स्त्रियांवरील अत्याचाराला जबाब
स्त्रियांवरील अत्याचाराला जबाब


दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण खूप वाढत आहे. मला वाटते यात कुठेतरी समाजच जबाबदार आहे. जेव्हा एखाद्या स्त्रिवर अत्याचार होतो तेव्हा तिच्यावर अत्याचार करणारा हा एक पुरुषच असतो, तिला सहानुभूती देणारी एक स्त्री असते, पण दुःख व्यक्त करणार तो एक पुरुषच असतो ना ...
कारण ती कोणाचीतरी बहीण कोणाची तरी लेक, कोणाची भाची तर कोणाची तरी पुतणी तर कोणाची मैत्रीण असते ती म्हणून या सर्वाला पुरुष जबाबदार नाही तर कारणीभूत आहे त्याची प्रवृत्ती......
अशी प्रवृत्ती निर्माण करायला सर्वस्वी जबाबदार आहे सुशिक्षित समाज.....
कारण भारताला तरुणांचा देश म्हणून संबोधल्या जाते आणि आजची तरुणपिढी मायाजालाच्या फासात अडकून आपलं जीवन उद्धवस्त करीत आहे. आज गरज आहे आत्मचिंतनाची.....
अरे आज धकाधकीच्या जीवनात माणूस कुठेतरी माणुसकी हरवून बसलाय.... या धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून बघा हा जीवन खूप सुंदर आहे. आज स्पर्धेच्या विज्ञानाच्या युगात माणूस मशिनी तर खूप बनवतोय पण संस्कार कुठंतरी अपुरे पडत आहेत सगळ्यांचं एकच ध्येय असते, पैसा आणि इज्जत बस. पण त्यापलीकडेही जीवन आहे. आज गरज आहे आपल्या मुलाबाळांना वेळ द्यायची त्यांचेवर योग्य ते संस्कार घडवायची.
"वसुधैवम कुटुंबकम" चा नारा लावणारे आपण आज विसरलोय कि, समाज म्हणजे आपले कुटुंब आहे व समाज असाच बनत नसतो तर समाजाच्या काही रूढी, परंपंरा असतात तसेच संस्कारही असतात.
माझे आजोबा नेहमी सांगायचे त्यांच्या तारुण्यात एक समाजातील प्रतिष्टीत व्यक्ती असायची ती समाजाला समाजाच्या रूढी, परंपरा समजून सांगायची, त्यांच्या मुखातून निघालेला शब्द न शब्द म्हणजे दगडावरील रेखा असायचा म्हणून त्या काळात स्त्रियांवर एवढे अत्याचार व्हायचे नाहीत. पण आज का बर होत आहेत?
आज गरज आहे शिवराय निर्माण करायची समाजाला समाजाच्या रूढी परंपरा संस्कार समजावून सांगायची. दगडाला सहजच देवत्व प्राप्त होत नाही तर त्याला अनेक टाकीचे घाव सहन करून देवत्व प्राप्त करावं लागते . तसेच आपलही आहे. त्या काळातील शिक्षणापेक्षा या काळातील शिक्षणात कुठेतरी कमतरता आहे, म्हणून समाजातील प्रत्येक घटकावर असे संस्कार घडत जातात.
आज स्त्रियांवर अत्याचार झाला कि आपण आठ दहा दिवस समुद्रात अचानक येणाऱ्या वादळाप्रमाणे गर्जत असतो., पण अकराव्या दिवशी काय होते......
आपण सर्व लाटांप्रमाणे शांत होऊन जातो सर्वकाही विसरून जातो. जर या सर्वांचा निषेध करायचा असेल तर वर्षचे तीनशे पासष्टहि दिवस जागे राहण्याची गरज आहे. जर दानवे वृत्तीची एखादी व्यक्ती समाजात आढळली तर त्याला टोकायची नैतिक जबाबदारी आपली असते.
म्हणून हे माणसांनो...... पैश्याचे मागे धावू नका. 'डुकराला गु आणि माणसाला पैसा' इथपर्यंतच मर्यादित राहू नका. समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचा आढावा घेत चला. वाईट गोष्टींवर टीका टिपणी करत चला कारण आपल्याला आदर्श समाज निर्माण करून स्त्रियांवरील अत्याचार नष्ट करायचे आहे. म्हणून सगळ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे......
मग यावर काही उपाययोजना पुढील लेखामध्ये.....