STORYMIRROR

Suraj Dalvi

Tragedy

2  

Suraj Dalvi

Tragedy

पाकोळी

पाकोळी

1 min
37

एक पाकोळी उडत उडत हळूच अलगत येऊन बसली एका फूलाच्या कळीवर.तदनंतर एकटी असलेली कळी भलतीच ऊमलू लागली तिच्या सहवासाने.बहरलेल्या कळीचा सुगंध घेत तशी पाकोळी ही रोज येऊ लागली तिच्या सहवासात.

भर ऊन्हात,पावसात पाकोळी कळीसोबत असायची कसलाही विचार न करता. पाकोळी तासनतास त्या कळीसोबत राहू लागली. विसावा घेऊ लागली तिला हवा तसा.पाकोळी ला तिला हवा तसा सुगंध देणारी कळी हवीहवीशी वाटू लागली रोजच.कुठल्याही परिस्थितीत पाकोळीला कळीचा सहवास सोडायचा नव्हता.आतापर्यंत पाकोळी स्वत:ला सोपवून बसली होती कळीला. एकरूप होऊन बसली होती कळीसोबत. तेवढ्यात भूकंप म्हणून किंवा पूर म्हणून असेल बहूतेक,एक दिवस पाकोळीला तिच्या लोकांकडून फूलांच्या जाती सांगण्यात आल्या. वेगवेगळे फूलांचे रंग, त्याची वर्णनं सांगितली गेली.अशातच कळीला बहरून, कळीच्या ईतक्या जवळ येऊन एक दिवस अचानक पाकोळीने कळीला साफ नाकारलं. आणि कळीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. पाकोळी क्षणार्धात कायमची निघून गेली कळीचं सबंध आयुष्य ऊध्वस्त करून.

खरं तर ती कळी साधारण नव्हतीच,आणि ती पाकोळी ही. आता ती फूलाची कळी चिखलात ऊगवणारं कमळ ही असू शकते किंवा ती पाकोळी वेगवेगळ्या फूलांवर ऊडणारं रंगीबेरंगी फूलपाखरू ही असू शकते....


Rate this content
Log in

More marathi story from Suraj Dalvi

Similar marathi story from Tragedy