निसर्ग
निसर्ग
हिरव्या हिरव्या झाड्यांच्या मधून वळणदार वळणावर आमची गाडी धावत होती. वाट जणू काही संपतच नव्हती . काही वेळाने थोड्या अंतरावर गेल्यानंतर मिलिंदने गाडी थांबवली. म्हणाला , आता या पुढे आपल्याला चालत पायी जावे लागेल. गाडी जायला पुढे जागा नाही. सगळे आपली बॅग, गरजेच्या वस्तू घेऊन खाली उतरलो.
मग काय पायी प्रवास सुरू झाला. चहुबाजुच वातावरण खूप छान , मनाला आनंद देणारं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट एवढं व्यवस्थित आणि जवळून पहिल्यांदा ऐकतोय असा वाटत होत. वाऱ्यबरोबर हलणारी पाने, बेधुंद वाहणारा वारा, मधेच येणारा फुलांचा सुगंध मन मोहवून टाकायला खूप होता.
मातीचा येणारा सुगंध कमी होता तोच निलय ने आवाज दिला अरे तो बघा धबधबा! सगळ्यांच्या नजरा आश्चर्याने तिथे वळल्या. एखाद्या वाळवंटात पाणी मिळाल्यावर जसा आनंद होईल तसा आनंद आमच्या चेहऱ्यावर होता. निसर्गाचं सौंदर्य एवढं अप्रतिम होत की आता गाडीत असेपर्यंत जो फोन आमच्या हातात होता तो आता बागच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन बसला होता . निसर्गाचं हे सौंदर्य आपल्या फोनमध्ये नाही तर डोळ्यात , मनात क्लिक करावं असा सर्वांना वाटत असेल .
उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी आम्ही थोडे पुढे निघालो .ते पाहून अगदी डोळे तृप्त झाले असे म्हणायला हरकत नाही. वरून येणार पाणी थोडा पुढे जाऊन कितीतरी मंद गतीने , शांतपणे वाहत पुढे जात होत. थोड्या वेळ तिथे बसून मग पुढे जायचं असं आम्हा सर्वांचे ठरल. काही वेळाने आम्ही पुढे जायला निघालो तोच आमची चिमुकली अरण्या ओरडली. आई भूक लागली . तिला पाहून आम्हालाही स्वतः च्या भुकेवर ताबा ठेवता आला नाही .मग काय तिथेच झाडाखाली बसून आपापले डबे उघडले . निसर्गाच्या कुशीत , मोकळ्या आकाशखाली पोटभर जेवण केले. पण खाल्यानंतर मात्र झोपने आम्हाला धरलं , म्हणाली थोडा आराम करा मग पुढे चला. मग काय तीच म्हणणं कोणी मोडू शकत का? अर्धा एक तास शांत झोप काढल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो.
हिरव्यागार झाडाच्या सावलीत चालत आम्ही पुढे निघालो. एक रंगबेरंगी फुलपाखरू तिथच उडत होता. त्याच्या मागोमाग आमची अरण्या छोट्या छोट्या पावलांनी धावत निघाली . मीही तिच्या मागोमाग कोण जाणे कुठे जाऊन पोहचलो. मग अरण्याला घेऊन परत मागे आलो तर नीले आणि अवनी कुठेच दिसेना ? फोन करावा तर फोन लागेना. आता काय करावं ? कुठे जावं ? कळत नव्हते. पण मग विचार केला आपण पुढे जाऊ असं ठरवलं होत .कदाचित नीलय आणि अवनी पुढेच गेले असावेत असं अंदाज धरून मी अरण्याला घेऊन पुढे निघालो .आवाज देऊ लागलो .अवनी ,नीलय तुम्ही पुढे आहात का? पण काही होकार आला नाही . मी तसाच पुढे चालत राहिलो .संध्याकाळ होणारच होती .रवी सुध्दा मावळणयाच्या तैयारीत होता.
आता मात्र माझ्या मनात थोडी भीती वाटू लागली . कुठे अस्तीलते दोघे ? सुखरूप असतील ना .असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले . कारण आजूबाजूला कोणी नव्हत जायला विचारता येऊ शकलो असतो. तेवढ्यात अरण्या हात पकडुन मला बोलू लागली, बाबा जोडी ,बाबा झोडी खरं तर तिला झोपडी असा म्हणायचं होतं . मी बघितलं आणि तातडीने पुढे गेलो . वाटले इथे कोणीतरी नक्की असेल ज्याला माहीत असेल अवनी आणि नीलय बद्दल. म्हणून मी जवळ गेलो ,जवळ जाताच नीलय बाहेर आला बाबा लवकर या लवकर या आत असे म्हणत आतमध्ये गेला .मी थोडा घाबरलो नेमके काय झालंय पण आत गेलो तर पाहिले अवनी खाली बसली होती .एका मातिच्या चुलीवर काहीतरी बनवत होती . तिच्या बाजूला एक ६० ते ७० वयाचा वृद्ध बसला होता. ती म्हणाली या कुठे होतात ? तुम्हाला शोधत शोधत आम्ही इथे पोहचलो तर हे बाबा आम्हाला भेटले. ते म्हणले इथेच थांबा .तुम्ही यालच शोधत. मी ही मोठ्या उत्सुकतेने विचारलं कोण तुम्ही बाबा? तुम्ही इथेच राहतात का? की आमच्यासारखे फिरायला आलात. मी विचारलं तस अवनी ,नीलय आणि बाबा खळखळून हसायला लागले.कारण थोड्या वेळेआधी अवनी ने सुध्दा हेच विचारले होता.
मग अवनी म्हणाली बाबा चार पाच वर्षा पासुन इथेच राहतात. निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन जगतात. त्यांची मुले शहरात राहतात. पण त्यांना तिथं आवडत नाही म्हणून ते इथे एकटेच राहतात. मग बाबा म्हणाले, हो रे लेकरा उभ आयुष्य लेकरासाठी दिले त्यांना हवे नाही ते पुरवले . आता माझा आयुष्य जगतोय आनंदात , सुखाने ! खर तर होता आणखी काय हवे असते . शांत जीवन , निसर्गाची साथ असली की सगळं मिळून जाते.
आता अंधार पडायला लागला होता. मी अवनी कडे पहिला आणि ती म्हणाली चा मुलांनी आता निघायचं आपल्याला .बाबा म्हणाले पोरी तु बनवलेली खीर तर खाऊन जा की तुम्ही सगळे . मला पण बरे वाटेल माझ्या घरून लेकरे उपाशी गेली नाहीत . हो बाबा ती तर खाणार आहोत आम्ही , पण परत तुम्हाला पुन्हा भेटायला ही येऊ. हे मात्र नक्की . कामाच्या गोंधळात स्वतः ला विसरून जातो आम्ही पण या निसर्गाने , तुम्ही आमची आमच्याशी पुन्हा भेट घालून दिली.
खुप आवडेल आम्हाला परत इथे येऊन .तुम्हाला भेटून. या निसर्गाशी मैत्री करून . सर्व काही असेल आमच्या कडे पण ही हिरवळ , हे झरे, धब्धबे , हा सुगंध , हा वारा हे सर्व अनुभवण्यासाठी इथेच यावे लागत . कारण गाड्यांच्या , इमारतीच्या, लोकांच्या गर्दीत हे सर्व मिळत नाही .
म्हणूनच मुलीच्या हक्काने म्हणते बाबा, मी पुन्हा येईन . तुम्हाला भेटायला . मिलिंद हसून तीच्या कडे पाहत होता . झोपडीतून बाहेर पडत आम्ही बाबाकडे पाहिलं .ते अगदी प्रेमाने आम्हाला बघत होते. जणू खर्च आपल्या पोरीला सासरी पाठवत होते. असा वाटत होत त्यांना बघून ,आम्ही पुढे निघालो त्या झाडाझुडपातून चालत. मागे वळून पाहत होतो. तसे ते बाबा , त्यांची झोपडी दुर होत जात होते. जणू काहीतरी दुर जातय आमच्यापासून अस वाटत होत.
मी , नीलय , अवनी अरण्या आम्ही गाडी जवळ पोहचलो , तोपर्यंत अंधार झाला होता . पण सूर्याची जागा आता चंद्राने घेतली होती आणि मोकळ्या अंधाऱ्या आकाशात आता चांदण्या आल्या होत्या. पक्षी आता घराकडे परतले होते. आणि आम्हाला सुध्दा घरी परत जायचे होते. मी गाडी काढली आणि जस जसे पुढे निघालो तो निसर्ग , तो वारा, तो हिरवळ , सर्वकाही दुरावत गेलं .अगदी आपण स्वप्नातून जागे होतो ना तस वाटत होत. पण आम्ही बरोबर जे काही अनुभवलं ते घेऊन जात होतो. आम्ही बाहेर गाड्यांच्या गर्दीत हरवून जाणारं तेवढ्यात अवनी ने विचारले मग परत कधी यायचं निसर्गाच्या भेटीला. मी हसलो आणि म्हणालो आधी घरी तर पोहचू दे मग ठरवू पुढं.
