरभर पसरला.
उन्हातल्या प्रवाश्यांन सावली पाहत तडतड पाऊल उचलावी,तस नाम्या ने मला ओढत हसू आलेल्या आवाजाच्या दिशेनं नेलं..आणि मग !.
"इथं तुला बरच काही लिहिता येईल आणि हो.."
त्याने खालच्या खिशात हात घालत तीन शंभरच्या नोटा माझ्या खिशात घातल्या.
"राहूदे आत गेल्यावर कामात येतील"
अस म्हणत वासनेचा गंध पसरलेल्या गल्लीत फिरवू लागला.
वासनेच्या खुंटीला टांगलेल्या कावळ्या, नाजूक नयनगुप्त पोरी अन आकर्षित करणाऱ्या स्रिया मेकअप करून ,असंख्य वेदना झाकून वाट पाहत बसल्या बाल्कनीवर. लाड्या-गोड्या लावत आत नेण्यासाठी .
मी अस पाहिलं होतं फक्त चित्रपटात, आणि वाचलं होतं
कामवासनेच्या पुस्तकात जे मी प्रत्यक्ष पाहत होतो,ते सगळं मला नवलच वाटत होतं ..
"ये चिकने उपर देख"
मी वरती पाहिलं
"आजा तेरे लिये स्पेशल सर्व्हिस.आगे,पिछे सब कुछ..
कम दाम देना बस.."
देह गोरा हिरवी काकडी अंदाज माझ्या वयाची,आकर्षक , मेकअप केलेली तेने मला हाक मला मारली..! तेंव्हा हृदयात धडधड जरा जास्तच वाढली..
मी मानेनच तिला नाही नाहीचा इशारा केला.तसाच खांद्यावर हात ठेवत नाम्या म्हणाला..
"घाबरायच नाही हा,इथे बऱ्याच पोरी आपल्या ओळखीच्या आहेत, सर्व्हिस पण मस्त देतात हा.!तुला हवं तसं कर,बघ तुला बोलवणारी जया आहे. काय मस्त माल आहे अन स्वभावात बेस्ट..बोल करतो का तिच्यासोबत ?"
मला तर काही सुचेना झालं.तस त्याने माझं एक बखोट धरून बळजबरीने तिच्या कडे ओढत नेलं. गरम तेलात पापड फुलून वर यावा तस तिच्या हसू आलं .
"ये चलना,चल क्या भाव खाता हे "
मला रुमात नेलं अन तस तिने अतून कडी लावली..
अस्तित्वाच्या रंग उडालेल्या भिंतीवर वासना जागृत करणारे कामसूत्राचे किळसलेली चित्रे. कोपऱ्यातील टेबलावर ठेवलेला पाण्याचा जग,बियारची बाटली आणि सिगरेटचं पाकिट, जवळ ठेवलेली कोंडोमची पाकिटं..
वासनेच्या किंकाळणार आवाज आतल्या आत दाबून राहावा म्हणून खिडक्यांना चक्क पॅक काचेच्या फडया,
आणि रोज नव्या पुरुषाने तिचा चोळामोळा कराव्या अश्या चादरीवर मी बसलेलो. हृदयातली धडधड अजून कमी झालेली नव्हती.
तिने केसातील रबर काढलं,कानातली झुमके ओढले आणि ब्लाउजचे बटन एक एक करून उघडवताच माझ्या मुखातून शब्द पडला, तो तिच्या साठी..
"बहन..!"
तशी ती विचित्र नजरेनं पाहत म्हणाली
"क्या ..? क्या बोला बे येडे...?"
"बह ..न" मी दिर्घश्वासाने म्हणालो...
"क्या बोला बे साले " ती जवळ येत म्हणाली
"बहन..बहन..बहन.."
तस तिने एक जोराची लावली माझ्या कानाखाली आणि
सजलेल्या काजळी नयनात अश्रू दाटून आले....
तिचा हुंदका दाटून आला आणि ती ढसा-ढसा रडू लागली.
क्षणभर दिलासा द्यावासा वाटला होता तिच्या अश्रूंना. पण काही केल्या तिला थांबावेसे वाटेना,कदाचित गेली कित्येक वर्षे ती कुणाजवळ रडलेली ,कुडलेली नव्हती.
म्हणून तिचा हुंदका आभाड फाटल्या सारखा दाटून येत होता..
"कोंन हो तुम,और यहाँ क्यू आये हो ?"
"में एक कवी हु, बहन,और में तुम्हारा दर्द लिखने आया हु..."
अन पुन्हां तिचा आभाड फटल्या गत हुंदका दाटून आला
"सँभालो बहन, अपने आपको सँभालो. मुझे बतावो तुम क्या करती हो .!तुम्हारी यहाँ आनेकी वजह क्या है.?
बोलो बहन.."
तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला दिर देत विचारलं.
तस ती स्वतःला सावरत म्हणाली-
"जो जिंदगी..जिंदगी देनेवालों के काम न आये वह जिंदगी किस काम की .!
पांच साल पहले की बात है. जब में बारवी कक्षा में जिले की कन्या हॉस्टल में रहा करती थीं, तबी एक दिन होस्टल में मेरे नाम का खत आया.जो मेरे विकलांग भाई ने किसी और से लिखकर भेजा था.लिखा था-
प्यारी बहन..
आजकल माँ की तबियत बिघडती ही जा रही हैं.. डॉक्टर कहते है कि उनके इलाज के लिए,चालिस हजार रुपये कि जरूरत है .! रात को माँ कूछ भी बड़बड़ाती रहती है, रात भर सोती नहीं, कहती है मोत आने से पहले वो तुम्हें एक बार देखना चाहती है दीदी तुम जल्द से घर आ जावो. माँ से मिलकर फिर से चली जाना.
तुम्हारा भाई
पियूष
माँ कॅन्सरसे झुंज रही थी. इलाज के लिए पैसे कहाँ से लाये,कूछ समझ मे नही आ रहा था !. तबी मेरी एक सहेली ने सलाह दी की."पैसे तो तुम्हे मिल सकते है और भी पूरे पांच हजार,पर तुम्हे किसी ओर के साथ एक रात सोना होगा "
मैने हा कर दी और वह एक रात जो पीड़ा सही... ओ मुझे आज तक याद है !
जब में पैसे लेकर गांव गई ,तब माँ का देहांत हो चुका था,माँ तो चली गई लेकिन मेरे छोटे भाई पियूष की जिम्मेदारी मुझपर आ गई.
कुछ दिनों बाद फिर मेरी सहेलीने कहा एक रात के दस हजार मिल रहे है.!
तब भाई की जिम्मेदारी को समझ कर मैने है कर दी.
और वासना के चक्रव्यूह में इस तरह से फसी की किसी ने बाहर आने ही नही दिया..
"बोहत बोहत पीड़ा होती है ,एक एक रात को "
पता नही रहता जब हर कोई फूल समझकर मेरे जिस्म को कुचल जाता है ..
अंधार बराच झाला होता ..नाम्या दरवाज्याला धाडशी मारून बसला होता.मी तसा उडून सारे पैसे टेबलवर ठेवले.ती मात्र वेदना ओकून स्थिर झाली होती..मी दरवाज्याची कडी उघडेल.तितक्यात तिने माघून हाक दिली.
"भाई" मी माघे वळून पाहिलं
"एक बात बोलू.?"
"बोलो बहन"
कभी कभी यूँही मुझे,मिलने आजाना ,इस दुनिया मै तुम्हारे जैसे लोग नही मिलते,
और हो सके तो जब मरूँगी, तो मेरी चिता को आग तुम्ही देना.
मला काय बोलावं काही सुचत नव्हतं, मी आतून अस्वस्थ होत गेलो,मी काही न बोलता काढता पाय घेतला
तसा नाम्या माझ्या गळ्यात हात घालत म्हणाला
"लेका पहिल्यांदा आला आणि एवढा वेळ, चांगलाच स्टॅमिना आहे,जयाच्या प्रेमात पडला की काय..?
"नाम्या, तुला काही सांगावस वाटत रे"
"काय संगतोस .?बोलना"
"मला इथं पुन्हां कधीच आणू नकोस रे"..
"बर ठिक, आता घरी चालायच ना .!"
"हो"
तस आम्ही गाडीवर बसून भुर्रर्र..कन निघालो
माती करणाऱ्या देहाच्या हरेक रात्रीचा
अंत का होत नाही ?
सुचत नाही
सुचत नाही
तिच्या जखमा कितप्त झाकून ठेवेल
वाळलेल्या अस्तित्वाचे खवले बाहेर येऊन फेकले
बिल्लासभर पोटाची भूक
का मिटता-मिटत नाही.?
सुचत नाही
सुचत नाही
पायात पाय घालून गर्भाशयाच्या यातना
रोज नवाच देह,सोसत
वासनात जगणं जात करपून
गुप्तरोगान कणते
मग
बाई पण बाई आश्रू का लपवते
सुचत नाही
सुचत नाही
बरेच महिने उलगडून गेली होती.माझ्या विषयात पुन्हां नव्याने रंग आला होता हल्ली प्रत्येक नवा क्षण मी
आनंदाने अनुभवत होतो, मनातलं सर्वच डायरीला सांगत होतो, पुस्तकीं जगणं जगत होतो,
एक दिवस असच जीनबाबाच्या मंदिरा वर बसून काही कवींता करत होतो, तेंव्हा नाम्या अचानक तिथं येऊन टपकला म्हणाल,
"चल गाडीवर बस पटकन,आपल्याला तालुक्याला जायचं आहे,बस पटकन"
मी म्हणालो "का ?"
"ते तिथं गेल्यावर कळेल.."
मी कागद, अन पेन खिशयात ठेवला अन बसलो गाडीवर अन नाम्याने गाडी वाऱ्याच्या वेगाने गिंगवली
"अरे नाम्या कुठे जातोय आपण..?"
पण तो काहीच बोलला नाही.आणि नेऊन सोडलं अश्या जागेवर जिथं स्रियाच रिंगण उभं दिसत होतं.
"अरे काय झालं रे इथं...?
मी कापऱ्या आवाजात नाम्याला विचारलं,
"गणा..जया मरण पावलीय यार..तिला एड्स होता म्हणे"
"काय ..? मला तर खरच पटेना"
मी रिंगणाच्या आत जाऊन पाहिलं ,तर जया मला सरणावर दिसली.. तिचा भाऊ पियुष तिच्या देहावर डोकं ठेऊन ढसा-ढसा रडताना दिसला,त्याचे अश्रु पाहून माझ्या डोळ्यांत पाणि यायला जराही उशीर लागला नाही मग पियुष जवळ घेऊन अन आम्ही अग्निडाग दिला ,अन तिचा तरुण देह जळताना शेवटचा राम राम केला.!
तस पियुषने माझा हात झटकत एक सौंदर्य ढळनाऱ्या स्रिच्या पदराआड जाऊन ढसा-ढसा रडु लागला
"आज पासून याची जबाबदारी मी घेणार" अशी ती म्हंटली,अन हुंदका दाटत त्याला खाली घेऊन बसली..
जीवनाची राखरांगोळी करून गेलीलेली जया मी विसरून गेलो होतो ,जगताना मी बरच काही अनुभवलं ,
पण जया विषयी खूप काही लिहायच राहून गेल..!
ती तिची व्यथा, तिची कहाणी...
सरनाकडे पाठ खिश्यातून पेन काढला वाटलं या पेनाला काही अस लांब फेकावं की नजरेस पडायला नको,कायमस्वरूपी
तेव्हा माझ्या अंतकरणातुन आवाज आला,आता एकदा नव्याने दुःख लिहिलं पाहिजे.पडद्या मागच नाही,आता माणसा मागचं लिहलं पाहिजे.आता नव्याने दुःख लिहिलं पाहिजे.......