"सरण"
"सरण"
कोरी करकरीत निळी टाटा सुमो विधवा आश्रमाच्या आवारात येवुन उभी राहिली. ड्रायव्हर उतरला व मागचा दरवाजा उघडला आतून एक माणूस उतरला आणि थेट आश्रमाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाला.पांढरा कुर्ता-पायजामा,गळ्यात रुद्राक्षाची माळ,कपाळी चंदनाचा टिळा.एकंदर फार आकर्षक व रुबाबदार व्यक्तीमत्व दिसत होते.
ती व्यक्ती कार्यालयात दाखल झाल्यावर ड्रायव्हरने मागचा दरवाजा बंद केला आणि जवळच्या
चहा टपरीवर गेला.ती व्यक्ती कार्यालयात दाखल होतांना तिथल्या हेडबाईंनी त्यांच स्वागत केलं.
"महोदयांच स्वागत असो!"
महाशयांनी मान हलवुन स्वागताची स्विकृती दिली.
खुर्चीत बसुन आश्रमाच्या कामकाजा बध्दल त्या
बाईशी चर्चा करु लागले.हेडबाई प्रत्येक प्रश्नाला
खुलासेवार उत्तर देत होत्या. त्या बाईच्या बाजुला
आश्रमाचे काम पाहणारे दोघेजन मदतनिस उभे होते.
"काळे मँडम, या आठवड्यात एखादी नवीन बाई आली का आश्रमात?" महाशयांनी विचारले.
"हो,एक तरुण विधवा आली आहे.तिचं कोणी नाही.लोकांच्या वाईट नजरातून वाचण्या साठी ती ईथे
आली.शिवणकाम,भरतकाम शिकुन स्वत:च्या पायावर उभी राहण्याचा तिचा संकल्प आहे!"
बाईंनी एकादमात तीची माहिती सांगीतली.
"व्वा छान ,तिला ईथले सर्व नियम समजावुन सांगा!" महाशय हसत बोलले.
"बर ठिक आहे.येतो आम्ही!"
"चहा बिस्किटे घ्यावं म्हणते!"
"नको आम्हीं गडबडीत आहो!"
ती व्यक्ती घाईत निघाली गाडीत बसली गाडी
पाहता पाहता धुळ उडवित निघूनही गेली.आश्रमाच्या वातावरणात सैलपणा आला व परिस्थिती मुळ पदावर आली.
कमलला येऊन फक्त दोन दिवस झाले होते.ती सर्व विचार करुन आश्रमात आली होती.ती परिस्थितीने खुप पोळली होती. आश्रमात राहुन शिवनकाम भरतकाम शिकुन स्वता:च्या पायावर उभी
राहिन या विचाराने ती प्रेरीत झाली होती.ईथलं वातावरण पाहुन तिच्या आशा आकांक्षा उंचावल्या होत्या.
वनीताशी थोडय़ाच दिवसात तिची मैत्री झाली.
त्या दोघी एकाच खोलीत राहात होत्या.दोघींच्या आवडीनिवडीही सारख्या असल्याने त्यांचं जास्तच
पटत होतं.कमल सारख्या तरुण आणि सुंदर मुलीनं
या आश्रमात राहवं हे वनीताला पटलं नव्हतं.एक दिवस तिला राहवल्या गेलं नाही आणि बोलली.
"तू ईथे यायला नको होतं.तू दिसायला सुंदर व
देखणी आहे.ईथे वासनांध कोल्हे भटकतात कधी
ज्वानीचे लचके तोडतील काही नेम नाही!" वनीता
"सगळेच सारखे नसतात आणि माझ्या इच्छे विरुध्द काहीच होऊ देणार नाही.माझा माझ्यावर पुर्ण विश्वास आहे.मी परिस्थिती मुळे ईथे आली.माझा नवरा मरुन तीन महीने झाले माझ्या दिराची त्याच्या
बिघडलेल्या मित्राची नजर माझ्या वर होती.म्हणून मी आत्मविश्वासाने ईथे आली आहे!" कमल
"तू मला आत्मविश्वासाच्या गोष्टी सांगू नको,ईथं रक्षक नाही भक्षक राहतात.मला तुझी दया येते.तू आली तशी लवकर ईथून निघुन जा!" वनीता
"घाबरू नको, मी येणाऱ्या संकंटांना तोंड देईन अन् तुझ पण रक्षण करीन!" कमल
वनीताने तिला खुप समजावण्याचा प्रयत्न केला पण कमलवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
रात्रीचे जेवणं आटपली सगळ्या झोपायच्या तयारीत होत्या तेव्हां हेडबाईंनी त्यांच्या खोलीत प्रवेश केला.
"कमल कशी आहे काही अडचण!" हेडबाईंनी
"मी चांगलीं आहे,सगळं ठिक आहे!" कमल
"मी काय म्हणते तू माझ्या सोबत राहिली तर फार बरं होईल आणि तू हुशार आहे मला माझ्या कामात तुझी मदत होईल.माझं काम तेवढच कमी होईल.तू दिसायला सुंदर अन् तरुण आहे.तुला माझ्या सोबत राहून खुप शिकता येते. आफिसचे काम पाहिलें तर तुला फायदा होईल. पुढें तू हेडबाई होणार
सगळा कारभार तुझ्या हाती येणार.आणि तुझ भविष्य उज्वल होणार.माझ्या सोबत सुरक्षित राहशिल.तरुणपण बाईच्या जातीला शाप आहे.!" हेडबाई
हेडबाईंचं आपुलकीचे व सहानुभूतीचे शब्द ऐकुन ती भारावली आणि वनीताला राग पण आला. तीच वाईट असेल.ती हेडबाई सोबत राहू लागली.बाईंनी तीला आईची माया दिली.तीचे आईवडील ती लहान असतांना वारले.मामांनी तिचे पालन पोषण केले सातवीं पर्यंत शिकविले आणि गरीब मुलाशी लग्न केले जबाबदारीतून मुक्त झाले. पण तिथेही तिला सुखाचा घास भेटला नाही. तिच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला.अठरा विश्व दारिद्रय अन् पती दारुड्या दिराची वासनांध नजर मीत्र जमवून छेडछाड करायचा.त्यात दारुड्या पती अपघातात वारला आणि ती तरुपणातच विधवा झाली. तीथे ती निराधारी झाली.
दोन महीण्यात ती हेडबाई सोबत राहून आश्रमातील बरेच कामं शिकली होती. सुंदर हस्ताक्षर असल्यानं बाईनी तीला आँफीसचे काम करायला सांगितले.ती मनापासून काम करत होती. एक दिवस हेडबाईंनी तिला बोलावुन तयारी करण्यास सांगितले
आँफीसच्या फाईली तयार करुन ठेवायला सागितले. आणि बाई म्हणाल्या
"हे बघ कमल,अपल्याला अध्यक्षांच्या बंगल्यावर फाईलवर सह्या घेण्याकरीता जायचे आहे.माझ्या नंतर तुलाच हे सगळं सांभाळायचं आहे अध्यक्षा कडून सगळ्या गोष्टी नीट समजावुन घ्यायच्या आहे.आणि हो तुला मी आश्रमाची असिस्टंट म्हणुन त्यांना मागणार आहे!"
कमल खुप खुशीत होती हेडबाई किती प्रेमळ आहे. माझी किती काळजी घेतात. हे जाणुन तीने हेडबाई कडे कृतार्थ नजरेने बघीतले. असिस्टंट
म्हणुन बढती मीळणार या वीचाराने ती सुखावली
होती. जवळ असलेल्या साड्यातुन एक बऱ्यापैकी
साडी नेसून व वेणी फणी करुन ती हेडबाई पुढे उभी राहिली तीला हेडबाईनी निरखून बघितले आणि म्हणाल्या.
"छान दिसतेंस ग..पण ती साडी बदल किती जुनाट वाटते.तुला माझी नवीन साडी देते!" हेडबाईंनी तीला चांदण्यांची बुटीअसलेली निळ्यारंगांची साडी नेसायला दिली.त्या साडीत तीआकाशातील तारके समान दिसत होती.तीला पाहुन हेडबाईच्या ओठावर रहस्यमय हासू उमटलं पण त्या हास्याचा अर्थ कमलला कळला नाही आणि कळणार पण नव्हता.
नवसाच्या बोकडाला सजवतात तस तीला बाईने सजवलं होतं तीच्या केसात गजरा माळुन दिला.
बाहेर साहेबांची कार येऊन उभी रिहीली गाडीत फक्त डाँयव्हर होता त्याने हाँर्न वाजवुन गाडी आल्याची सूचना केली. हेडबाई लगबगीत तीला घेऊन गाडीकडे आल्या.त्यांच्या हातात दोन तिन फईफाईल होत्या.कारचा मागचा दरवाजा उघडा होता. बाई भसकन गाडीत बसल्या कमल मनातुन जरा कचरली कारण ती आतापर्यत कुठल्याच गाडीत बसली नव्हती.हेडबाईंनी तीचा हात धरुन कारमध्ये ओढले .बाईच्या जवळ ती सावरुन बसली पण मनात
एक प्रकारच्या भीतीनं घर केलं होतं.
कार सुसाट वेगाने डांबरी रस्त्यावर धावू लागलीं. कारमध्ये पहिल्यांदा बसल्याने तीला मजा वाटू लागली.उंच उंच पळणारी झाडे व मागे धावणारी
घरे पाहुन तीला नवल वाटत होते.चौकातील झाशीच्या राणीचा पुतळा पाहुन तीला स्फुरण पण चढले होते.एकदम तिला अध्यक्ष आठवले.ते कोणते प्रश्न विचारतील त्यांना काय उत्तर द्यायची ती वीचार करु लागली.तेव्हड्यात गाडीने वळण घेतलं गाडी बंगल्याच्या पोर्च मध्यें थांबली.दोघी गाडीतून उतरल्या बाईने फाईली कमलच्या हातात देत म्हणाल्या..
"घाबरु नको साहेब फार चांगले आहेत!"
त्या दोघी अध्यक्षाच्या बैठकीत आल्या तेव्हा ते वर्तमान पत्र वाचत होते.
"या..या.. काळे मँडम या..बसा!" अध्यक्ष
अध्यक्षांनी कमलच्या देहावर नजर फिरवीत म्हटले.
"मँडम..एवढ सुंदर कमळ कोणत्या चिखलात उमललं म्हणायचं!" अध्यक्ष
"इथलीच आहे... बोरगावची!" मॅडम
"व्वा..व्वा ...फार छान आहे निवड तुमची!" अध्यक्ष
हेडबाईनी नुसत्या हसल्या.दोघी नरम सोफ्यावर
बसलेल्या होत्या कमलने ती भव्य बैठक नजरेने न्याहळली.मध्यभागी मोठे पण किमती झुंबर टांगलेलं होतं.भिंतीवर जंगली श्वापदांचे मुखवटे पेंढा भरुन लटकविले होते.ती मनातुन घाबरली होती.
"मॅडम.. एका नजरेत कमलची असिस्टंट म्हणुन निवड केली.व्वा..छान!"
बाईनी टि टेबलवर फाईल ठेवल्या होत्या त्यातील एक फाईल उचलून अध्यक्ष चाळू लागले.कमलवर नजर टाकुन तीला वीचारले.
"तुझ नाव काय,शिक्षण किती झालं !"
"माझ नाव कमल सातवीं पर्यंत शिकली!"
"सुंदर हस्ताक्षर आहे,उद्यापासुन तू बाईची असिस्टंट .पागर पण चांगला मिळेल!" अध्यक्ष
"या सगळ्या फाईल कमलने तयार केल्या आहे.!" हेडबाई
"तुला पुढें शिकायची ईच्छा आहे कां?" अध्यक्ष
"हो.. मला शिकायचं!"कमल
" ठिक,तुझ्या शिक्षणाचा खर्च आम्हीं करु. मँडम, ती संस्थेच्या अनुदानाची फाईल आणली कां?"
अध्यक्षांनी हेडबाईकडे पहात सुचक ईशारा केला. हेडबाईंनी टिटेबल वरच्या फाईली उगाच खालीवर केल्या.आणि बोलली
"नाही साहेब...मी आणायची विसरले.काढुन ठेवली होती पण गडबडीत विसरले.मी घेवुन येते. कमल या फाईल मधील नोंदी मी येवो पर्यंत साहेबांना समजावुन सांग!"
"मी पण येते!" कमल
"नाही... तू ईथेच थांब.मी लवकर येते!" हेडबाई
हेडबाई निघुन गेल्या काही वेळ पर्यंत वातावरण शांत होतं.कमलला काय बोलावं हेच कळेना.ती अंग चोरुन बसली होती.साहेब फाईलीतील कागदावर नजर फिरवता फिरवता कमल कडेही चोरट्या नजरेने पहात होते.त्यांच्या नजरेत तीला वासनां दिसली. तीची छाती धपापत होती.
"कमल तू अशीच व्यवस्थित काम करीत राहिली तर आम्ही तुला आश्रमाची हेडबाई बनवू.तुला आवडेल ना!" अध्यक्ष
"हुं.... मी काम करेन ....!" ती घाबरत बोलली.
"तू घाबरू नको.तू आता असिस्टंट झाली आहे.मी खुष आहे तुझ्या... कामावर.कळलं.
आश्रम आणि ....हा बंगला सुध्दा आपलाच समजायचा.चहा काँफी घेते कां? अध्यक्ष
"नाही मला काही नको!"कमल
" तुला बंगला आवडला नाही वाटतें. त्या फाईली बाजुला ठेव .टिव्ही बघत बस.बाई येई पर्यंत मी माझ काम आटपुन घेतो!"अध्यक्ष
साहेब जीना चढुन वरच्या मजल्यावरील खोलीत गेले. तेव्हां ती बरीच मोकळी झालीं. कमललने टिव्हिवर लहान पणी दुसऱ्याच्या घरी रामायण महाभारत पाहिले होते.ती उठली अन् टिव्ही सुरु केला.टिव्हीवर डिस्कवरी चैनल चालु होते.निरनिराळी जंगली प्राणी पाहुन तीला मजा वाटु लागलीं. थोड्या वेळा पुरती ती स्वता:ला विसरली होती.तेवढ्यात जीना उतरतांना साहेबांच्या चपलाचा आवाज़ तीच्या कानी पडला. साहेब बैठकीत आल्यावर ती उभी राहीली.
"बस...बस...उठतेस कशाला हे आश्रमाचे आँफीस नाही. आज तू आमची खास पाहुणी आहे.हे बघ तुझ्या साठी खास पेय आणलं.!"
"नाही मी घेत नाही."कमल
" नाही कसं नाही.तू घेतलं नाही तर आम्हाला वाईट वाटेलं.आमच्या बंगल्यावर पहिल्यांदा आली तुला घ्यावंच लागेल......फक्त माझ्यासाठी!"अध्यक्ष
अध्यक्षांनी तीचा हात धरुन जवळ ओढले व जबरदस्तीनं ग्लास तीच्या तोंडाला लावला.ती त्यांच्या मीठीतून सुटण्याचा असफल प्रयत्न करु लागली. टिव्हीवर हरणांचा कळप तलावावर पाणी पितांना दिसत होता.काही हरीण मान ताठ करुन आजुबाजूची चाहुल घेत होते.तेवढ्यात त्यांना कुठेतरी धोक्याचा ईशारा मिळाला व एकमेकांना सावध करून चित्कारत जीव घेवुन पळु लागले. बाजुच्या झाडीतुन वाघ बाहेर आला.त्याने मोठी झेप घेवुन एका हरीणीस आपल्या कचाट्यात पकडले.ती हरीण जीवाच्या आकांताने ओरडली तडफडली पण त्याच्या मजबुत पंज्याच्या पकडीतुन तीला सुटता आले नाही.क्षणार्धात सारं काही संपलं होतं ती निपचित पडली होती.
एक वादळ आलं न संपलं अस्ताव्यस्त झालेलं शिवार मात्र शिल्लक राहिलं होतं कमलची तीच अवस्था होती.ती भानावर आली तेव्हां तीच्याजवळ
हेडबाई होती.ती तीला बिलगून धाय मोकलुन रडू लागली.बाईने खोट सांत्वन केलं.त्या दोघी आश्रमात आल्या तशी तीने वनीता कडे धाव घेतली तिच्या कुशीत शिरली.
संपलं.....संपल.....सारं... म्हणत म्हणत ती कोसळली अन् गतप्राण झालीं एका अबलेची चिता निर्दयी व्यवस्थेने पेटविली.सरण धडाधडा पेटलं अन् राख झालं.
