STORYMIRROR

भक्ती पाटील

Tragedy

2  

भक्ती पाटील

Tragedy

तिच अस्तित्व

तिच अस्तित्व

2 mins
84

रोज तिच्या जगण्याला खरा अर्थ येऊ दे आदर सन्मान या गोष्टींनी ती श्रीमंत होउदे. ती नोर्मिती आहे इवल्या आयुष्यात धडपडणारी तीच अस्तित्व आज तिला उमजावं, ती नक्की कोण हे तिला समजाव, ती आहे स्त्री. सोबत येताना घेऊन येतेस तू तुझा रुसवा, गोडवा कधी खट्याळ पणा कशी आहेस तू अवखळ स्वच्छद तरीपण मर्यादा नावाची गोष्ट तुला अडवते. कारण तू बाईपण म्हणून जन्म घेतला आहेस. तू सगळी नाती निभावतेस, तुझ्यामुळे अनेक नात्यांना अर्थ येतो. तू तुझ्या नादात राहतेस. कायम गाणी गुणगुणत, भाजी निवडने, गॅस सिलेंडर चा दर वाढला की उगाच रागात येणं, घराला हातभार म्हणून हळू हळू डब्यात पैसे साठवण. तू स्वतःकडे फारसा बघत नाही, साडी जुनी झाली तरी कपड्याच्या दुकानात मला नको साड्या आहेत खूप त्याच नेसन होत नाही अस म्हणून वेळ मारून नेतेस. आजारी असली तरी कुठे आहे मी बरी अस इतरांना सांगत स्वतः स्ट्रॉंग होतेस. फोडणी देताना उडालेला तेलाचा थेंब सुद्धा तुला जाणवत नाही, इतकं मन लावून तू स्वयंपाकघरात रमतेस. मीठ कमी झालं तर स्वतःला नाव ठेवतेस, मात्र सगळ्याना जेवायला देऊनच तू उरलेलं आहे त्यात स्वतःला पुरवतेस. एखादा कार्यक्रम असला की हौसेने चार फुले वेचून गजरा बनवतेस. कंबरेला पदर खोवून झपाझप कामाला अवरतेस. नऊ महिने आपल्या सोबत दुसरा जीव वाढवण्याची ताकद तुझ्यात आहे म्हणून देवाने तुला आईपण नावाची गोष्ट दिलीय घरात जसा वाकून केर काढताना कचरा बाजूला सारतेस तशीच दुःख सुद्धा तू सहजतेने पचवून बाजूला करतेस कपडे सुकत घालताना उडणाऱ्या पाण्याचा फवारा तितकाच आनंदाने अंगावर घेतेस. तू घरातली ती एक आकृती आहेस, जिथं सगळे आकार उकार त्यात सामावले जातात. या जगात सर्वात जास्त कमवणारी तूच तर आहेस. कारण तू नाती, माणस, आपुलकी कायम जिंकत राहतेस.तू कधी हरू नाही शकत कारण दुसऱ्यांसाठी जगणारी तू विजेती आहेस. का ग कधीच जगत नाहीस स्वतःसाठी ? तुझ्या स्वप्नांना किचन च्या डब्यात बंद करतेस, स्वतःच्या आवडीला घड्याळाच्या काट्या मध्ये सोडून देतेस, स्वतःला वेळ देणं तुला जमलंच नाही. तुझ्या कष्टाना पूर्णविराम कधी मिळतच नाही. मात्र तू जन्म घेतल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्या तल्या तुला मात्र कायम पूर्णविराम देत पुढे सरकाव लागत. तुझ्या पदराला लोंबत राहत कुटुंबाच सुख आणि उदरात साठत जात न दिसणार दुःख. तू कमाल आहेस. तुझ्यावर लिहिताना मन हळवं व्हावं इतकी तू सुंदर आहेस. तू जग आणि प्रत्येक मनात स्वतःला झिरपत जा. तुझा हा झरा कधी आठणार नाही खळखळ वाहत राहील घराला सुखावून नेईल.


Rate this content
Log in

More marathi story from भक्ती पाटील

Similar marathi story from Tragedy