STORYMIRROR

Asha Padvi

Tragedy

3  

Asha Padvi

Tragedy

थरारून सोडणारा तो

थरारून सोडणारा तो

4 mins
31

"गोंधलेली, घाबरलेली ती कशी बशी तिथून बाहेर पडली .बाहेर चहुकडे नजर जाईल तिथपर्यंत फक्त मोडलेली झाडे , तुटलेली घर , अस्तवस्त पडलेल्या वस्तू . तिला या सर्वावर विश्र्वासच बसत नव्हता .असा वाटत होत जसा ती स्वप्न पाहत होती अन् डोळे उघडले तर सर काही होत तास असेल . पण भीमाच्या आवाजाने ती भानावर आली .तिला समजले हे स्वप्न नाही तरी जे काही आहे ते आजच सत्य आहे ."

काल नेहमीसारखी ती , घराच्या अंगणात गहू अन् तांदुळ साफ करत बसली होती . भीमा नुकताच शेतावरून घरी आला अन् तिथेच बसला . सई पाणी आण की जरा म्हणत,सई ला आवाज दिला. ती पण लगबगीने पाणी गेहून आली . अन् बसली , भिमाकडे पाहून विचारले का हो काही झालंय का तुमासनी .असा एकटक काय बघताय आसमान कडे .काही नाही ग एक महिना झाला वावरत बियान टाकून पण पाऊसाचा एक थेंब नाही बघ अजून पडलेला , या वर्षी पण पाऊस नाही लागलं तर खाणार काय आपण ? त्याच्या डोळ्यात पाणी बघून सई पुढे आली अणि बोलली तुम्ही काय पण चिंता करू नका . इंद्र राजा रागावला नाही आपल्यावर या वर्षी नक्की येईल तो आपल्या दाराशी .तिचा विशवास पाहून भीमाला ही थोडा बरं वाटलं .

आपले काम आवरून सई स्व्यपाक करायला आत गेली . आणि जेवण तयार केले . जेवण संपवून दोघेही झोपायची तैयारी करू लागले .पण का कोणास ठाऊक सईला झोपच येईना. अचानक जोरदार हवेचा झोका आला .ती लगेच खिडकी जवळ आली . आणि बघता बघता हवेबरोबर पाऊसाचे थेंब धरणीवर पडू लागले . सईल अजूनही तिच्या डोळ्यावर विश्वास नव्हता .म्हणून तिने भीमाला आवाज दिला. भीमा घाईने उठला पाहतो तर बाहेर पाऊस पडत होता. भीमा ने आनंदाने सईला मिठी मारली .अन् बोलला तु बोलली ते खर झाला बघ. दोघेही डोळे भरून त्या पाऊसा कडे बघत होते .जणू काही काहीतरी खुप मौल्यवान मिळालय . आता शेतात पीक येणारं याच आनंदात ते दोघे झोपी गेले.

पण देवाने पुढे काय ठरवून ठेवलं होते . त्यांना माहीतच नव्हता. रात्रीचे दोन वाजले होते . कोणीतरी दार ठोठवत होते.

त्या आवाजाने भीमाची झोप उडाली . तो उठला अन् दार उघडले ,समोर राज होता बोलला भाऊ गरजेचं समान बांध अन् डोंगरवर चल. भीमाला काही समजले नाही . त्याने विचारले काय म्हणतोय .तिथे का जायचं . अरे भीमा भिमाई चवतलीय . तिकडचं पाणी पुलावर आलाय अन् त्या सरकारी माणसाने पण सांगितलं आहे बांधच पाणी सोडणार आहे . अरे गावात पाणी येईल त्याआधी वर पोहचायचे आहे आपल्याले. बघत बसू नको चल पटापट आवर. सई अन् भीमा एकमेकांकडे बघत होते . पुन्हा राजच्या आवाजाने ते भानावर आले. पण सई तिथून निघायला तैयार नव्हती . मागे मागे रेवती आजी आली म्हणाली लेकानो जीव असेल तर काय पण करू आता फकस्त जीवाचा बघा. कसे बसे सईला समजावून सगळे डोंगरकडे निघाले .मागे भीमाई ने जोर धरला रागावलेल्या पोरावांनी लाटा उसळत होत्या . आणि वरून इंद्राराजेच तांडव चालू झाले. जणू आज सर्व काही संपून जाईल असे वाटत होते. इकडे भीमा , सई , राज, रेवती आजी सगळे गावकरी जवळ जाऊन पोहचलो. पाऊस पडल्याचा जेवढं आनंद झाला होता. त्यापेक्षा जास्त चिंता तो कधी थांबेल याची होती . आम्ही सर्व सुरक्षित जगी तर पोहचलो पण घर आणि घरातलं सामान ची काय हालत होणार होती हे कोणालाच माहित नव्हतं.

ती पूर्ण रात्र सगळे तिथेच होते . पण पाऊस काही थांबायचं नाव घेईना . सकाळ झाली तरीही पाऊस तसाच होता. वरून गाव दिसतही नव्हत.दुपार होता होता पाऊस थोडा कमी झाला . चार. वाजे पर्यंत पूर्ण थांबला . भीमा आई ही आता शांत झाली होती . हळू हळू गावकरी अन् सरकारी माणसे खाली येऊ लागली .मागे मागे मी अन् सई पण खाली आलो. पण पाऊस सर्वकाही घेऊन गेला होता. पाणी तर ओसरून गेला पण कुणाचं घर कुठे हे सुध्दा कळत नव्हते. झाडे मोडून पडली होती, छप्पर तर कुठल्या कुठे उडून गेले होता. मोडून पडलेल्या अर्ध्या भिंती मात्र होत्या . सई तर जागीच बसली अन् ओरडली ए भीमा आई मी तर फकस्त शेतीसाठी पाणी मागितले तू तर माझ घरचं घेऊन गेली . भीमा आईच हे रूप पाहून सगळेच हादरले होते. कळत नव्हते ,काय करू नी काय नाही. 

मोडलेली झाडे , तुटलेली घरे , पसरलेल्या घरातल्या वस्तू या सर्वातून मार्ग काढत सर्वजण आपापले घर शोधत होते. मोडक्या झाडावर पुन्हा आपले घरटे बांधनाऱ्या पक्ष्यांना पाहून सर्वांनी पुन्हा स्वतःला सावरायचं ठरवले. पुन्हा तेवढ्याच जोमाने घर बनवयला सुरवात केली.

जीवन आहे तर जगत राहावं , दुःख आले की थांबू नये 

पुन्हा उभे राहावे जगण्या , हेच तुझे आयुष्य खरे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy