STORYMIRROR

MAHESH MALI

Romance

3  

MAHESH MALI

Romance

प्रेमवेल

प्रेमवेल

2 mins
131

आजच्या दिवसाची मी खूप वाट पाहिली होती,मी ठरवलं होत...की आज मी तिला सगळं काही सांगून टाकणार,तिला तर माहिती ही नाही,की तिचा हा मित्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागलाय,आज नाही तर मागील खूप वर्षांपासून,मी तिला सांगायचा तर खूपदा प्रयत्न केला,पण प्रत्येक वेळी मी स्वतः ला थांबवायचो,कधी ती रागावेल म्हणून तर कधी तिला मी आवडेल की नाही या भीतीने,तिच्या मनातील साथीदाराच्या चौकटीत मी बसेल की नाही माहिती नाही,जी भावना माझा मनामध्ये आहे ती तिच्या मनामध्ये आहे की नाही,पण आज थोडी हिंम्मत केली मी,ठरवलं जे होईल ते पाहता येईल,मनाची तयारी केली, आणि तिचा नंबर लावला मी,आणि तिला भेटायला बोलवलं नेहमीच्या ठिकाणी,त्यावेळी मी किती घाबरलो होतो, नाही सांगू शकत,ठरलेल्या वेळेआधीच मी भेटायच्या ठिकाणी येऊन उभा राहिलो,पण ती अजुन आली नव्हती,मी तीला कॉल केला पण तिचा कॉल नॉट रीचेबल होता,मी तीला खुप कॉल केले, पण तिचा फोन नाही लागला,माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं होत आणि खुप रागपन येत होता,पहिल्यांदा विचार केला की घरी निघून यावं,पण नंतर विचार केला की कदाचित ती येईल थोड्या वेळात,पूर्ण एक तास तिथे बसून मी तिची वाट पाहत होतो,पण ती अजून आली नव्हती, माझं मन उदास झालं होत,आणि जेंव्हा मी उठून निघत होतो तेंव्हा तिचा हाथ माझ्या खांद्यावर आला, मी मागे वळून पाहिलं तर ती होती, तिने मला मिठीत घेतलं,आणि सॉरी बोलली थोडा उशीर झाला तुझासाठी गिफ्ट घेत होते,माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले, ती माझ्याकडे पाहत होती,मी काहीच बोललो नाही, ती बोलली मला माहिती आहे तुला मी आवडते,तुला काय वाटलं, मला हे कधी जाणवत नव्हतं,पण मीही आजच्या दिवसाची वाट पाहत होते,त्यानंतर दोघेही शांत झालो, न काही बोलता एकमेकांच्या मिठीत शिरलो, खरचं प्रेमाला शब्दांची गरज नसते,डोळ्यातून, भावनेतून आणि वागणुकीतून ते कायम आपले ठसे उमटवत असते,गरज असते ती फक्त उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याची...#lovelanguage 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from MAHESH MALI

Similar marathi story from Romance