STORYMIRROR

Smita Kavade

Tragedy

4  

Smita Kavade

Tragedy

नानांची पंच्याहत्तरी

नानांची पंच्याहत्तरी

9 mins
303

सुजय:-अगं ऐकतेस का प्रिया(जरा प्रेमाने) अगं मी काय म्हणतोय दोन दिवसावर नानांची पंच्याहत्तरी जोरात साजरी करुयात काय माझी आणि आईचीही खूप ईच्छा आहे गं.त्याचे सगळे मित्र बोलवून एखाद्या मोठ्या हॉलमध्ये करावं म्हणतोय म्हणजे बघ तुलाही त्रास होणार नाही.तेवढच सगळे खूप दिवसांनी एकत्र येतील आणि नानांना बरं वाटेल.

(अजून सुजय बोलतोय तेवढ्यात)

प्रिया:-मला वाटलच होत(हातातलं पातेल जोरात आदळत)अजून कस काय यजमानांची आईबापापासून सुटका होत नाही.तरी म्हणल एवढ प्रेमाने काहीतरी काळबेर वाटलच मला.हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते जर त्यांचे असले फालतु लाड करायचे असतील तर मी जाते निघून माहेरी आणि मग परत बसा आयुष्यभर आईबापांचे कोडकौतुक.काय तर म्हणे पंच्याहत्तरी अजून किती दिवस सेवा करायचीय देव जाणे 

(अस मोठमोठ्यांदा म्हणल्यावर)

सुजय:-अगं प्रिया जरा हळू बोल ऐकतील नाना.काय वाटेल बिचार्या नानांच्या मनाला.फार हळवे आहेत गं.अस काय आपल्यावर आभाळ कोसळणार आहे त्यांची पंच्याहत्तरी साजरी केली म्हणून .अगं खूप कष्टातुन दिवस काढलेत त्यांनी.आता सुखाचे दिवस आलेत तर करुयात की वाढदिवस साजरा.आपली पोर पण म्हणत होती.

प्रिया:-रागाने ते काही नाही.नाही म्हणल की नाही बिचारे म्हणे बिचारे.मला गप्प बसायला सांगताय.ऐकू द्या की त्यांना पण काय कमवून ठेवलयं लेकरासाठी.दारिद्री मेली मी कष्ट करुन आज माझ्या पगारावर हे घर आल.आज तेवढ तरी डोक्यावर छप्पर आहे नाहीतर इथ तिथ भिख मागावी लागली असती.काय आहे हो तुमच्या आईबापांची लायकी आणि पोरांना तुम्हाला बोलायला काय जातय.मला काटकसर करून सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लावावा लागतोय.त्यांना काय जातय म्हातारपणी आयते चोचले करून घ्यायला आणि तुम्हीतर बोलूच नका.दिडदमडीचा तुमचा पगार आणि म्हणे हॉल करू ते चालणार नाही.

सुजय:-अगं किती आवाज चढवतेय हळू बोललं तरी ऐकू येत मला.अगं आईवडील काय परके आहेत होय त्यांच्या आशिर्वादाने होईल आपल सगळ ठीक.अगं नानाचं वय झालय.पिकल पान कधी गळेल सांगता येत नाही.तेव्हा मी काय म्हणतोय बर साध्या पद्धतीने करू जाऊदे उगीच वाद घालू नकोस.

प्रिया:-परत तेच मला बोलायला भाग पाडू नका.मला आॉफीसला उशीर होतोय.एक तर ही वन बी एच के ची घर त्यात ही म्हातार्यांची अडगळ आणि अजून हौस तर राजाची.मला जमणार नाही.

सुजय:-अगं काय बोलतेस आईवडील का मुलांना अडगळ असतात.अगं तुझ्या आईवडीलांचा वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करतेस की तेव्हा नाही होय म्हातारपणीचे चोचले दिसत.

प्रिया:-सुजय जास्त बोलू नको हे बघ माझ्या आईबापाचं काढायच नाही.माझे आईबाबा मोठ्या पगारांच्या नोकरीवर आहेत तुझ्या आईनानांसारखे नाहीत ऐतखाऊ.

सुजय:-प्रिया (म्हणून तिच्यावर जोरात ओरडला).अग काय मनात येईल ते बोलतेस तुला काही डोक्याचा भाग आहे का.अडगळ काय म्हणतेस,ऐतखाऊ काय म्हणतेस.

प्रिया:-(बोट दाखवत)सुजय आवाज खाली करायचा.रोज रोज त्या आईनानांच कौतुक मी ऐकून घेणार नाही.बघ माझे

आईबाबा मुलगा असतानाही स्वतः स्वतंत्र रहातात.त्यांना कसलाही त्रास देत नाहीत आणि हे आपले आहेत नमुने जे आपल्याला सोडतच नाहीत. हद्द झाली बाई काय कराव असल्या नवर्याला.कधी बायकोच ऐकतच नाही.या माझ्या घरात नानांचा वाढदिवस नाही म्हणजे नाहीच करायचा (म्हणत प्रिया बडबडत होती)

सुजय:-(दोन्ही हात जोडत)गप्प बस बाई नाही करत पण तुझ तोंड आवर.मघाच पासून बघतोय वाटेल ते बोलतेस तु्झ्या नादी नाही लागलेल बर म्हणत सुजय आतल्या बाजूने वळत पडदा सरकावत असताना नाना उभे राहून सार ऐकत होते.कदाचीत प्रियाला माहीत असाव नाना तिथ उभे राहिले होते.त्यामुळेच ती आवाज चढवत बोलत होती.(सुजय खाली मान घालून उभा असताना)

नाना:-अरे सुजय सूनबाईच बरोबर आहे अरे कधी जिंदगीत वाढदिवस केला नाही आणि आता काय हे म्हातारपणी वाढदिवस करायचे शोभते होय.अरे तिलाच घर सांभाळायचे असते.तेव्हा उगीच या असल्या फालतु गोष्टीसाठी तुमच्या दोघात वाद नको म्हणत नानांनी सुजयच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणाले,"सुजय जा सुनबाई रुसल्या असतील त्यांना घेऊन आॉफिसला जावा."

आई :-(डोळ्यात पाणी आणत,नानांचा हात हातात घेत)नाना प्रिया जे बोलली त्याचा राग तर नाही ना आलो हो तुम्हाला.काय करु नाना तिचा स्वभावच आहे तरकटी मनाला येईल ते बोलते.मी तिच्या वतीने माफी मागतो.

नाना:- अरे लेकराचे बोल कधी आईवडीलांना लागतात का.काहीतरीच सुजय तुझ जा तुला वेळ होतोय.

आई:-सुजय हा धर डबा बॉटल तुमच्या दोघांची.चला निघा उशीर होईल आणि काही काळजी करू नको.

सुजय:-हो आई (चल निघतो म्हणत नमस्कार केला)अगं आई ऐक की स्नेहा आणि प्रथम अजून झोपलेत त्यांना उठल्यावर शाळेत पाठव.

आई :-अरे रोज काय सांगायच जा त्यांची नको काळजी करू उठवल्यावर आवरते.

सुजय:-आईनाना किती चांगले आहात हो तुम्ही प्रिया एवढं बोलली तरीही मनात जराही मळ नाही तुमच्या.अगं आई तु तर आम्ही गेलो की सगळ घर आवरतेस,पोरांना हव नको बघतेस.आम्ही आॉफीसमधून येई पर्यंत संध्याकाळच जेवणही बनवतेस तरीही...(अस म्हणत तो निघणार)

प्रिया:-हं चला मला वाटलच होत मायलेकरांच काहीतरी शिजत असणार आणि केल म्हणून काय आपल्यावर उपकार करत नाहीत दोन वेळ फुकटच मिळतय गिळायला.तु येणार आहेस का मी जाऊ.

सुजय:-मला तुला एकही शब्द बोलायचा नाही.चला आईनाना मी निघतो म्हणत दोघेही गेले.

स्नेहा:-अगं आजी मम्मी पप्पा गेले का?अगं आज जरा त्यांच्या भांडणाचा जास्तच आवाज येत होता.माझ्या कानावर पडत होते की नानांच्या वाढदिवसाविषयी काहीतरी चालले होते ना.

आई:-स्नेहा असू दे.तु नको लक्ष देऊ जाऊ दे.ती दोघेजण भांडतात आणि परत थोड्या वेळाने गोड बोलतात.चला आपल्याला शाळेला उशीर होतोय आवरून घे मी नाष्टा गरम करते.

प्रथम:-आजी मीही आवरुन येतो दोघांचाही नाष्टा गरम कर तुला उगीच त्रास नको.

आई:-अरे वा आज प्रथम शहाणा झाला की.

प्रथम:-हो आजी आज पप्पा म्हणत होते ना तुला ते आॉफिसला गेल्यावर किती काम पडतय ते आम्ही ऐकलयंं.आजी मम्मीचा एवढा आवाज ऐकूनच आमची झोपमोड झाली होती.आम्ही दोघेजण सगळं ऐकत होतो.

आई:-बर चला या आवरून आज आजीने तुमच्यासाठी सुशीला बनवलाय चला पटकन.

   सुजयच्या मनात सकाळी घरी झालेला किस्सा तो आॉफिसमध्ये गेला तरीही रेंगाळत होता.त्याने मनाशी ठरवले होते की कसही करून नानांचा वाढदिवस करायचा म्हणजे करायचा पण प्रियापुढे काहीच चालत नव्हते.तरीही आईची इच्छा म्हणून सुजयचा जीव तळमळत होता.तो त्या दिवशी दिवसभर प्रियाशी एक शब्दही बोलला नव्हता.तसेच ते दोघे न बोलता आॉफिस सुटल्यावर घरी आले.                              सुजय:-स्नेहा बेटा एक ग्लास पाणी आण पप्पांसाठी खूप दमलोय राणी.

 स्नेहा:-आले पप्पा हे घ्या.काय झाल पप्पा तुम्हाला दमायला,आज जास्त वर्कलोड होता का?

 सुजय:-(अगं माझ पिल्लू म्हणत स्नेहाला जवळ घेत तिचे मुके घेतले)अगं तस नाही पण जरा दमलोय.

 प्रथम:-पप्पा चला जरा जाऊ गच्चीवर.खूप बोर होतय घरात बसून दोन मिनिटात येऊ.

 सुजय:-अरे प्रथम.बर चल आलोच.

 प्रथम:-(गच्चीवर जाऊन स्नेहा आणि प्रथम सुजयची वाट बघत)कधी येणार कुणास ठाऊक.

 सुजय:-अरे वा छान हवा सुटलीय. मस्त वाटतय गच्चीवर आल्यावर.बरं बोला काय हवयं.

 प्रथम:-पप्पा आज आम्हाला तुमच्याकडून काही नको उलट आम्हीच तुम्हाला काहीतरी देणार आहोत.

 सुजय:-काय देणार आहात ते तरी सांगा.

 प्रथम:-पप्पा ते तुम्हाला आत्ता नाही दोन दिवसाने कळेल पण त्याच्यासाठी आम्हाला तुमच्याकडून दोन हजार रूपये पाहिजेत,देता का?

 सुजय:-अरे एवढे पैसे कशाला?

 प्रथम:-अहो पप्पा आम्ही ते पैसे आमच्यासाठी नाही वापरणार ,तुम्ही द्या तरी.

 सुजय:-बर हे धरा म्हणत पैसे हातात टेकवले.    (सुजय मनातून खचत होतो की आपण वाढदिवस करू शकत नाही म्हणून)

 प्रथम:-स्नेहा आपल गुपीत कोणालाही कळता कामा नये (म्हणून दोघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या)

  दोन दिवसाने नानांचा वाढदिवस आला होता पण कसलीच तयारी करता आली नाही.प्रिया तोंड पाडून बसली होती.दोन दिवसानंतर...

सुजय:-बाबांच्या पाया पडत बाबा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पण मी काही करू शकलो नाही.

नाना:-अरे वेड्या तुझ प्रेमच आम्हाला लाख मोलाच आहे कसला करतोय वाढदिवस.

सुजय:-आई नानांचं औक्षण कर.जरा घरात गोडाच कर.अस कर ना श्रीखंड पुरीचा बेत कर.मी प्रथमला पैसे देऊन ठेवतो तो श्रीखंड आणेल आणि मग चांगला बेत होईल काही नाही तर तेवढे तर(असं नाराजीच्या सुरात म्हणत)

आई :-बरं बाबा मी करते चांगला बेत,तु नको काळजी करू चला जावा वेळ होतोय तुम्हांला.

स्नेहा:-पप्पा पप्पा ऐका ना आज तुम्हाला तुमच्या लंच टाईमला जरा घरी याव लागेल माझा फॉर्म भरायचा आहे तेव्हा मी फोन केला की या बघा.

सुजय:-अगं स्नेहा मग आण ना मी आता भरून देतो आणखी वेळ आहे माझ्याकड.

स्नेहा:-नाही नाही तुम्ही आता जावा अजून मला सगळे डॉक्यूमेंट काढायला वेळ लागेल.

सुजय:-अगं पण मला परत घरी...

स्नेहा:-पप्पा एवढं काय हो लेकीसाठी 

सुजय:-बरं बाई.

 प्रथम:-झाले का स्नेहा पप्पांच्या लंचचा टाईम झाला चल आवर पटपट तुला माहीत आहे आपल्याकडे वेळफार कमी आहे.

 स्नेहा:-हो झालच माझही आवरलय मी फोन करते.(फोन लावत)"पप्पा या ना आणि हो जरा नेळ लागला तर तस आॉफिसमध्ये सांगून या लवकर या पटकन"

 सुजय:-हो आलोच बेटा म्हणून डबा तिथे न खाता तसच गाडीला कीक मारून घरी आला बेल दाबली.

 प्रथम:-वेलकम पप्पा (म्हणत स्वागत केले)

 सुजय आश्चर्यचकीत होऊन घराकडे आणि आलेल्या सगळ्या मंडळींकडे पहात होता.

 स्नेहा:-पप्पा सरप्राईज कस वाटलं.

 सुजय:-खूप छान मला जे जमल नाही ते तुम्ही केलत पोरांनो.कस काय केलत सगळं.

 स्नेहा:-पप्पा तुमची तळमळ बघून आम्हाला खूप वाईट वाटलं.म्हणून तुमच्याकडून आम्ही घेतलेल्या पैश्यातून हे फुगे,केक,आजोबांना कपडे,पुष्पगुच्छच नाही तर सगळ्या आलेल्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वडाची रोप आणलेत जी रोप ह्या आजी आजोबांप्रमाणे सगळ्यांना कितीही वाईट वागले तरी अखंड सावली देत राहतील.पप्पा आमची दोन दिवस झाले तयारी चालु होती.

 प्रथम:-पप्पा आम्ही तुमच्या मोबाईलमधून आणि काही डायरीतून नंबर घेऊन आजोबांच्या सगळ्या मित्रांना कालच फोनवरून आमंत्रण दिले होते आणि हो शेजारच्या आपल्या विजय काकाला गरमागरम पुरी भाजी वड्याची आॉर्डरही दिलीय तेव्हा तुम्ही काहीही काळजी करू नका चला सगळे आलेत.तुम्ही आवरा पटकन आपल्याला मम्मी आत हे सगळं उरकायच आहे.आजोबाही तयार आहेत फक्त तुमच्या म्हणण्यासारख आम्हाला हॉल बुक करता नाही आला.

 सुजय:-प्रथम खरच तु मोठा झालास आज मी धन्य झालो माझ्या मनाला.आयुष्यभर रुकरुक लागली असती की मी आई म्हणत असताना नानांची पंच्याहत्तरावी साजरी केली नाही.अरे पण सगळेजण प्रिया कुठे आहे म्हणून विचारणारच ना तेव्हा काय सांगायच.

 स्नेहा:-पप्पा अहो लोकांना माहीत आहे मम्मी जॉब करते म्हणून तेव्हा त्यांना मी सांगते मम्मीची मिटींग आहे बाहेरगावी आणि हे बघा जग काय म्हणतय त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका.तुम्हाला तुमच कर्तव्य आणि आजी आजोबांना आनंद बघायचा आहे ना तर मग बघताय काय व्हा सामील म्हणत स्नेहाने पप्पांना आवरायला सांगितले.

 सगळं घर नानांच्या मित्रपरिवाराने बघून नाना त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारताना बघून सुजयला खूप आनंद झाला.

 (नानांनी केक कट केला आणि मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करत असताना)

 सुजय:-आज हा आनंद घरभर पसरलाय तो फक्त स्नेहा आणि प्रथममुळे.त्यामुळे आज मी म्हणल तसा मोठा वाढदिवस नाही साजरा करू शकलो तरी पण आज सगळेजण इथ आल्यामुळे माझ्या नानांना झालेल्या आनंदामुळे मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे.(म्हणत सुजयने सगळ्यांचे आभार मानले तेवढ्यात बेल वाजली.सुजयची नजर दरवाज्याकडे लागून राहीली होती आता नेमके ह्या वेळेस कोण आले असेल म्हणून.दार उघडताच प्रिया आत येताना दिसली.सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.)

 (प्रिया टाळ्या वाजवत हॅप्पी बर्थडे नाना म्हणत हातातील पुष्पगुच्छ आणि शाल नानांना देत अगदी प्रेमाने म्हणताना दिसल्यावर)

 सुजय:-अरे बापरे वादळापूर्वीची शांतता तर नाही ना (अस हळूच म्हणत)सगळेजण नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते कोण गप्पा मारत होते तेवढ्यात काहीतरी तमाशा नको म्हणून सुजयने प्रियाला हळूच विचारले,"अग तु कशी आलीस"प्रियाने सुजयचा हात झटकत ती सगळ्यांच्या समोर आली आणि 

 प्रिया:-ओ हॅलो आज इथ माझ्या घरी सगळेजण जमलेल्या मंडळींनो माझ्याकडे लक्ष द्या.(सगळ्यांच लक्ष प्रियाकडे लागले होते.स्नेहा,प्रथम,सुजय,आई नाना यांना तर मनातून भिती वाटत होती.आता काय ही बोलते आणि आलेल्या पाहुण्यांचा अपमान तर करणार नाही ना म्हणून ते एकदम शांत बसले.)

 प्रिया:-(हसत)अजून एकदा हॅप्पी बर्थडे नाना म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या.खर तर आज मला उमजल की घरात वयस्कर मंडळी असणे किती गरजेचे आहे.आज माझ्या आॉफिसमधल्या मैत्रिणीने माझी कानउघडणी केली.ती म्हणाली प्रिया तु खरच भाग्यवान आहेस बाई घरी सगळ सासूबाई करतात पोरांचही त्याच बघतात.तुला घरी गेल्यावर बसल्या जागेवर चहापाणी,संध्याकाळी गरम जेवण.अगं आम्ही इथ दोघच आहोततर काय कुत्र्यासारखे हाल होतात.ते घरातल करा,मुलांच बघा,जॉब बघा आणि हो काल स्नेहा आणि प्रथम बोलतानाही मी ऐकलय की आजी आजोबा म्हणजे आपल्यासाठी वटवृक्षाची छाया आहे आणि आपण त्यांच्यासाठी हे सरप्राईज देण आपल कर्तव्य आहे जरी आई चुकत असली तरी पप्पांसाठी आपण हे गुपचुप करू.तेव्हाच मी ठरवल होत की मीही लंचब्रेक मध्ये यायच पण यायला वेळ झाला.त्यात सुजय आणि पोरही माझ्याशी दोन दिवसापासून बोलत नव्हती.मला पाहिल की दुसरीकडे निघून जायची.

    तेव्हा मीच मनात विचार केला,आतापर्यंत माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती दोघ किती झटतात.सासूच तर वय झाल असून त्या घरातल सगळ करतात मी एवढ टाकून बोलूनही त्या कधीच मनात तीढ न ठेवता मला अगदी मुलीप्रमाणे जपतात आणि मी म्हणजे एवढा स्वार्थी विचार करते.खर तर हे मुळ आहे म्हणूनच त्यांच्या जीवावर आम्ही फांद्या होऊन आनंदाने डोलतो.माझी मुल दोन दिवस मला नाही बोलली तर मला किती त्रास झाला.आज मी कित्येक दिवस झाल त्या दोघांशी बोलत नाही.खरच माझं खूप चुकलं.जमत असेल तर मला माफ करा आणि तुमच्या मला न सांगताच्या आनंदात सामील करा .करचाल ना.

 (स्नेहा आणि प्रथम म्हणून ती रडत होती)

 सुजय:-आज खरच स्नेहा आणि प्रथमचे खूप उपकार झाले.त्यांच्या या आजीआजोबाला जपण्याच्या गुणामुळे मला माझी खरी प्रिया मिळाली.

 आई नाना:-अगं सुनबाई तु तर आमचचं लेकरू आहेस.आपल्या माणसात माफीला आणि रागाला जागाच ठेवायला नको.ये इकड सुनबाई म्हणत दोघांनी जवळ घेतलं.

 प्रिया:-आज मी धन्य झाले तुमच्या आशिर्वादाच्या आणि प्रेमाच्या पावसापासून मी किती दिवस वंचित होते.

 सगळ्यांंचेच डोळे पाणावले होते.खरच सुख कशात आहे तर सुख प्रत्येक क्षणात शोधता आले पाहिजे.नव्हे नव्हे तर असे बारीक सारीक सुखाचे क्षण वाटता आले पाहिजेत.दिल्याने प्रेम वाढते आणि आपुलकीही.

 सुजय:-आज खरच माझी प्रिया शोभतेस म्हणत तिला जवळ घेतले.

 प्रथम आणि स्नेहानेही खूप दिवसाने मम्मी मम्मी करत स्नेहाला मिठी मारली.प्रियाचा मी करते मी करते हा डौल सगळ्यांना खटकत होता आणि ती मी पणामुळे सगळ्यांपासून दूर होत होती जे तिला आज उमगले होते.

 सुजय:-चला खरच आज नानांची पंच्याहत्तरावी साजरी झाली (म्हणत सगळे जल्लोष करत असताना)

 प्रिया:-नाही नाही पुढच्याच सहा महिन्यात आई नानांचा वाढदिवस आहे तो मात्र आपण नक्की मोठ्या थाटात साजरा करू.

 अरे वा वा म्हणत सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

      बघा तरी सामील होऊन आनंदात 

           काय आनंद मिळतोय 

                 डोकाऊ नका आमच्यात 

                     मस्त चाललयं आमचं



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy