SUNITA DAHIBHATE

Romance

2.6  

SUNITA DAHIBHATE

Romance

"मोग-याची दोन फुले"

"मोग-याची दोन फुले"

2 mins
373


तु आणलेल्या दोन मोगर-याच्या फुलांचा सुगंध अजुनही माझ्या मनात दरवळत आहे. किती अबोल होतास तु, मी खुप बोलकी असुनही तुझ्यासमोर अबोल व्हायचे.... खरंच, तो आपला काळ किती सुंदर होता.... अगदी फुलांप्रमाणे नातीहि नाजुक आणि सुगंधी होती....मी तुझ्या घरी उन्हाळ्याच्या सुट्टीत असल्यामुळे आले होते. तुमचं घर खुप मोठं आणि प्रशस्त होतं. तुमचं कुटुंब एकत्र असल्यामुळे घर नेहमीच माणसांनी भरलेँलं असायचं... तुमच्या घरातील सगळीच माणसं खुपच प्रेमळ होती. त्या काळात घरातील पुरूष मंडळी जेवल्यानंतरच घरातील बायका जेवायच्या. तु जेवणाचया वेळेतच घरी जास्त वेळ असायचास.....

आपण एका घरात राहत होतो तरीही आपण एकमेकांपासून खुप दूर होतो....तु काही कामानिमित्तचं घरात यायचास, माझं लक्ष असायचं तुझ्याकडे... कधीतरी आपली नजरानजरही व्हायची. पण इतकं वागायलाही खुप मोठं धाडस केल्यासारखं वाटायचं.....तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे हे विचारण्याची हिंमत माझी कधीच झाली नाही. फक्त मला मात्र तु आजुबाजुला असला की उगचंच वागताना अवघडल्यासारखं व्हायचं आणि आपोआप माझ्या वागण्यात कृत्रिमपणा यायचा...मी तुझ्या समोर लाजरी- बुजरी होऊन जायचे.... तुझ्या घरी राहिलेले ते दिवस कधी संपले कळलेच नाहीत आणि पुन्हा मला माझ्या घरी परत जाण्याचा दिवस उजाडला, मी ...ही तुमच्या घरात खुप लाडकी झाले होते. तुझ्या घरातलेही माझं खुप कौतुक करायचे, मी नुकतंच तारुण्यात पदार्पण करत असल्यामुळे मनात माझ्या मी स्वप्न रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती. माझी शाळेची सुट्टी संपल्यावर मला माझ्या घरी जावे लागणार होते, तुझ्यापासून दूर जाण्याची हुरहुर मनाला लागली होती.... तुझ्या घरापासून दूर जाणार त्याच दु:ख तर मला होतचं....परंतु जास्त दु:ख तुझ्यापासून दूर जाण्याचं होतं,...मी ज्यादिवशी जाणार होते त्याच दिवशी मला आपल्या घरात सहज दृष्टीस पडतील अशी दोन मोग-याची फुले ठेवलेली दिसली. त्या दोन फुलांना मी अलगद उचलले आणि कितीतरी वेळ मी त्या फुलांचा सुगंध मनात भरुन घेत होते. ज्याठिकाणी तु ती फुलं ठेवली होतीस... तिथे माझ्याशिवाय कुणी जाणार नाही, हे तुला चांगले ठाऊक होते. त्यामुळे तु...न बोलताही तुझ्या भावना मला पोहोचल्या होत्या..., परंतु मलाही तुझ्यासारखंच बोलण्याचं धाडस नव्हतं.  आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी शब्दांची गरजच पडली नाही.... न बोलताही ते मनात खोलवर रुजलं.... खरंच ! काही भावना शब्दात व्यक्त करता येतच नाहीत...फक्त ...त्या दोन मोग-याच्या फुलांचा सुगंध मात्र आयुष्यभर माझ्या मनात दरवळत राहिला......!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance