Amol Kamble

Tragedy

2  

Amol Kamble

Tragedy

प्रेतावर सापडलेलं बाळ

प्रेतावर सापडलेलं बाळ

5 mins
1.1K


खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे,पुणे स्टेशन सर्वांच्या रहदारीसाठी खुलं होत. ट्रेन तो आवाज त्याच आवाजात माणसांचा गोंगाट, काळजावर पाय ठेऊन चालणारी माणस आणि त्यांनी निर्माण केलेली गर्दी. त्या विळख्यात फार जडखुन गेलो होतो. मनाला शांतता मिळावी म्हणुन मी आज असं ठरवलं कि पुणे स्टेशन वर थोडा वेळ थांबायचं. त्यावेळी मला त्या स्टेशन वर येणाऱ्या प्रत्येकाचं मला नवलच वाटायचं. कोण कुणाचा नव्हता बरं का ?. ते चल विचित्र आवाज मनाच्या काळजात ठाम करून बसले होते.कारण माझा आणि पुना स्टेशन चा दररोज चा संबंध असायचा कारण जॉब माझा पुण्यातच असायचा.त्यामुळे ते आवाज माझे होते.पण खरंतर आता नवलच वाटायला लागलं होत. दररोज दिसणारी ती गरीब महिला आज स्टेशनवर भीक मागताना दिसली.थोडा वेळ मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून तिच्या कडे बघत बसलो, मला असं वाटत होत हि कदाचित घाबरली असावी. मी तिच्या जवळ जायचो तर ती घाबरायची आणि पुढे धावायची.त्या स्टेशन वरची सर्व माणस माझ्या कडेच पाहत होती.ती थांबली. ती तिच्या सोबत असणाऱ्या बाळाला तिच्या कवेत घेऊन रडतं होती.मी माझ्या जागीच थांबलो. मला प्रश्न पडला कि या बाई कडे आज हे मुलं कुठून आलं.हिने कुणाचं बाळ पळून तर आणलं नाही ना? असे अनेक प्रश्न मनात बोलत होते. आता तिच्या जवळ जावं तरी कस ती एवढी रडत होती कि बोलून सोय नाय.१५ मिनिटानंतर ती शांत झाली,परंतु तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाझरलेल्या झऱ्या गत वाहत होते.आता मी धीर केला कि हिला विचारायचं.तो तिचा घाबरलेला चेहरा माझ्या मनाशी बोल्त होता कि बाळ कदाचित हिचच असावं .मी धीर करत तिच्या जवळ गेलो.आता मात्र ती घाबरलीच नाही.मी तिला विचारलं

मी :-बाई हे मुलं कुणाचं? तुमच्या हातात तर या आधी कधी भीक मागताना हे मुलं मला कधीच दिसलं नाही.

तेव्हा ती बोली अहो

भिकारी बाई :- तुम्हांला फक्त मुलं जन्माला घालायला येतात पण... पण विचार करा ना !!! आम्हा स्त्रियांना त्या बाळाला सोडता येत नाही. कारण त्या बाळाचं मन फक्त मातेलाच समजू शकत.

मी :-पण बाई या आधी तुमच्या हाती फक्त तो भिकेला कटोरा पहिला, मुलं आज अचानक कस? बाई खरं सांगा नाही तरी मी पोलिसांना बोलवेन हा.

भिकारी बाई :-पोलिसांना बोलवा पण मला सांगा या बाळाला त्याची आई परत मिळेल का ?

ह्या तिच्या प्रश्नाने माझ्या डोळ्यावर आलेली झोप उडुन गेली.ती बाई अशी का बोली असेल असा विचार मनात परत कुजबुज करत होता.मी काही चुकीचं तरी काही बोलो नाही ना.


मी:-म्हणजे हे मुलं!!!

भिकारी बाई :- अहो हे मुलं एका भीक मागणाऱ्या आई च्या प्रेतावरून मिळालेल मुलं आहे..

मला एकदम धक्काच बसला मेलेल्या प्रेतावरच बाळ,अजून भयानक विचारत मनात खालावत होते.

मी:-म्हणजे या बाळाची आई मेलीती हसली आणि म्हणाली

भिकारी बाई :- साहेब या मुलांची आई हे जग सोडून गेली परंतु या मुलाला त्याच जीवन आहे.त्याला जगायचा अधिकार आहे,परंतु किती तरी वेळ ते मुलं त्या मेलेल्या आई ला जाग करत होत.त्याची आई आता उठेल त्याला दूध देईल म्हणून ते जिवाच्या आकांतात मोठ्या मोठ्याने टाहो फोडत होत.

साहेब मला वाटल कोणी तरी येईल त्या भिकारीच्या प्रेताला मदत करेल परंतु त्या वेळी कोणीच पुढे आलं नाही.कारण ती भिकारी होती म्हणून

कोणीच आलं नाही.येणारी जाणारी माणस फक्त त्या रडत्यामुलाचा आवाज ऐकत होते,कोणी तर मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत होते.शेवटी काय एक

भिकारीला भिकारीच मदत करू शकते.मला त्या मुलाचं रडणं राहवलं नाही म्हणून मी त्या बाळाला माझ्या आई च्या ममतेचा आधार दिला. त्या

बाळा ला दिला.ते बाळ माझ्या कुशीत येऊन शांत झोपून गेलं.पण त्या बाळाची आई मात्र त्या जागेवर शांत पडलेली होती.ते बाळ उठलं त्याच्या आई

कडे बघून परत रडू लागलं.त्या वेळी मला समजलं लहान बाळ जरी असेल ना तरी त्याच्या आई ची ममता त्याला ओळखता येते.त्यावेळी मी ठरवलं

अनाथांना जगायला शिकवायचं.आणि त्यांना आसरा द्यायचा.साहेब खरचं !! मी हे बाळ नाही चोरलं.


ती बाई रडू लागली मी मागे वळालो मला हि रडू अनावर झाले.त्यावेळी खरचं आई ची महती मला कळाली.परत मी त्या बाईकडे बघितलं तर ती त्या मुलाजवळ खेळत होती.त्या बाळाकडे व त्या बाईकडे बघून माझ्या आई आणि माझ्या बालपणाची आठवण आली.मी पण त्या बाळाला घेऊन त्याच्याजवळ खेळू लागलो. आतच स्टेशन वर पण खूप उशीर झाला होता जाता जाता त्या बाई ना मी विचारलं

मी:-काय हो !!! बाई तुम्हांला एवढं ज्ञान आहे,आणि मला तर असं वाटत कि तुम्ही खूप शिकल्या आहे.

भिकारी बाई :-हो साहेब ,पण विचार आणि अनुभवाने मी खूप काही शिकली आहे,आता बघा ना हे नवीन मुलं माझ्या पदरात पडलं.आणि साहेब एक बोलते शिक्षणाने ज्ञान मिळत,पण त्याच बरोबर अनुभवाने आपण स्वतः घडत असतो.पण ते घडत असताना तुमच्या बरोबरच्या व्यक्तीला विसरायचं

नाही.कारण तो तुमच्या वर विश्वास ठेवतो.

मी :-हो बरोबर आज खरचं मला समजलं माणुसकी हि फक्त पैशाने नाही तर अनुभवाने सुद्धा मिळवता येते.

थोडा वेळ त्या बाईच्या डोळ्यात पाहत तिच्या डोळ्यात तो आई चा आनंद मला दिसला. परत मन माझं अजून काही तरी बोल म्हणून बोललं )

मी :-बाई चला खूप वेळ झाला आता निघायला हवं... पण मी काय बोलतो तुम्ही भीक का मागता? तेव्हा ती बोली कि

भिकारी बाई :-मी भीक मागते ती समाजातील माणुसकीची पण ती माणुसकी माझ्या या रिकाम्या कटोऱ्यात कोणीच टाकत नाही फक्त टाकतात,ती अनाथ मुलं हि पोरं मी माझ्या पोरागत त्याचा सांभाळ करते, खूप शिकवते आणि त्यांना त्याच्या स्वप्नांबरोबर उडायला शिकवते


तिचे ते बोलणे ऐकून मनातील दुःख जागी झाली मी खिशात हात घातला तर माझ्या खिशात तेव्हा फक्त १० रु. शिल्लक होते.मी ते १० रु. त्या बाईच्या कटोऱ्यात टाकले.तेव्हा ती बोलते

भिकारी बाई :-साहेब मी पैशांची भीक कधीच मागत नाही आणि जर का मागितली असती तर आज मी या प्लॅटफॉम नसती.पण साहेब मला आज खरचं या पैशाची गरज नाही कारण मला आज तुमच्या डोळ्यांतील माणुसकी माझ्या पदरात पडली हीच माझी भीक असं मी समजते

त्या कटोऱ्यातील ते १० रु. त्या बाईने मला परत केले.मी ते खिशात न टाकता त्या लहान बाळासाठी दुधाची पिशवी आणून दिली.तिने ते दूध घेतलं.आणि त्या बाळाला पाजलं.त्या बाळाचं पोट भरलं ,राहिलेलं दूध तिने कवटीला असलेली बाटली मध्ये ठेवलं. आणि ती पुढे गेली. अजून पण मी तिथेच उभा होतो ते बाळ आणि ती बाई दोघे माय लेका सारखे हसत होते.स्टेशन वर मेलेल्या आईचं ते बाळ मी पाहिलं ते पण जिवंत !!! मी सुंदर हास्य केलं आणि त्या बाई ला हात दाखवून मी माझ्या परतीच्या प्रवास परत घराकडे सुरु केला.ट्रेन आली ट्रेन मध्ये बसलो तेव्हा मी मनाला विचारलं आपण का एवढे कठोर असतो.कि समोरच्याची वेदना,दुःख आपल्या दिसतात पण त्या दुःखात आपण कधी सामील होत नाही.खरचं त्या बाई च्या मनात जिद्द होती.

मित्रांनो खरचं तुम्हांला येता जाताना कोण गरीब दिसला ना त्यांना जरूर मदत करा.दुःख,वेदना जर तुम्हांला आहेत मग ते दुःख एकदा तुमच्या मनावर घेऊन बघा, कारण दुःख मनावर आली कि वेदना आपोआप येतात.माणुसकी जपा... कारण मी त्या बाई कडे ती भिकारी आहे या नजरेनं पाहिलं नव्हतं तर एका बाळाला त्याच्या आईच्या प्रेतावरून उचलताना पाहिलं होत. बघा मृत्यू हा तुमच्या जवळच असतो परंतु त्या मृत्यू सोबत लढता आलं पाहिजे हे त्या बाई कडे पाहिल्यावर समजलं. परत तो विचार करत मी राहिलो असं नाही तर मी अनेक विचार केले पण ते विचार सर्वाना सांगितले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy