Kalidas Waghmare

Tragedy

4.0  

Kalidas Waghmare

Tragedy

मुठभर घास

मुठभर घास

11 mins
403


  ...........कोरभर भाकरीच्या तुकड्यासाठी रानभर धुडाळनारा दामोदर रामराव पाटलाच्या शेतामंदी दिसाच्या मंजूरीने लाकुड फाटा तोडण्यासाठी गेला....उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाचा पारा भलताच चढला होता दिस माथ्यवर येवुन ठेपला....वर सावल्या पायाखाली येवून स्थिर झाल्या....तसे दामोदरचे सवंगड दुपारच्या भोज्याला पिंपरनीच्या झाडाखाली बसली,दामोदर हातामध्ये कुह्राड घेवून सागाच्या झाडाची फाटे साळत होता तवां रामराव पाटिल दामोदरला आरळी ठोकतो......


"अरं ओ दाम्या sss"

तसा दामोदर पाटलाला म्हणतो....

"कायवं पाटिल ss"

"अरं तुया संगची भाकर तुकडा खातीत"

पाटिल प्रमाणिक पणे दामोदरला म्हणतो मात्र दामोदर सकाळपास्न उपाशीच असतो कारण घरी अन्नाचा कन देखील नसतो....त्याची चिमुरडी पोर मुठमर घासासाठी भुकेने व्याकुळ झालेली असतात त्याची बायको घोट भर पाणी पिवुन कसीबसी दिवस काढण्याचा प्रयत्न करते..मुलांनकडे पाहुन दामोदर कसाबसा जगायचा घरामध्ये चीमुटभर पिट देखील न्हवत

त्यामुळे तो उपाशी पोटीच कामाला लागला होता

         भाकर आनलं नसल्या मुळे तो पाटलाला म्हणतो....

"पाटिल, मपला उपास हायजी"

"दाम्या कंचावार हायरं आज...?" पाटिल म्हणतो तेव्हा सर्व सवंगडी मोठ मोठ्याने हसतात...

"पाटिल गुरुवार हाय न्हवं" दामोदर पाटलाला दबक्या आवाजात म्हणतो.....

"बर असून दे,पाणी तर प्याशील का न्हाय ?"

"व्हयजी पाटिल,प्यातोकी"

तसा दामोदर झाडावुन खाली उतरतो नी पाटलाच्या जवळ येतो तवां पाटिल दामोदरच्या पाटीवर थाप मारत म्हणतो....

"अर तुम्ही करती पोर हातं "

"व्हयजी पाटिल"

होकारआर्थी मान हालवत दामोदर पाणी पितो ....

आणि बराच वेळ टळुन जातो,लाकुड फाटा तोडुन साच्याला दामोदर घराकडे वळतो. दिवस माती आड जातो...सर्वत्र शांतता पसरते ,पाच पन्नास कौलारु घरांच ते गाव काळोख्यामध्ये डुबून जातं..

बराच वेळ होतो सकाळी गेलेला दामोदर घरी परतला नसल्यामुळे सावित्राच्या जीवाला दामोदरचा घोर लागतो. भुकेली पोरं बापाच्या येण्याची वाट पाहत दारामंदी उभी होती ,सावित्रा पोरांना म्हणाली........

"अरं,पोरांनो गुमानशान बसाकी ,(वयतागुन म्हणते)येवुन जावुन कटकट ,ये बुवाबी सकाळपास्न कामाला गेलाय अजुन पत्ता न्हाय घरी परतायचा "

"आई बा कवा येईन"

"येतीन की"

सावित्राच्या अंगामध्ये त्राण नसल्यामूळे ती जास्तीच बोलत न्हवती दामोदरची पोरं गण्या माध्या बापाच्या येण्याच्या वाटेकडे टक लावुन बसली होती. बराच वेळ होतो घरामध्ये प्रकाश नसल्या मुळे काळोख पडल माध्या बापाच्या येण्याच्या वाटेकडे टक लावुन बसत बराच वेळ होतो.. घरामध्ये प्रकाश

नसल्या मुळे काळोखा पसरला होता. घरोघरी चुली पेटल्या चुन व वाग्याच्या भरीताच वास सर्व वस्ती मध्ये पसरला गण्या नि माध्याच्या तोंडाला पाणी सुटल तवा गण्या सावित्राला म्हणतो....

"अग ए आए,चुनचा मले वास येत बघ"

"मला बी येतर गण्या"

माध्या मध्येच मान डोलवत म्हणतो सावित्रा मात्र 'ब्र' देखील काढत नाही बराच वेळ टळुन जातो काळवंडलेला काळोखा आधिकच दाटुन येतो तशी सर्व गली बोळ शांत झाली सर्व रस्ते सुने सुने भासत होते तालुक्याच्या ठिकाणी कामाला गेलेली संम्दी गावकर मंडळी घराकडे परतली. मात्र दामोदरचा


दामोदरचा काही पताचं न्हवता सावित्राच्या मनामध्ये भीतीचा काहुर माजला, तशी सावित्रा हळव्या मनाची सावळ्या रंगची अंगावर मळकट लुगडी नी फाटकी चोळी अठरा विश्व दारीद्र्याची साक्ष देत होत. गण्या उघड्या अंगानी सावित्राच्या माडीवर आडवा पडला त्याच्या पायथ्याशी माध्या झोपला तप्त तापलेल्या पत्रामूळे गरमी होत होती तशी सावित्रा पदराने वारा घालुन त्या दोघाना झोपवत होती. बराच वेळ टळून जातो सावित्राच्या मना मध्ये भितिचा कल्होळ उठला होता तिचे हात पाय लकवा मारावे तसे लट लट कापायला लागले. दामोदर आला नसल्यामुळे तिच्या मनामध्ये त्याच्या प्रती कुशंका निर्मान होत होत्या ,

भाळावरील कुंकवाच्या लाल टिळ्यावर हात फिरवत सावित्रा स्वत:च स्वत:शी आतल्या आत पुटपुटते नी म्हणते

"अरं देवा, माया कुंकवाच काही बर वाईट तर झाल नसलना, नाही मले त्याना शोधावच लागन"

अशी म्हणत ती खडबडुन उभी राहते नी दारातुन बाहेर पडते.....

तेव्हा कोणाच्या तरी येण्याची चाहुल सावित्राच्या कानावर पडते काळोखा पसरला असल्यामुळे काही दिसत नाही तेव्हा ती त्या दिशेने आवाज देते

"क..क..क कोन आहे "

तसा दामोदर काळोख्याला मागे सारत घरी परततो...

सावित्रा दामोदरला बघताच तिचा जीव भांड्यात

पडल्या सारखा होतो...एकदाच ती भितीतुन मुक्त झाली नी दामोदरला खिन्न स्वरात म्हणाली

"धनी, आलासा तुम्ही "

तेव्हा निराश अवस्थेत असलेला दामोदर उदास होवुन म्हणतो...

"व्हय,पोर झोपलीयात का ?"

तशी सावित्रा म्हणते ...

"धनी,पोर लय वाट फायली तुमची ,उशीर झालं म्हणुनशान तशीच पडली"

"काही खाल का?"

दामोदर उदास होवुन भिंतीला माथा टेकवत "काय खानार व धनी ,तुम्ही पण सकाळपास्न उपाशीच हायसा"

"मपल सोड गं सावित्रे"

अस म्हणत दामोदर खमीसातुन पुडी काडतो आती सावित्राला म्हणतो ...

"सावित्रा पोरांना उठीव"

"काय आनलं व धनी "

सावित्रा खिन्न होवुन म्हणते ...

"काही नाहीगं सावित्रे,खंडोबाच्या देवळामंदी आप्पा पाटालाची पंगत व्हतीया ,परसाद आनलुया बघ"

दामोदर खिन्न होवुन म्हणाला ...तशी सावित्रा गण्या माध्याला उठवते नी म्हणते...

"पोरांनो बा आलाया तुमचा उठा"


तसे गण्या माध्या खडबडून जागे झाले तेव्हा सावित्रा त्यांच्या डोक्यावर हाथ फिरवत म्हणते ...

"तुमच्या बा नं खाऊ आनलय दोन घास खाउन घ्या "

खाऊ हा शब्द कानावर पडताच गण्या माध्या चकीत होतात नी एका स्वरात म्हणतात....

"खाऊ आनलेत बा, आई"

"व्हयरं माया सोन्या "

सावित्रा कुरवाळत म्हणते तसे गण्या माध्या प्रसाद खातात माध्या मोठावं समजदार असल्याने दामोदर व सावित्राच्या तोंडाकडे पाहत

म्हणतो ...

"ए आए तु पण दोन घास की"

माध्या अस म्हणताचं दामोदरच्या नेत्रामधुन खळ दिशा पाणी खिळुन वर येत सावित्राचे ही चंक्षु पाणावतात ,त्यातुन येणारे अश्रु ती आपल्या पदराने पूसते नी माध्याला म्हणते .....

"माया सोन्या आमच पोट कवाच भरल"

"आए मपल्याशी खोट बोलते तु "

माध्या मान हालवत म्हणते तशी सावित्रा त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणते ...

"नाहीरे माया सोन्या"

तेव्हा माध्या आपल्या हाथाने दामोदरला घास भरवतो तेव्हा दामोदर माध्याला कडाडुन मिठी मारतो सावित्रा गण्याचं डोकं मांडीवर ठेवुन त्याला थोपटते उन्हाळ्याचे दिस असल्या मुळे पत्र तप्त तापले होते. त्यामुळे घरामध्ये गरमीचा पारा वाडला त्यामुळे गण्या माध्याच्या अंगावाटे घामाचे लोंडे वाहत होते तशी सावित्रा त्याना पदराने वारा घालत होती ....त्यामुळे गण्या माध्या कसे बसे

झोपतात....दामोदर दिवस भर काम केल्यामुळे त्याला क्षिण येतो व तो जागीचं अडवा पडतो ...

मात्र पोटामध्ये कन भर देखील अन्न नसल्यामुळे त्याला स्वस्त झोप येत न्हवती ...तो कधी या

अडांगावर झोपायचा तर कधी त्या ...पोटामध्ये पार कावळे ओरडत होते दामोदर तसाच पडुन राहीला सावित्राला गाढ झोप लागली गावामध्ये सगळीकडे शांततेचे वातावरण पसरले ...आधुन मधुन कुत्र्यांच्या भुंकन्याचा आवाज येत होता झाडे स्थिर झाली होती काळोख्यामध्ये गाव बुडुन गेल

होतं ...शशी पुढे सरकत होता अभाळाला छिद्र पडल्यावाणी चांदण्या लुकलुकत होत्या रात्र सरत होती ...पहाटेचा सुसाट वारा सुटला होता ...

दामोदरल लवकरच जागी झाला नी बाहेर अंगनात येवुन बसला होता त्याच्या डोक्यामध्ये असंख्य विचार थैमान घालत होते काय कराव काय नाही याच त्याला काहीच कळत नव्हतं डोक्याला हाथ लावुन खिन्न स्वरुपात बसतो ....

भाळावर पडलेले केस बाजुला सारत सावित्रा जागी होते नी उठुन बसते तिची नजर पोरानवर पडते पोरमात्र शांत निजलेली असतात ...धुकाधुकासा अंधार असल्यामुळे सावित्राला स्पष्ट दिसत न्हवतं बाजुला झोपलेला दामोदर पहाटेच बाहेर बसतो तेव्हा सावित्राची नजर दामोदरच्या अंथरुनावर पडते ,दामोदर नसल्याने तिच्या मनामध्ये भितीचा काहुर माजतो तेव्हा ती भितीने म्हणते ...

"ध s sधनी"

अंथरुनात दामोदर नसल्याने ती खडबडुन बाहेर पडते ...तिची नजर त्याच्यावर पडताच क्षणी सावित्राला हायस वाटतं... नी शांत पावलाने ती दामोदर पाशी येते ...दामोदर कपाळाला हात लावुन बसलेला असतो सावित्रा त्याच्या जवळ येते.

सावित्रा त्याच्या पाशी उभी आहे याची त्याला काडी मात्र ही कल्पना नसते ...दामोदरची उदासीनता पाहुन सावित्रा त्याच्या खांद्यावर हाथ ठेवते ...तेव्हा दामोदर भिथरतो नी माघेवळुन पाहतो ...तेव्हा सावित्रा त्याला म्हणते ...

"धनी,कावुन शान चेहरा पाडुन बसतावं"

दामोदर कहीच बोलत नाही सावित्रा पण दामोदर पाशी उदास होऊन बसते अंगावर मळकट कापड घेवुन दामोदर डोळ्याचचिपड काढत खिन्न होवुन

सावित्राला म्हणतो

"सावित्रे, म्या तुमाले काहीच नाही देवु शकत गं तूमाले "

"असं कावुन शान म्हणता व धनी"

सावित्रा खिन्न स्वरात म्हणाली

"नाही गं सावित्रे म्या तुम्हाले काहीच नाही देवु शकन"

सावित्रा डोक्यावरला पदर कमरेत कसुन दामोदरला म्हणते...

"धनी, तुम्ही धीर सोडुनकासा"

"पर करु तरी काय म्या?"

"पर करु तरी काय म्या?"

दामोदर वैतागुन म्हणतो ...

"धनी,तुम्ही अस म्हणतातर आमच्यकड कोण बघनारवं"

सावित्रा खिन्न होवुन म्हणाली तसा दामोदर उठून उभा राहतो नी म्हणतो ...

"सावित्रा, मपल मन लागत नाही ,कुठ काम धंदा पण लागत न्हाय ,दुष्काळान तर पार पिकाची माती केली ,कसा काळ लोटल कुनास ठाव "

"सम्द येवस्तीत होईल व धनी "

सावित्रा दामोदरची समज काढत पहाटेच्या पारश्या कामाला लागत. दामोदर रामराव पाटलाच्या कामाचे पैशे आणण्यसाठी जातो .योगायोगाने रा

रामराव पाटिल दामोदरला म्हणतात....

"कुठ निघालार दाम्या s s"

पाटिल खमक्या आवाजात म्हणतात,तसा दामोदर रामराव पाटलाला रामराम करतो म्हणतो

"वाईच पाटिल तुमच्याकडच यालतोजी "

"मायाकड !"

"हाजी पाटिल"

दामोदर हळुवार म्हणतो ...

"काय काम काढल"

"पा s s टिल"

दामोदर बोलताना अडखळतो

"बोलकीर मर्दा"

"पाटिल मंजूरी s sचे पैक दिलतर उपकार व्हईल "

"अरं देवुत की "

"पर पाटिल"

"हे बघ दाम्या आता मपल्याजवळ पैक नाहीत दोन दिसात देवुन टाकतो "

पाटिल खमक्या आवाजात बोलतोनी निघुन जातो.

दामोदर निराश होवून घरी परततो ...गण्या माध्या दारामध्ये बसलेली असतात सावित्रा घरकाम करुन ओसरीत बसते भुकेनी व्याकुळ

झालेली पोरं तोंडातून 'ब्र'देखील काढत न्हवती असच दोन तीन दिस उलटून जातात काम धंदा नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा गंभीर प्रश्न दामोदर पुढ येवुन पडतो तेव्हा दामोदरला काही सुचत न्हवत गावो गाव धुडाळतो कुठे लग्न आहे का? काही मित्राच्या इथे देखील जातो मात्र कोणी त्याला कामधंदा देत नाही आता दामोदरकडे कोणताच पर्याय उरलान्हवता तो एके दिवशी खिन्न होवुन घरमंदी बसला तेव्हा गण्याला उपास मारीने चक्कर येते तो बेशुध्द पडतो ...बेशुध्द पडलेला पाहुन सावित्रा किकांळी फोडते ....

"गण्या s s"

तशी ती त्याच्या जवळ येते डोकं आपल्या नी

आठवन काढून रडत बसते सावित्राकडे पाहुन दामोदरचे नेत्र पाणावतात ...तेव्हा तो आपल्या नशिबाला दोष देत म्हणतो ...

"मपल नशिबच फुटक की ,देव बी कुठ लपलाय की कुनास ठाव ,आम्हा गरीबावर अन्याय करुन काय मिळणाररं देवा "

सावित्रा कपाळ बडवते ,हाताची काकण फुटुन विखुरतात गण्या मात्र सावित्राच्या कुशीत निपचीत पडतो ...तो उठन्याच नाव देखिल घेत नाही माध्याचेही चंक्षु पाणावतात नी मायेच काळीज असल्या मूळे सावित्रा गण्याला गदागदा हालवते भुकेने व्याकुळ झालेला माध्या अंगात त्राण नसल्यामुळे खिन्न होवुन सावित्राच्या

बाजुला बसतो ...दामोदर डोक्याला हाथ लावुन रडत बसतो ...सावित्राच्या डोळ्यातलं पाणी भळाळदिशा ओघळ आल्यावानी डोळ्यातुन टिपुन गण्याच्या डोळ्यावर पडतं एक दोन थेंब पडताच त्याला होश येतो तळ हाथाचे बोट वळवळतात सावित्राला मात्र रडण्याच देखिल भान न्हवतं ती रडन बंद करत न्हवती सावित्राच्या रडण्याचा भास गण्याला होतो तसा गण्या हळूवार डोळे उघडतो नी कावरा बावरा होवून सावित्राकड बघतो तेव्हा माध्या सावित्राला म्हणते ...

"आए गण्या ..."

   असं म्हणताच सावित्रा गण्याला कडाडून मिठी मारते , दामोदर डोळ्यातल पाणी पुसत गण्याच्या जवळ येतो नी म्हणतो...

"काय व्हतय रे माया सोन्या?"

गण्या ओठातुन 'ब्र' देखील काढत नाही सावित्रा गण्याला कुरवाळत ,म्हणते...

" माझ्या सोन्यार, माझ्या लाडक्यारं , माझ ताईत्र तू माझ्या राजार तु "

अस म्हणत सावित्रा त्याचे पापे घेते तिच हाळवं प्रेमळ दयाळू रुप पाहून दामोदरच्या कायेवर शहारे उमडतात ....त्याला काय म्हणाव हे देखील सुचत नाही ...प्रश्न होता गंभीर, तो म्हणजे भाकरीचा, उपाशी पोटी दामोदर ही काही करु शकत न्हवता...मुलतर दोन दिसाची भूकेली होती.. हे दामोदरला सारक खटकत होतं ...

      काम धंदा तर नाही, पण भाकर पाण्याच काय कराव ह्या विचारात तो पुरता गळुन गेला ...

शेवटी दामोदरच्या पुढ एकच उपाय होता तो म्हणजे चोरी करायचा. दामोदर एकदाच ठरवतो नी आतल्या आत पुटपुटतो ...

"वाईच अस तर पोट भरत न्हाय, पर मुटभर घासाची चोरी करुन पोरांच पोट भरता येईन"

अस म्हणत दामोदर साज्याची वाट बघत होता ...

कधी दिस बुडुन जाईल याचीतो वाट पाहत

बसला...बराच वेळ झाला गाई गुर घरी

परतायची वेळ झाली नभा मध्ये चहु दिशेने विहंग उठला...नी खग निवारा शोधायला लागले तप्त तापलेला निळ्याशार अभ्रकामधुन वाहनारा भास्कर माती आड गेला ...तसा सोमठाणा काळोख्यामध्ये बुडुन गेला ...गावाबाहेरील चार दोन वसतीचे लोक मधीरा पिवुन थैमान माजवत होती ...कामधंद्यासाठी तालुक्याला गेलेली पोर रातच्याला घरी परतत होते दिसभर काम करुन थकुन गेलेली मंडळी जागीच लाम पडत होती दुष्काळामुळे गावामध्ये काडी मात्र रंग राहीला न्हवता ...जोतो कामधंद्यासाठी पुण्या-मुंबईसारख्या महानगरात गर्दी करत होती त्यामुळे

गलीबोळा सुन्या-सुन्या भासत होत्या. चार दोन धनिक लोक गावामध्ये ऐटीत वावरत होते ...

अमावसेची रात्र होती घनघोर काळोखा पडला होता, दामोदर जागीच होता गावातील माणसे झोपण्याची वाट पाहत होता ...सावित्रा गण्या माध्याला पदराच्या पवनाखाली झोपवत होती पोटमध्ये अन्न नसल्यामुळे गण्या रडत होता सावित्रा गण्याला पाणी पाजवुन कशी बशी समज काढत होती ...गण्याच पोट पाटीला लागल होत मुलाचं रडण पाहुन सावित्रीचे चंक्षु पानावतात तसा गण्या सावित्रीच्या मांडीवर डोंक टेकवतो नी निपचीत पडतो ...

माध्या समजदार असल्याने परिस्थिति समजावून घेतो ...दामोदर कानोसा घेत घरबाहेर पडतो...तवा

सावित्रा दामोदरला म्हणते ...

"धनी,रातच्याला कुठ ?"

"कुठ न्हाय"

दामोदर खिन्न होवुन म्हणतो ...

"म्हणजी"

सावित्रा शब्दाला जोर देत म्हणते...

"परसाकड जावुन येतुया"

        तसा म्हणत दामोदर कुणब्याच्या वस्ती कडे वळतो ...दिसाचा कामधंदा केल्यामुळे

सर्व मंडळी शांत निजली होती ....गल्ली बोळ सुने -सुने भासत होते ...कुत्रे आदुन मधुन भुकंत

होते...दामोदर जीव मुठीत धरुन कुनब्याच्या वस्तीत शिरला आंधारलेल्या काळोख्यामध्ये वाटेतील दगड ही दिसत न्हवते दामोदर शांतपावलाने हळूवार माधवरावांच्या घरापाशी येवुन थांबला ...नि नखशिकांत तो थरथरुन

कापत होता ...भीतीमुळे त्याच्या अंगाला दरदरुन घाम सुटला हाताला लकवा मारावा तसा हाथ थरथरायला लागला ...गण्या माध्याचा चेहरा

त्याच्या समोर ताटकळ दिसायला लागला मुलांच्या प्रेमा खातर दामोदर मन घट करुन माधवरावांच्या

ओसरीत पाऊल टाकतो ...सुरुवातीला दामोदर माधवराव शेंडें झोपलेत का नाही याची खातरी करुन घेतो ...नी झोपलेला पाहुन तो ओसरीमध्ये शिळी कुटकी धुडाळतो ...योगयोग असा होतो की

माधवरांवाची बायको जागी होते कोणीतरी जागी झाल्याचा चाळ दामोदरच्या कानावर पडते ...तो खडबडून ओसरीचा आडोसा घेतो ...तवा माधवराव उठून त्याच्या बायकोला म्हणतो...

"कायवं कारभारीनबाई कायले उठन राहीलत"

"काही नाही वं धनी"

"निजा गुमान"

"धनी निजच लागत न्हाय"

"कायवं कारभारीनबाई कायले उठन राहीलत"

"काही नाही वं धनी"

"निजा गुमान"

"धनी निजच लागत न्हाय"

"कंच सपान तर पडल न्हायन "

"न्हायव धनी"

"मग अस कावुनशान जागी झाली तु"

"कोणतर आल्याची चाहून झाली मले"

ती खिन्न होवुन म्हणाली...

"कुत्रे येरजा करतीत, त्याची चाहुल झाली असन तुले"

माधवराव मिश्किल पणे म्हणतो...

"तुमचं आपल काही "

लक्ष्मी गालात हसुन म्हणते...

"निजा आता पहाटेच लवकर उठाव लागन "

ती होकारआर्थी मान हालवते ...नी अंथरुनावर आडवी पडते...एकदाच दामोदर बचावतो नाही तर त्याची काही खैर न्हवती ...दामोदर देवाच्या

पाया पडत मनामध्ये देवाचा जप करतो ...नी आतमध्ये शिरतो घरामध्ये काळोखा असल्याने त्याला काही दिसत नाही ,त्यामुळे तो हातापायाने चाचपत भाकरीच पेठार धुडाळतो ...दामोदर खरतर चोरी करायला आला होता मात्र ती पैशाची नसुन भुकेल्या पोरांसाठी मुठभर घासांची होती ...

बराच वेळ दामोदरचा भाकरी धुडाळन्यात जातो ...

शेवटी चुल्या मधील विस्तवाचा निखारा फुलतो तशी दामोदरची नजर चुलीवर पडते ,चुलीवर शिळी

भाकर तुकडे दिसता दामोदर भाकर तूकडी उचलतो एका पातेल्यामध्ये भात असतो ...चरवी मध्ये भाजी असते ,दामोदर भात कपड्यामध्ये

बांधतो...भाजी नेता येत नसल्यामुळे तो चरवई उचलतो नी शांत पावलाने घरा बाहेर पडतो ...घराबाहेर पडता क्षणी त्याचा डावा पाय माधवरावच्या बायकोच्या पायाला स्पर्शतो तेव्हा ती खडबडुन जागे होवुन किंकाळते ...

"च s s चोर s s चोर"

       तिची किंकाळी ऐकुन माधवराव जागा होतो तेव्हा दमोदर निसटन्याचा प्रयत्न करतो ...माधवरावाची नजर दामोदर वर पडताच माधवरावाला रागाचा पारा चढतो ...तो रागाच्या भरात म्हणतो ...

"थांबरं ए गचकाळीच्या, दावतो तुला आता "

दामोदर पुढे धावतो माधवराव घरामधील आआ आवताची काठी काढतो नी दामोदरच्या माघावर धावतो ...दामोदर पुढे माधवराव माघे अशी क्रिया चालु राहते शेळीच्या मागे लांडगा धावतो अशी गत दामोदरची झाली घराकडे माधवरावची बायको ओरडुन गाव जागा करत होती ...चोर चोर म्हटल्याने गावातील तरुन पोर काट्या घेवून सैरा वैर धावत होती ...सावित्राला दामोदरची काळजी वाटायला लागली चोर चोर म्हतताच सम्दा गाव पेठुन उठला जोतो काट्या घेवून दामोदरच्या मागावर होता... दामोदर पळुन पळुन दमला होता त्यासाठी धावत तो देवळामध्ये अश्रय घेतला सम्दा गाव देवळा पुढ येवून जमा झाला...जोतो कापण्या मारण्याच्या

गोष्टी करत होता ...माधवराव देवळाच्या बाहेर उभा राहुन म्हणतो...

"अरं ऐ चोरा,मुकाट्यान बाहेर येतोस की म्या येवु मंदी "

दामोदर भितीने थरथरुन कापतो त्याला दरदरुन घाम फुटतो हाथपाय लकवा मारतात तसा माधवराव तरुन पोरांना म्हणतो ...

"अरं ए पोरांनो,तो तसा बाहेर येणार न्हाय जा मंदी नी धक्के मारुन बाहेर काढा"

दोन तरनी पोर देवळामध्ये शिरतात,दामोदर आतमध्ये दडुन बसतो ,त्या पोराना पाहुन दामोदर नखशिकांत थरथर कापतो ...जसा कसाई शेळ्याना ओडुन कापतो तशी ती तरनी पोर दामोदरला बाहेर खेचतात दामोदर गया वया करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही तशी ती तरनी पोर त्याच्या कमरेत लाता घालतात दामोदर गया वया करतो पण कोणीच ऐकुन घ्याला तयार नसत...त्याचा तो नाईलाज असतो दामोदर सर्वाची माफी मागत जड अंतकरणान म्हणतो म्हणतो..." गावकर, मले माफ करा पर म्या चोरी न्हाय केली व..."तसे गावकरी मंडळी चिडक्या स्वरात म्हणाली..." चोरी करुन गावल की सम्दी असच म्हणतात " दामोदर हाथ जोडुन म्हणतो..." न्हाय व गावकर ,मपली पोर दोन दिसाची उपाशी हायताजी, त्यांच्या खातर मुठभर घास न्यावा म्हणुनशान चोरी केली बघा, मपली चुक झाली मले माफ करा.."

तसा माधवराव ओरडुन म्हणतो.. "न्हाय खोट बोलतो हा मारा याला " तशी गावकरी दामोदरला चोप मार देतात तो बेशुध्द पडतो डोक्याला जबर मार लागतो...डोकेफुटुन रक्तबंबाळ होतो...रक्ताचा सडा पडावा तसा तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो...फक्त "मुठभर घास पायी तो आयुष्याला मुक्तो....मुठभर घास अन शेवटचा श्वास...अशी दामोदरची गत झाली....  


Rate this content
Log in

More marathi story from Kalidas Waghmare

Similar marathi story from Tragedy