नियती
नियती
"नाही ",सोडा मला 'सोडा ."मला जगायचं नाही ".मला मरु द्या. मला मरु द्या ."पुनर्वसन मानसिक रुग्णालय "वार्ड क्रमांक 3 मधून आवाज घुमत होता. चेहऱ्यावरचे तेज नष्ट झालेले .26 वर्षाची तनुजा साठ वर्षाच्या म्हातारी सारखी दिसत होती . सावळा वर्ण लांबसडक काळेभोर केस मूर्ती प्रमाणे दिसणारी तनुजा आज मात्र दगडासारखी मख्ख दिसत होती एक महिन्यापासून तिथे ॲडमिट होती तिचे मानसिक संतुलन बिघडले होते.
डॉक्टर स्नेहा कदम तिची केस हाताळत होत्या त्यांना तिच्या पूर्वायुष्याबद्दल जाणून घ्यायचे होते त्यांनी सर्व माहिती तिच्या गावी मिरज येथे जाऊन मिळवली अतिशय बुद्धिमान अष्टपैलू असे व्यक्तिमत्त्व होते . बारावीत तिला 92 टक्के गुण मिळाले होते. वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर भावे.पण तिचा विचार वेगळा होता. तिला शिक्षक व्हायचे होते . तिचे असे मत होते की भारताचे भविष्य भावी पिढीकडे आहे .तेव्हा भावी नागरिक घडविण्याचे स्वप्न होते. वडिलांनीही तिला डीएड ला प्रवेश मिळवून दिला .प्रथम वर्ष सुरू झाले. दोनच महिन्यात ती कॉलेजमध्ये प्रसिद्ध दिसायला सावळी असली तरी गायन' वादन' चित्रकला 'अभ्यास सर्व कलाकृती पारंगत होती.त्यामुळे वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यामध्ये 'शिरीष ' ही होताच.
शिरीष अतिशय देखणा ,गोरा, उंची पुरा ,श्रीमंत घरचा मुलगा. खूप हुशार होता .तो या क्षेत्राकडे कसा वळला हे प्रश्नचिन्ह होते. कॉलेज मधल्या सगळ्या मुली त्याच्यावर फिदा असायच्या. पण त्याचे लक्ष मात्र फक्त तनुजाकडे. तिच्याशिवाय त्याला काही सुचत नसे.तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे बारीक लक्ष असायचे. तिच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती. पण तिला वाटायचे, श्रीमंत मुले ही बिघडलेले असतात. प्रामाणिकपणा तर नसतोच. म्हणून ती जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. पण एके दिवशी अचानक तनुजा घरी चालत निघाली होती. तेव्हा तिच्यासोबत तिची जिवलग मैत्रीण साधनाही होती . शिरीष ने त्यांच्या समोर गाडी थांबवली. पण तनुजा तशीच पुढे निघाली. शिरीष पण खाली उतरला. आणि आग्रहाने तिला व साधनाला गाडीत बसायला लावून त्याने त्या दोघींना घरी सोडले.
त्या दिवसापासून त्यांची मैत्री दृढ होत गेली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही. दोन वर्षात दोघेही प्रेमात आकंठ बुडाले .आज निकालाचा दिवस होता. ठरल्याप्रमाणे तनुजा कॉलेजमध्ये प्रथम आली. शिरीष ही बऱ्यापैकी गुणांनी उत्तीर्ण झाला. दोघांनाही नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत नोकरी लागली. दोघेही सेटल झाले .सर्व काही सुरळीत चालले होते .पण एके दिवशी अचानक शिरीषच्या बाबांनी या दोघांना एकत्र पाहिले.
शिरीषने प्रेमाची कबुली दिली. पण बाबांनी काही एक न ऐकता शिरीषचे लग्न आपल्या मित्राची मुलगी अनघाशी केले.
ही बातमी तनुजाला कळाली. आणि त्या दिवसापासून आजतागायत ती या मरणयातना भोगत आहे. हे सगळं ऐकून डॉक्टर स्नेहा कदम यांना खूप वाई
ट वाटले .त्यांनी तिला खूप मदत केली. योग्य उपचार पद्धती वापरून तिला या अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत केली. तब्बल सहा महिन्यानंतर तनुजा पूर्वीप्रमाणे फ्रेश झाली .ती पुन्हा पूर्ववत झाली .पुन्हा एक नवीन जिद्द घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडली.
तिने आदिवासी भागात स्वतःची बदली करून घेतली .तेथील मुलांना शिकवणे ,त्यांच्या अडचणी समजून घेणे,त्यांना प्रगतीच्या प्रवाहात आणणे ,याचा तिने विडाच उचलला .तिचा पुनर्जन्म झाला होता. आणि आता तिने या मुलांच्या उद्धारासाठीच आपला जन्म घालवण्याचा निर्धार केला होता. तिच्या लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळे ती तिथल्या सर्वांची लाडकी झाली होती.
द्विशिक्षकी शाळेत काम करत होती ती. तिथले मुख्याध्यापक ही तिच्या वडिलांप्रमाणे प्रेमळ होते. आपल्या मुलीप्रमाणेच तिला मानत होते .ते उभयता पती-पत्नी तनयाचा खूप लाड करायचे. मुख्याध्यापक रिटायर होणार होते . तनयाला याला खूप वाईट वाटत होते .दोन वर्ष झाली आता तनया इथे स्थिरावली होती. पण आठवणी मात्र तिचा पिच्छा सोडत नव्हत्या.कधी कधी ती खूप दुखी व्हायची .पण शेवटी मनाला स्वतः समजवायची.
शेवटी मुख्याध्यापक रिटायर व्हायचा दिवस उजाडला .खूप भावपूर्ण अंतकरणाने त्यांना निरोप देण्यात आला. गावकऱ्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला. तनया आता एकटी पडली. खूप रडली ती त्या दिवशी.
दुसऱ्या दिवशी ती जेव्हा शाळेत गेली ,तेव्हा तिला कळले की एक नवीन शिक्षक शाळेत रुजू व्हायला आले ,सरपंच त्या शिक्षकाला शाळेत घेऊन आले. तिने पाहिले तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता .कारण तो नवीन शिक्षक शिरीष होता. तिने चेहऱ्यावर कोणताही भाव न दर्शवता त्याला हजर करून घेतले. स्वागत समारंभ झाला. सरपंच व गावकरी गेले .आता तनयालाही राहावले नाही .तिने त्याला विचारले ,"आता हे काय नवीन?"" कशासाठी आला आहेस इथे ?","मला फसवलंस". आणि आता ,"मी जिवंत आहे का मेली आहे हे पाहायला आलायस?" हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रूचे संतत धार चालू होती . शिरिषच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते.
शिरीष म्हणाला ,"अगं फक्त मला एकदा माझी बाजू मांडण्याची संधी दे".आणि तो बोलू लागला, बाबांनी काहीही न ऐकता माझं लग्न लावून दिलं. मी तिला सगळं सांगितलं होतं .माझं फक्त तनया वर प्रेम आहे .तुला मी माझ्या हृदयात स्थान देऊ शकत नाही. तीही काही बोलली नाही. खुप समजुतदार होती .दोन महिन्यानंतर अचानक बाजारात जाताना तिचा एक्सीडेंट झाला. आणि त्यातच ती गेली.
मला काय करावे सुचत नव्हते. तिचे सगळे सोपस्कार उरकून मी तुझा पत्ता शोधून काढला .आणि माझा बदलीचा अर्ज टाकला. खूप प्रयत्नाने हीच शाळा मिळवली. तुझ्यापासुन दुर राहुन मी ही कधी सुखी झालो नाही. तुझ्या सोबतच इथून पुढचं आयुष्य घालवायचे आहे.
तनया," विल यू मॅरी मी!" तनया ने दुःखावेगाने त्याला मिठीत घेतले. शिरीष म्हणाला ,"नियतीला सुद्धा हेच मान्य होते."