नियती. (सत्य कथा)
नियती. (सत्य कथा)


भाद्रपद महिना पीतृपक्ष ,म्हणजे विजांचा लखलखाट, कडकडाट आणि ढगांच्या गडगडा टा बरोबर येणारा जोरदार पाऊस .
आरामातच हा पित बसले होते बाल्कनीत आणि एकदम अंधारून आले वारे सुटले विजा चमकू लागल्या गडगडाट सुरू झाला आणि शहारा आला अंगावर आणि इतक्या वर्षांनी तो भयानक दिवस आठवला .
१९६४ सलाची गोष्ट. गावी शाळा नसल्यामुळे मी आणि माझी धाकटी बहीण आजोळी शिक्षणा साठी देवरुख येथे होतो. आजू बाजूच्या बराच गावात शाळा नसल्यामुळे
न्यू इंग्लिश स्कूल देवरुख याच शाळेत येत असत. त्या काळात कोणीही मुलांना राहायला जागा देत. विनामूल्य कारण त्या काळात मुल्या ला मूल्य नव्हते शिकणाऱ्या मुला मुलींना आधार देणं हेच त्यानं महत्त्वाचं मूल्य वाटत असे.
अश्याच दोन मुली वीणा आणि सीमा ,बहिणी एका आजीच्या घरी खोली घेऊन राहत असत. माझी बहीण त्या वेळी आठवीत होती तिच्या त्या मैत्रिणी जुळ्या होत्या. मी अकरावीत होते त्या वेळी. आम्हाला फ्री पिरियड होता म्हणून मी घरी आले होते..मला आजी नसल्यामुळे आजोबा नोकर मोलकरीण आणि आम्ही बहिणी असा सर्वांचा स्वयंपाक मला करावा लागे नंतर अभ्यास.
आई वडिलांना सोडून दुसऱ्या गावी शिक्षणासाठी खेड्यापाड्यातून आलेली आम्ही मुले. जे मिळेल ते खायचे जसे राहावे लागेल तसे राहायचे .ध्येय फक्त आणि फक्त शिक्षण.अतासारख्या सोई नव्हत्या हो .फोन नाही खुशाली काय ती एक पोस्टकार्ड सांगायचे .कंदील आणि बाटलीत रॉकेल भरून चींध्याची वात घालून पेटवायची आणि त्या प्रकशात अभ्यास .
<
p>
वीणा सकाळी सीमाला म्हणाली ताई आज भाजी कर कांदा भजी . ताईने समजावले आता शाळेला उशीर होईल संध्याकाळी करते हा बाळा. आणि दोघी शाळेत गेल्या.
असेच च्रार साडे चार वाजले असतील आणि अंधारून आले विजा चमकू लागल्या. ८ वी ्चा पी टी पिरियड होता. मुले ग्राउंड वर होती. मस्त मजेत खेळत होती.पाऊस येणार चला वर्गात सरांनी फर्मावले. हळू हळू गप्पा मारत मुले परतत होती त्याचा विरस झालं खेलयाला
नाही मिळाले. हळू हळू मुले वर्गाकडे पोहोचली .माझी बहिण , सीमा आणि वीणा वर्गापासून दहा बारा फुटावर असतील. आणि जो वीज चमकुन गडगडाट झाला .अख्ये देवरुख हादरले. लोक ओरडत होते शाळेवर वीज पडली कोण म्हणाले ग्राऊंडवर पडली. आम्ही शाळेच्या दिशेने सुसाट पळत सुटलो.
आरडा ओरडा रडारड काही काळत नव्हते .आणि ग्राउंड वरील दृश्य पाहून चक्करच आली .माझ्या बहिणीला जस्त चाटून गेली पण वीणा आणि सीमा जळून खाक झाल्या होत्या.काहीच शिल्लक नव्हते विजेने त्यानं जागच्या जागी गिळले होते. अभ्यास करायला वीज नव्हती पण त्यांना घेऊन जायला मात्र वीज आली .
अखं देवरुख हळहळत होत. आई बापाकडे पहावे नव्हतं रडत होते शिक्षणासाठी पाठवले आणि हे काय झाले.
हा भीषण प्रसंग अजून विसरता येत नाही.
निसर्ग आणि नियतीपुढे माणसाचे काही चालत नाही हेच खरे.