एक चहाची टपरी
एक चहाची टपरी
पाणावलेल्या डोळ्यांनी तो एकटक त्या दिशेने पाहत होता ,जणू काही कोणाची वाट बघत असावा. टपरीवाल्याने आवाज देताच तो भानावर आला. आणि चहाचा तो प्याला घेऊन तो निघून गेला .
चहा घेऊन मी पण तिथून निघाली.पण सारखा त्याचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता . वाटत होतं तिथे परत जावं अन् विचारावं त्याच्या बद्द्ल, पण घरी जायला उशीर होत होता . आई वाट बघत असेल म्हणून मी निघाली. घरी पोहचून आईला थोडी कामात मदत केली .मग आतल्या खोलीत गेले. अजूनही तो चेहरा , ते विचार माझ्या मनात येत होते. रजनी ए रजनी बघ मी तुझ्या आवडीचा गाजरचा हलवा केलाय. आईच्या आवाजाने मी भानावर आले. आईने अग कधीची आवाज देतेय मी , कुठे लक्ष आहे तुझ ? काही नाही आई म्हणत मी आईशी गप्पा मारत बसले.
मी रोज त्याच रस्त्याने जात येत असे , आणि कधी मनात असल की चहा घेत असे . रोज येत जाता मी त्याला तिथेच बसलेल पाहत होते. आणी नकळतच माझे पाय तिथेच जाऊन थांबायचे. खुप दिवस झाले होते जवळ जवळ ४ आठवडे झाले होते .माझ्या मनातले विचारांनी मला हैराण करून सोडले .मी ठरवलं आज मी त्याच्या बद्द्ल सर्वकाही माहिती करून घेईन .
मी रोज सारखी टपरीवर जाऊन बसली .त्याच्या जाण्याची वाट बघत बसली. तो गेल्यानंतर मी टपरीवल्या दादाला आवाज दिला, दादा तुमची हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का ?
त्याने माझ्याकडे पाहिलं आणि बोलला . विचारा की ताई , तुम्ही रोज येता इथे विचारा काय विचारायचं ते. दादा तो मुलगा इथे बसून असतो ना, तुम्ही ओळखता त्याला ? कोण आहे तो ? आणि इथे बसून तिथे काय बघत असतो ? माझा प्रश्नाचा पाऊस त्याच्यावर पडला अन् त्याचे डोळ्यातही पाणी मला दिसले . मी काही चुकीचं विचारलं का दादा , माझा काही चुकल असेल तर मला माफ करा.
नाही नाही , ताई तुमचं काही चुकल नाही .जो पण इथे रोज येतो तो विचारतो त्याच्या बद्द्ल तुम्हीपण विचारलं. पण कोण आहे तो सांगा ना मला. तो साहिल , दोन वर्षांपूर्वी इथे मुंबईत आला होता. त्याची बायको सोबत आली होती. पावसाचे दिवस होते ते , दादा ओ दादा हा पत्ता सांगता का ? म्हणून हाक मारली त्याच्या बायको अवनीने मला, मी पण भावासारखा तिला पत्ता सांगितला .त्या दिवसापासून भाऊ बहीण झालो होतो .दोन इमारती सोडून तिसरी मध्ये राहत होते . कामावरून जाता येता रोज माझ्या टपरीवर येऊन चहा घेत होते . आल्यावर दोन महिन्यात साहिल ने नवीन दुचाकी घेतली . मग काय , मोटासायकलवर दोघे मनसोक्त फिरायचे .पण चहा मात्र इथेच प्यायचे . सगळ अगदी चांगल चालल होत. बघताबघता पुन्हा पावसाळा आला . जेव्हा कधी दोघं मोकळे असायचे इथेच येऊन बसायचे. अवनी आणि साहिल दोघं मला अगदी जवळचे झाले . त्याची भांडण ,रुसवे , फुगवे, दुःख , आनंद मीही स्वतः त्यांच्या बरोबर अनुभवलं.
पण तो दिवस आणि ती रात्र आठवली की अंगावर काटा येतो. असा वाटत तो दिवसच का आला असेल. असा काय झाला दादा मी त्यांना विचारले , आणि डोळे पुसत ते म्हणाले .
त्या दिवशी अवनी खुप आनंदात होती. सकाळीच आली आणि म्हणाली, दादा आज दुकान लवकर बंद करा आणि इथेच थांबा मी येईन संध्याकाळी तेव्हा आपण तिघे बाहेर जाऊ .तुम्हाला आणि साहिलला काहीतरी सांगायचं आहे साहिल पण येईल . एवढ सांगून ती निघून गेली. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे साहिल इथे आला .मीही माझं आवारत होतो .अवनी आली की लगेच निघू असा म्हणून तो चहाचा प्याला मी त्याला दिला. अवनीनेने चारला येईन सांगितलं होता . चारचे पाच झाले पण आम्ही येवढं लक्ष दिलं नाही कारण ती कधी कधी पाच पर्यंत पण येत असे. पण जेव्हा पाचचे सहा आणि सात झाले तेव्हा मात्र आमची काळजी वाढली. तिला फोन केला तर फोन लागत नव्हता. ऑफिस मधेही कोणी फोन उचलत नव्हते.
आणि या सर्वामध्ये पावसाचा जोर वाढला .तुम्हाला तर माहीतच आहे ना पाऊस चालू झाला की ,गाड्या ही बंद होतात. म्हणून आणखी काळजी वाढली.ती कुठे अडकली तर नसेल . निघाली असेल ना ? हे सारं होतच होता की साहिल म्हणाला दादा, मी तिच्या ऑफिसच्या दिशेने जातो बघतो ती कुठे दिसते का? ती इथे आली की मला सांगा .येवढं पावसात माझ्या किती समजवल्यावर सुध्दा तो थांबला नाही.गाडी घेऊन निघाला . मी अजूनही अवनीला फोन करत होतो की ती फोन उचलेल . रात्रीचे ११ वाजले होते पण अवनीचा काहीच पत्ता लागला नाही. साहिल सुध्दा परत आला. अवनीच्या सर्व ऑफिसातल्या लोकांना आम्ही फोन केला ,पण कोणालाही माहीत नव्हते अवनी कुठे होती .
शेवटी आम्ही पोलीसात जायचं ठरवले, तेवढ्यात अवनीच्या नंबर वरून फोन आला. समोरून एका माणसाचा आवाज ऐकू आला , कोण बोलतंय ? मी उत्तर दिलं मी रमेश हा फोन नंबर माझ्या बहिणीचा आहे. तुम्ही कोण ? मी विचारले , मी इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय तुम्ही ताबडतोब सिटी हॉस्पिटलला या. मी साहिल कडे पहिलं आणि म्हणालो चल लवकर आपल्याला हॉस्पिटलला जायचे आहे. साहिल कडे प्रश्न होते पण मी त्याला बोलू दिले नाही आणि लगेच तिथे पोहचलो . हॉस्पिलमध्ये तिसरा मजल्यावर ३०१ खोली जवळ पोहचलो .तिथे इन्स्पेक्टर उभे होते. मी आणि साहिल गेलो आणि म्हणालो मी अवानीचा भाऊ आणि मी तिचा नवरा. काय झाले आहे इन्स्पेक्टर मोहिते तुम्ही इथे का बोलावले आम्हाला उलट अवनी भेटत नाही म्हणून आम्हीच पोलिस कडे जाणार होतो. बोला ना काय झाले ?
हे बघा अवनिचा अपघात झाला आहे , ती रस्त्यापलिकडे जात होती पाऊस जोरात होता .त्यामुळे गाडीवाल्याला अवनी दिसली नाही , आणि अपघात झाला .पण त्याला काहीतरी जाणवलं आणि त्याने गाडी थांबवली.तिला हॉस्पिटलमध्ये आणले . तिचे ऑपरेशन चालू आहे .तिचा फोन सापडला आणि तुमचे कॉल बघून आम्ही तुम्हाला कॉल करून बोलावले. त्या परिस्थितीत कळत नव्हते त्या गाडीवल्याला ओरडायचे की आभार मानायचे अवनिला हॉस्पिटलमध्ये आणल. अवनी अजूनही जगण्यासाठी लढत होती .आम्ही देवाकडे मागत होतो की तिला लवकर बरे कर. डॉकटर बाहेर आले आणि विचारले अवनी गरोदर होती हे माहीत होत तुम्हाला सॉरी पण आम्ही मुलाला नाही वाचवू शकलो . आम्ही एकमकांकडे पाहत होतो , तर ही गोड बातमी अवनी देणार होती . आम्ही स्वतः ला सावरले , आणि विचारले अवनी कशी आहे ? ती अजूनही जगण्यासाठी लढत आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत. असे म्हणून ते आत निघून गेले .तिथे उभी ती जोडपे साहिल जवळ आले , बोलले आ आम्हाला माफ करा खरच रस्त्यावर काहीच दिसत नव्हते .ती आम्हाला दिसली असती तर आम्ही गाडी थांबवली असती . काय बोलावे कोणलाच कळत नव्हते . एकच मागणं होते देवा कडे सगळे नीट करा.
पण देवाला काही दुसरच ठरवलं होतं .शेवटी लढता लढता अवनिने पराजय स्वीकारली .सर्व प्रयत्न विफल झाले. अवानिने प्राण सोडले . आम्ही दोघेही एमेकांकडे बघत बसलो होतो . आज आम्ही दोन जीवांना गमावलं होते. दोन नात्यांना गमावले होते. अवनी चे अंत्यसंस्कार झाल्यावर आम्ही घरी आलो .काही दिवस मी तिथेच राहिलो .पण आता जीवन जगायचं आहे , असे थांबून कसा चालणार .मीही उठलो आणि साहिलला समजावले . तोही पुन्हा कामाला जायला लागला .मीही पुन्हा ही टपरी चालू केली.
पण आता इथे ते रुसवे फुगवे नाही, ती मस्ती नाही ,फक्त शांतता असते .नेहमी सारखा आज ही साहिल इथे येतो आणि तास अन् तास इथेच बसून राहतो त्या समोरच्या रस्त्याकडे एकटक बघत राहतो. अवनी नेहमी तिथूनच यायची .त्याला कदाचित कधीतरी ती येईल असं वाटत असेल . पण जाणारं येत असतं का कधी ?
हे सर्व ऐकता ऐकता माझेही डोळे भरून आले , खरच एके काळी जी टपरी ज्यांच्या सुखाचं गीत गात होती .ती आज दुःख रडत आहे . कोण तो अनोळखी चहा विकणारा एवढं जवळचा होऊन गेला की नातेच जोडून बसला . कसं असेल ते साथीदाराच नाते हे अजूनही जोडून आहे . ते ही आजच्या काळात जिथे भाऊ भावला मारायला निघतो . आई वडील ना कोणी विचारत नाही .तिथे हे असे लोक अजूनही आहेत.
जर खरेच असे लोक आहेत तर माणुसकी जपून राहील नाहीतर ...........
