Rajendra Vaidya

Tragedy

3  

Rajendra Vaidya

Tragedy

प्रेरणेची फुंकर

प्रेरणेची फुंकर

6 mins
892


प्रिशा आणि उषा दोघी मैत्रिणी. दोघींच्या मैत्रीत खंड पडला तो प्रिशाच्या लग्नामुळे. दोघीही चांगल्या सुसंस्कृत घरातल्या. श्रीमंत हुशार. दोघींची मैत्री शाळेपासूनची. कॉलेजमधेही एकत्र जा.ये. अगदी डबा खाणंसुध्दा एकत्र. अभ्यास एकत्र. कपडयांची निवड सारखीच. दोघीनांही पॉकेट मनी मिळत असे. घरच्या चांगल्या श्रीमंतीमुळे. शाळेच्या शेवटच्या दिवशी दोघीही एकमेकीच्या गळयात पडून मनसोक्त रडल्या. बालपणचं मैत्रीचा धागा इथे तुटला होता, पण पुन्हा कॉलेजमध्ये एकत्र आल्या. दोघींची घर जवळ जवळ. त्यामुळे कुणी एकीच्या मनात आल की ती दुसरीच्या घरी जायची. मनसोक्त गप्पा खेळ, एकत्र एका ताटात जेवणं. फिरायला जाणं. भेळपुरी, पाणीपुरी, कुल्फी, बर्फाचा गोळा खाणं. हवी तशी मजा. उशाचे वडील शाळामास्तर. तरीही घरंदाज श्रीमंत. प्रिशा तर कारखानदाराची मुलगी. त्यात एकुलती एक. त्यामुळे तिच्या लाडाकोडाला बंधन नव्हते. मर्यादा होत्या.

उषाची परिस्थितीही चांगली होती. पण घरात मास्तरकीचा, वडीलांच्या नजरेचा दबदबा होता. तिला वागण्याची शिस्त होती. बंधनं होती घरात साडीच नेसावी लागे. तिला ते आवडल नव्हतं. पण वडीलांपुढे काय बोलणार ? तिच्या आईची रमा काकुंची सुध्दा प्राशा नव्हती, नवऱ्यापुढे बोलायची.

 प्रिशाला खूप श्रीमंत सासर मिळालं. तिचा नवरा परदेशात रहायला होता. प्रिशा दोन तीन महिने इथ रहाणार होती. प्रिशा विमानातून उतरली. एअरपोर्टच्या जमीनीवर पाय ठेवला आणि पहिली आठवण तिला झााली, ती… उषाची. ती कधी भेटेल ? मग आपली गप्पांची मैफत रंगेल. प्रिशाचा भाऊ कार घेऊन तिला घ्यायला आला होता. प्रिशाची मुलगी रमीला आणि मुलगा रवीश. रमीला लहान. मामा दिसल्यावर ती धावत आली. मामाला बिलगली. आता प्रिशा तीन महिने रहाणार होती. तिचं सासर नागपूरला तर उषाचं कोल्हापूरला. एकमेकीची भेट खूपच कठीण.

प्रिशाची नणंद नागपूरला. त्यामुळे तिला भारतात आलं की नागपूरला जावंच लागे. तशी ती आत्ताही गेली. नणंद वीणाला भेटण्यापेक्षा मैत्रिण उषाला भेटण्याची मनाला ओढ लागली होती. कधी ती भेटते. तिच्याशी पोटभर गप्पा मारते, असे तिला झाालं होते. वीणा आणि प्रिशा मंडईत आणि इतर शॉपिंगला बाहेर पडल्या. शॉपिंग झाालं आता भाजी घेऊन घरी जायचं, असं ठरवलं होतं दोघींनी. एक ठिकाणी कचऱ्यातल्या मिरच्या वेचून. सडके बटाटे , टमाटे, मिर्च्यांचे वाटे करुन विकणारी एक बाई बसली होती. तिच्यासमोर एक बाई होती. ती बाई खूप धासाधीस करत होती. ह्या दोघी तिच्या जवळून जाताना तिचं बोलणं प्रिशाच्या कानावर आलं. “आमच्या गावाला तर हे गायी-म्हशीसुध्दा खात नाहीत. आणि तू पाच रुपये सांगतेस. दोन रुपयाला वाटा दे. घेते पाच वाटे”

प्रिशालतो आवाज ओळखीचा वाटला. कधीतरी तो कर्णसंपुटात कायमच गुंजत होता. ती मागे वळाली आणि तिने निरखून त्या स्त्रीचा चेहरा बधितला. तिचे खांदे दाबले.

“अय्या, अग उषे, तू इथे नागपूरला रहातेस म्हणून ऐकलं होतं पण…….आपली लग्नानंतर भेटच कुठे झाली. उषा प्रिशा दोघी कडकडून मिठी मारत भेटल्या. उषाची पाठीची, हाताची, चेहऱ्याची हाडं प्रिशाला टोचली. तिच्या अंगावरची साडीही निकृष्ट आणि खराब होती. एक प्रकारचा उबट वास येत होता.

                  “ तुझं कसं चाललंय ? ”

                  “ ठीक” पण त्यात कडवटपणा जाणवला.

                  “ तुला मुलं किती ? ”

                  “ एकच मुलगी अंकिता “

                  “ नवरा काय करतो ? “

                  “ सरकारी गुदामात सुपरवायझर आहे. सासू आहे. पण सासूरवास खूप करते. अनेकदा आजारी असते, पण मरत नाही.

                  “ अग एकदम तिचं मरण…….”

                  “ जाऊ दे. माझं ठीक. तुझं ?

                  “ नवरा अमेरिकेत त्यामुळे मी तिकडे. मला दोन मुलगे एक अंकुश आणि धाकटा विराट. “

                  “ तुम्ही घरात मराठी बोलता का गं ? “

                  “ हो मी आणि नवरा बोलतो. मुलांना मराठी येतही नाही आणि बोलतही नाही.”

                  “ तिथे तू काय हाऊस वाईफ की…….”

                  “ नाही, माँटेसरी चालवते. तेवढाच वेळ जातो.

                  “ वा. सगळ कसं छान आहे तुझं. असू दे. असच असू दे.

वऱ्हाडी उन्हाळयात भरदुपारी ह्या गप्पा मारत उभ्या. शेवटी प्रिशाची नणंद म्हणाली.

         “ चला त्या समोरच्या हॉटेलात. आईस्क्रिम खाऊ. जरा बरं वाटेल”.

         

उषा आईस्क्रिम खाऊन वैशारवातल्या रणरण उन्हातून चालत गेली. दिसेनाशी झाली. ती गेली खरी पण प्रिशाला उगीच हूरहूर लागली. तिचं मन उषाच्या बाबतीत हळवं झालंय. उषा फसली आहे. संसारात विफलता आलीय. नवरा बरोबर वागत नाहीय. तिच्याकडे पैसा नाहीय. अशा एक ना अनेक शंका प्रिशाचं मन कलुषित करुन गेल्या.

         एक दिवस सकाळीच उशाचा फोन आला. प्रिशाच्या नणंदेकडे.

         “ अग प्रिशा , आज तू माझ्याकडे ये. त्या दिवशी म्हणत होतीस ना तुला माझं घर बघायचय पण घर पाहून हसू नकोस. अग आज ना मोठा भाग्याचा दिवस आहे. मिस्टर कालच तीन दिवस झाशीला ट्रेनिंगला गेलेत. सासूबाई काशी यात्रेला चालल्यात. त्यांच्या बरोबर माझाा उन्मेष सोबतीला जातोय. त्यालाही आता कॉलेजला सुट्टी आहे. तू ये लगेच निघ. आपण धमाल करु. निवांत गप्पा मारु. मी वऱ्हाडी झटवऱ्यांचा स्वयंपांक करते.

         प्रिशा उषाकडे गेली एका जुनाट चाळीत, बराच वेळ पत्ता शोधून उषाचं घर सापडलं. घर म्हणजे कोंडवाडाच होतो. ना उजेड ना हवा. वर पत्रा खाली फरश्या फुटक्या. घरातही विशेष काही नव्हतं.

         जेवता जेवता उशा सांगू लागली. अग काय सांगू प्रिशे. माझा संसार कधी कोलमडेल सांगता येत नाही. त्यात सासू अतिशय ख्वाष्ट आहे. धार्मिक, परंपरावदी, रुढींना चिकटून बसलेलया मनाची आहे. लग्न होऊन पंधरा वर्ष झाली तरी अजून मानपान , हुंडयाचा विषय काढून घालून पाडून बोलते. नवरा दारुडा, मारहाण, शिव्यागाळी रोजचंच. एकदा भाकरी कच्ची राहिली म्हणून चुलीतल्या पेटत्या लाकडाने मारलं. सासूने गरम चहा तोंडावर फेकला. म्हणे ही फिळकवणी तूच पी.”.

         “ अग पण तू कशी सहन करतेस हे अत्याचार ? माझ्याबारोबर तूही बोल. एल.एल.बी झालीस आणि अशी भित्री भागूबाई “. प्रिशा.

         “ नशीब माझ. दुसरं काय ? कायदे पुस्तकात रहातात. व्यवहारात आणि असल्या निर्दयी माणसांना कशाची आलीय भिती.” उषा रडत बोलली.

         उषे मी तुला एक सांगते. बघ पटतय कां ?

         “सांग ना तुझा सल्ला चांगलाच असणार !

         “ तू ह्या घराच्या जंगलातून बाहेर पड . नोकरी कर. नाही तर स्वत:ची प्रॅक्टिस चालू कर. तुझं कर्तृत्व दाखव. तू बाहेर पडलीस की तुला तू कोण आहेस हे समजेल. शहाणपणा येईल. बाहेरचं जग समजेल. तू चार पैसे मिळवलेस तर मनासारखं काही घेता येईल. संसाराला हातभर लागेल. मन रमेल. एकलकोंडेपणा जाईल. घरच्यांना तू जी आत्ता घाबरतेस ते थांबेल. तू त्यांना विरोध करु शकशील. निदान तोंडाने तरी त्यांनाही बचक बसेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल. तुला जगण्यात आनंद वाटेल. पुढे उन्मेषला शिक्षण देता येईल. त्यासाठी तू पैसा साठव. ही अशी मुळूमुळू रडत चार भिंतीत गुदमरु नकोस.

         “ अगं पण नवरा नोकरीला नाही म्हणतो. सासू मला बाहेर जाऊ देत नाही. मला माहेरी फोन, पत्र काही पाठवता येत नाही. दादा वहिनी आई कितीतरी पत्र पाठवतात. काळजी करतात. पण मी काही करु शकत नाही, एकटी असेन तेव्हा आठवणी काढून रडते एवढंच. त्यांना का माझे अश्रू दिसणार आहेत. मी प्रिशा कटाळलेय. जीव द्यावसं वाटतंय. नको हे जगणं मी फसले माणसाशी लग्न करुन.


         “ अग ही माणसं तरी आहेत का हैवान आहेत हे”.

         एक दिवस उषाच्या शेजारणीने मला फोन केला . कुठून मिळाला माझा नंबर देव जाणे- उशा मनाशी बोलली.

         “ ताई तुम्ही ताबडतोब उषाताईकडे या. उषाताईला नवऱ्याने जबरदस्त मारहाण केली. उषाताई वैतागली. दु:खाच्या भरात तिने आमच्या सार्वजनिक विहीरीत उडी मारली. ती गटांगळया खाऊ लागली. चार लोक पटकन उडया टाकून विहीरीत उतरले आणि त्यांनी तिला बाहेर काढलं. आम्ही हॉस्पिटलात नेलं. लवकर इलाज सुरु झााले म्हणून वाचल्या त्या. तुम्ही तिला घेऊन जा घरी इथे ठेवू नका. बिचारी अभागी आहे”.

         प्रिशा, नवरा, नणंद , तिचे पति सारेजण उषाकडे गेले. हॉस्पिटलमध्ये नवरा निर्लज्जासारखा तंबाखू चोळत बसला होता.

         “ या मेव्हणी बाई. तुमच्या मैत्रिणीने काय दिवे लावलेत कळलं ना ? ही वाचली कशाला मेली असती तर बरं झालं असतं दुसरी तरी करता आली असती. मॅड आहे हो ही. माझ्या गळ्यात तिच्या बापाने फसवून ही घोरपड बांधली.

         “मिस्टर उगले ; तोंड सांभाळून बोला. काय केलय असं तिनं, ? ती गरीब आहे सहन करत्येय तो तो तुम्ही जास्त माज दाखवताय."

         “ थांबा. तुम्ही बसा तिच्याशी बोलत. मी आलोच आत्ता ! ”तो निघून गेला.

“प्रिशाने पोलिसांना फोन केला. पथक हजर झालं. ही मनुष्य वधाच्या प्रयत्नाची केस होती.

इतक्यात नवरा दोन मोठया गच्च भरलेल्या बॅगा घेऊन आला ” हे घ्या तिचं सामानं. तिला कायमचं घेऊन जा. जा काळ कर तुझं तोंङ आमचा सत्यानाश झाला तुझ्या पायगुणानं” प्रिशा त्याचं बेफाम, निर्लज्ज आणि बेजबादारपणाचं बोलणं ऐकून संतापली. पण गाढवापुढे वाचली गीता…..

पोलीसांनी उगलेला बेडया घालून नेले.

प्रिशा उषाला डिस्चार्ज घेउून नणंदेकडे आली. दोन तीन दिवसात उषा नॉर्मल झाली.

         “ प्रिशा तू होतीस म्हणून मी वाचले “ उषा प्रिशाच्या पाया पडू लागली. प्रिशाने तिचे दंड धरुन तिला रोखलं.

 “ उषा, माझे वन्सचे मिस्टर नागपूर कोर्टात जज्ज आहेत. तू त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस सुरु कर. सध्या ह्या बंगल्याच्या आउट हाऊस मध्ये रहा. मग खोली घे. पण पुन्हा या नरकात जाऊ नकोस”

         हो प्रिशा. मी तू म्हणतेस ते करायला तयार आहे. ह्या उगल्याची केस तो जिंकतो ते मीच बघते. काळया कोटार्ची आणि सबलेची शक्तिी दाखवते आता. प्रिशे तुझ्यामुळे माझे डोळे उघडले. चल मी आता सगळ्यासाठी चहा करते. मी आता फ्रेश आहे. अशीच राहीन. मी जगण्याला घाबरत होते पण तू मला स्वयंसिध्द होण्याची प्रेरणा दिलीस. लाख लाख धन्यवाद.

दोघींनी एकमेकींना मिठीस घेतलं. संध्याकाळ झाली होती. रोजचेच दिवे आज नव्या तेजाने आनंदाचा प्रकाश देत होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy