STORYMIRROR

Nisha Yadav

Inspirational Thriller

3  

Nisha Yadav

Inspirational Thriller

नजर वाट चुकलेला तो

नजर वाट चुकलेला तो

7 mins
175

काळ्याकुट्ट भयाण अंधाराची काळोखी रात्र...गर्द झाडी.. सूनसान रस्ता.. रातकिड्यांची किरकिर...रात्रीचे दीड वाजले होते..ती एकटीच त्या भयावह किर्र किर्र रस्त्याने चालत होती...अंगाला चाचपून नेसलेली साडी...अंधुक चंद्राच्या शीतल प्रकाशात ती मादक मनमोहक वाटतं होती..वय ही तिचे काय होते..अवघे चौवीस वर्ष...हातातली पिशवी छातीशी घट्ट कवटाळून मिणमिणात्या तेजारीच्या प्रकाशाने ती चालत होती...अनेक टपोरी उनाड मुलांची तिच्यावर मळलेली नजर तिच्यावर खिळलेली असायची..

तिला हे माहीत होतं.तरीही जीव अब्रू वेटीस धरून ती कामाला येत होती.. मनाने ती खूप घाबरलेली असायची..परांत काय करणार पोट आहे तर काम हवच ना!!!हाच विचार करून ती घरातून बाहेर पडायची....तिच्या मागून कोणाची तरी वासनाधिन गलिच्छ दबकी पाऊले पडत होती..रात्रीच्या त्या झोंबणारा शांततेत तिला ते जाणवत होते..मनातून घाबरली असताना ती पाऊले झपझप टाकतं होती...लवकर चालाव म्हणजे इथून वर्दळीच्या भागात जाऊ...मग तिथून पाच मिनिटांच्या अंतरावर तिचं घर...घर कसलं छोटंसं पत्र्याच झोपड दहा बाय दहाच....ती झपाझप चालत असताना मागून आवाज आला...तू चीज बडी हैं मस्त मस्त...मस्त..मस्त..काय मज्जा येईल ना हिला अनुभवताना....ती विचारांच्या तंद्रीत होती लगेच भानावर आली...अजून जोराने चालू लागली..मागून येणारी दबकी पाऊलेही आता जोरात जोरात पडू लागली...ती अजूनच घाबरली...घामाने चिंब चिंब भिजली....तरीही घराचा पसारा आणि ओढ पाहून ती अजून जोराने चालू लागली.....परत विचारांच्या तंद्रीत हरवली...

कुटुंब तीच तस् मोठं..आई बाबा आणि ही पाच भावंड.... चार बहिणी आणि एकच भाऊ तोही तिच्या पाटचां ,लहान असतानाच बाबा एका एक्सिडंट मध्ये वारले..सगळ्या भवडांची जबाबदारी आई वर पडली...आईने चार घरची धुणभांडी करून मुलांचे संगोपन केले..बाबा वारले तेव्हा छोटी अवघी दहा महिन्यांची होती..मग आई कामातून येई पर्यंत हीच तिचे संगोपन करी..आईने हिला नववी पर्यंत शिकवले...एकुलता एक मुलगा म्हणून त्याला बारावी उत्तीर्ण होऊ दिला..तोही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला...परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं..वाईट मित्रांच्या सहवासात त्याला व्यसन लागलं.. तो व्यसनाधीन झाला...घराच्या वस्तू नेऊन प्रसंगी विकू लागला...परंतु त्याचा ताई वर जीव...ताई ला त्रास नको म्हणून तो आला तर घरी यायचा तीही महिन्यांतून एकदा च ..नाहीतरी नाही...आईलाही चार वर्षा पूर्वी कॅन्सर चे निदान झाले..परंतु..आर्थिक अडचणीत उपचार करता येत नव्हते.ती अंथरूणाला खिळलेली असायची. तीन भावंड म्हणजे बहिणी...जिल्हा परिषद च्या शाळेत शिकत होत्या...घरचा व्यवहार..आईच्या गोळ्या औषधं. बहिणींचं शिक्षण यांत तिची लाहीलाही व्हायची...आई हे सारे डोळ्यांत अश्रू भरून रडत राहायची..परंतु आईला तीच धीर द्यायची...संपूर्ण घर चालवण्यासाठी ती सकाळी नऊ ते दुपारी चार एका झेरॉक्स मशीन वरती काम करायची त्यानंतर घरी येऊन घरचं आवरायचं..मग..मग.. एका श्रीमंत घरात..धुणीभांडी.. लादी...आणि त्यांची आजारी आई तिची ती रात्री झोपेपर्यंत देखभाल.. कारण दिवसभर त्या आजीची मुलगी असायची..मुलगी गेली की हीची ड्युटी चालू..आजी झोपली की ही घरी यायला निघायची..तो पर्यंत इतकी भयाण अंधाराची रात यायची...भावाने हे सारं लक्ष देऊन केलं असत तर तिच्यावरचा कामाचा भार थोडासा कमी झाला असता.तिला एवढी दगदग धावपळ करायची गरज लागलीच नसती....ती आता पूर्णतः विचारांच्या तंद्रीत बुडाली होती...तोच तिच्या कानावर आवाज घुमला..अरे क्या चीज है.. बडा मज्जा आयेगा इसे नोचने मे.. दिल को थंडक मिलेगी..अगर ऐसी जवानी मिल जाय तो.. जल्दी चलो... पकडो उसे....ती अजून जोरात चालू लागली परंतु शरीराच्या त्राण संपले होते....डोळ्यांसमोर काळोख पडला होता...पाऊले पुढे पडत नव्हती....ते तिघे जण होते...तिचा चालण्याचा वेग कमी झाला.. इतक्यात जोराचा वारा सुटला..ढगांचा कडकडाट होऊ लागला..विजा ही चमकू लागल्या... 

             जोराच्या वाऱ्याने तिचा पदर..ती कितीही आवरता घेत असूनही...जोराने उडू लागला..आता साडी पदर आवरताना..तिची दमछाक झाली... त्राण आता संपुष्टात आले...तसे तही जोराने धावत आले...त्यांनी वेढलेले पाहून ती समजून घेली...काही समजायच्या आतच ती मूर्च्छित होऊन कोसळली....त्यांना हे बरेच झाले...आता त्यांना तिची मज्ज्जा घेता येणार होती...मनासारखी..कारण..ती.विरोध करू शकत नव्हती..आपल काम झालं.की ते तिला कुठे तरी झुडपात टाकून पळणार होते..रात्रीच्या अंधारात त्यांचा तो गुन्हा लपणार होता...एक गरीब घरची असणार म्हणूनच ती एवढ्या रात्री बाहेर असते. हे त्यांनी जाणले होते....त्यामुळे काहीही केलं तरीही ती गप्प बसणार..हेही त्यांना ठावूक होते...त्यांच्या गुन्ह्याला वाचा फुटणार नव्हती...त्यांची ही वासना फिटणार होती...त्यांनी तिला लागली लागलीच उचलले....पाऊस जोमाने पडू लागला ..भार पावसात कस काय करणार..म्हणून त्यांनी तिला एका पत्र्याच्या शेडमध्ये नेले...पाहिलं तिचा उपभोग त्यांचा म्होरक्या घेणार होता..त्यानंतर बाकीचे दोन जण...तही शेजारी थांबले.... पत्राच्या शेडमध्ये..भयाण अंधार होता....एक छोटीच खिडकी होती.

        विजांचा लखलखाट त्यातून येत होता..तिच्या चेहऱ्यावर तिचा पदर होता...तो तिचा उपभोग घेण्यास स्वार होणार तोच जोराचा वारा आला..आणि पत्र्चाया शेडचा पत्र्याचा दरवाजा जोरात आपटला...त्याच दिशी..तिला शुद्ध आली..तोंडातून अस्पश्ट आवाज आला...."छोटू..छोटू.. ..... छोटू...तुझ्या तायाडीला वाचावं ssss रे...नाहीतर...नाहीतर..सार संपेल...आपल कुठुंब...नष्ट होईल रे......त्याच्या कानात तो अस्पष्ट आवाज घुम घुमू लागला....त्याच्या काळजाचा ठोका चुकला...थोड्या काळासाठी तो स्तब्ध झाला.....एवढ्यात वाऱ्यासह विजेचा चमचमाट खिडकीतून आत येऊन तिच्या चेहऱ्यावरचा पदर उडाला..आणि उजेड तिच्या चेहऱ्यावर पडला.......तो क्षणभर अवाक होऊन स्तब्ध झाला....ती दुसरी तिसरी कोणी नव्हती..ती..ती..ती..त्याची तायडी होती.....ज्या हातात रक्षण करण्याची जबाबदारी टाकून ती राखी बंधात होती..ते हात..ते हात..आज तिच्या आब्रु वर हात टाकू पाहत होते..तो लगेच भानावर आला..शेजारी पडलेला चाकू त्याने उचलला..अन् तायडी ला एका हाताने उचलून धरले..आणि चाकू दाखवून दाखवत..तो बाहेर पडला..त्याने ते व्यसनी दोस्त हे सार पाहून अवाक झाले..त्यांचा हिरमोड झाला....हा असा कसा बदलला हेच त्यांना कळेना....ते त्याच्या समोर आले...

         तो:"माझ्या रस्त्यातून बाजूला व्हा...नाहीतर एकेकाला ह्या चाकूचा सामना करावा लागेल..खून पडेन मी तुमचा...ही माझी तायडी आहे....तिला कोणीच हात लावायचा नाही....मी एवढे दिवस नजर लावून होतो...की कसा विसरलो..माझ्या घरात माझ्या स्वतःच्या चार बहिणी आहेत...माझी तायडी कुटुंबासाठी वणवण करते..झिजली आहे...आज मी चुकून काही वेगळं केलं असतं तर...बहिण भाऊ चे पवित्र नातं कलंकित झालं असतं..ह्या पुढे कुठल्याच बहिणीने भावावर विश्वास ठेवला नसता..तिने रक्षणासाठी राखी बंधलीच नसती....देवा मी तुझ्या खूप खूप आभारी आहे..तू वेळेवर मला योग्य वेळी सगळं जाणवून दिलंस..एकदा चुकलो आता पुन्हा चुकणार नाही...चला मला वाट द्या"

सहकारी:"आता तू जा परंतु तुला नंतर आम्ही पाहून घेऊ"

         दुसऱ्या एका सहकाऱ्याने त्याच्यावर काठीचा आघात केला..तायडीला तिथेच खाली ठेवून त्याने त्याने त्या दोघांशी सामना केला त्यांना मातीत लोळवून त्यांचेकडून पुन्हा ह्या परिसरात दिसणार नाही असे वदवून घेतले....त्याचे अंग रक्ताने माखले होते...त्यांना मारताना त्याला दुखापत झाली होती.त्याच्या डोक्याला आदळून खोक पडली होती..त्यामुळे शर्ट रक्ताने माखले होते...तो धावत धावत घरात घुसला..त्याला असा पाहून छोट्या बहिणी घाबरून गेल्या...त्या थरथरू लागल्या...आई ही अंथरूणातच थरथरायला लागली...

       तो:"घाबरु नका..मला काहीही झालेलं नाही आहे... तायडीला पहा मी डॉक्टरांना बोलावून आणतो...तो रक्ताच्याच अंगाने धावत धावत गेला..ती भान हरपला होता..त्याच्या डोळ्यात समोर ताईचा चेहरा दिसत होता...थोड्याच वेळात डॉक्टरांना घेऊन तो आला... डॉक्टरांनी ताईला चेक केलं...ती घाबरल्या मुळे तिचा प्रेशर वाढला आहे..त्यांना आरामाची गरज आहे...आई अंथरूणातच बडबड करीत होती...लक्ष द्या असे सांगून डॉक्टर निघून गेले..तो ही ताई शुद्धीत येई पर्यंत बसला..जसे ताईने डोळे कीलकील केले तसा त्याने छोट्या बहिणी ला सांगून ताई कडे लक्ष द्या तिची काळजी घ्या..ह्या गोळ्या औषधे आहेत. ती द्या आणि एका पिशवीतून कागद काढून ते पिशवी सकट खिश्यात कोंबून तो घरातून निघून गेला..तेव्हा रात्रीचे साडे तीन वाजले होते.....खूप चालल्यानंतर तो एका बस स्टँड पशी आला....आज तो आईला ताईच्या नजरेला नजर देत बोलू शकत नव्हता...त्याला स्वतःच्या विचारांची स्वतःची लाज वाटली..तो स्वतःशी ही नजरा मिळवू शकत नव्हता.....स्वतःलाच तो मारत होता. कोसत होता....त्याला आपण आत्महत्या करावी अस वाटल..तो पुन्हा धावत निघाला ..एका रेल्वे ट्रॅक पाशि आला...समोरून एक रेल्वे येणार आणि तो उडी घेणार की लगेच त्याच्या समोर त्याच्या तायाडीचा चेहरा आला..त्याने स्वतःला सावरलं...रेल्वे धाडधाड करत निघून गेली..तसेच धाडधाड त्याच्या विचारांची गती वाढली आणि सुरू झाली..आज माझ्या ताईला जे भोगावं लागलं असत ..किंवा जे ते भोगते आहे..ते पुन्हा तिच्या नशिबी येणार नाही...याची काळजी मी घेईन...माझ्या कुठुंबाला मी सुखात ठेवीन..विचारांची गती चालू असताना त्याने एका झाडाचा पाराला डोकं टेकल..त्याचा डोळा लागला...सूर्याच्या किरणने त्याला जाग आली...आज त्याची नजर..दृष्टिकोन..बदलला होता..आता यापुढे तो कुटुंबासाठी जगणार होता..ताईची वणवण थांबवणार होता..त्याची पावले घराकडे वळली परंतु ताईला आईला नजर कशी द्यायची ह्या विचाराने ती मागे फिरली..आता स्वतःच्या पायावर उभे राहून..काहीतरी कष्टाचे कमावून जेव्हा घेवून.येऊ तेव्हाच घरात जायचे..ताईची..आईची.माफी मागायची असे ठरवून तो चालु लागला...

         हिकडं घरी ताई शुद्धीत आली..तिचे अंग तापाने फणफणत होते..तरीही तिने तिच्या छोटूची चौकशी केली..बहिणींनी सारा सांगितलं..ताई समजून गेली... तेही गापाचुप अंथरुणात पडून आली..आज तिचं मन भरून आलं..तिचा छोटू तिच्यासाठी नक्कीच चांगल्या मार्गाला वळेल..त्याची नजर बदलेल अस तिला वाटलं...तो चालतच श्रीमंतांच्या घरी गेला..आणि तायडी उद्या पासून कामाला येणार नाही असे सांगून तिथून निघाला....बस स्टँड वर आला..खिसे चाचपून पाहिले..त्यात जीर्ण झालेल्या नोटा हाती लागल्या..जेमतेम सहाशे रुपये होते..ते हरमाचे पैसे होते..ते फेकून द्यावे असे त्याच्या मनात आले..त्याने लागलीच ते फेकून दिले..वणवण भटकत आणि भटकून राहिल्यानंतर त्याला एका बागेत माळीचे काम मिळाले..महिना पाच हजार रुपये..खाऊन पिऊन राहून त्याच्या हातात अवघे साडे तीन हजार रुपये येणार होते..त्याने दुसरीकडे एका हॉटेल मध्ये ही रात्रीचे वेटरचे काम पाहिले..आता दोन्ही कामांचे मिळून महिना त्याला आठ हजार मिळणार होते.. तो तयार झाला..लागलीच मेहनत घेऊ लागला...म्हणता म्हणता महिना पूर्ण होत आला...कधी थकलाच ताई आई छोट्या बहिणींचा चेहरा त्याला स्वस्थ बसू देत नव्हता....आता महिना झाला होता..तो पगार घेऊन सरळ घरी आला...आल्याबरोबर..ताईच्या पायात पडला..ताईची माफी मागितली..आईची माफी मागितली..दोघींनीही त्याला माफ केलं...त्याने पैसे पुढे केलं..ताई घेत नव्हती....ती रागाने पाहू लागली..

       "तायडे घाबरु नकोस,हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत..कुठल्या हरामीचे नाहीत...आता तू काम करायचे नाही..यापुढे सारी घराची जबाबदारी माझी..मी घराचा कर्ता करविता आहे...तू सुखात राहायचे..

आज आई..ताई यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले..नजर ..वाट चुकलेला तो पच्छतापाच्या आगीत होरपळून योग्य मार्गावर आला होता...

समाप्त...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational