Prashant Tribhuwan

Tragedy

4.8  

Prashant Tribhuwan

Tragedy

मनातला पाऊस

मनातला पाऊस

3 mins
1.1K


  आज गावात पाऊस नव्हता पण आशाबाईच्या मनात मात्र धो धो कोसळत होता आणि तिच्या नयानातून त्याच्या नद्या वाहताना सारे गाव पाहत होते. तिच्यासमोर दुसरा पर्याय ही नव्हता रडणे सोडून कारण तिच्या पुढ्यात तिचा धनी झोपलेला होता कायमचा. आणि मांडीवर एका वर्षाची तिची लेक . तिला माहित नव्हते काय झाले ती भुकेने व्याकुळ होऊन आईकडे दूध मागत होती. आणि एवढ्याश्या जीवाला काय कळणार की तिचा बाप आता या जगात नाही राहिला, कारण जगाच्या या साऱ्या गोष्टी पासून अजून ती खूप लांब होती. आणि आशाबाई मात्र त्यात गुरफटून गेली होती . ती एकटीच नाही तर सारा गाव तिच्यासोबत रडत होते कारण तिचा धनी शांताराम होताच इतका प्रेमळ आणि मनमिळावू की जो त्याला भेटत असे तो त्याचाच होऊन जात असे.


     शांताराम एक माध्यम वर्गीय शेतकरी. आई वडील शाळेत असतानाच एका अपघातात गेले त्यामुळं शाळा सोडून हा शेती करू लागला. कारण आता दुसरा पर्याय नव्हता एक छोटी बहीण आणि तो दोघेच राहिले होते. तिच्यासाठी त्याने आपले सारे जीवन वाहून घ्यायचे ठरवले पण मोठा झाल्यावर गावच्या काही आप्त मंडळीनी त्याचा विवाह आशाबाईशी करून दिला आणि सुखाचा संसार थाटला. पण त्याच्या नशिबात सुख होतेच कुठे ? बहीण आता मोठी झाली होती तिचा शिक्षणाचा खर्च, घराचा खर्च आणि यासाऱ्यात पावसाने घेतलेली विश्रांती . तरीही तो हिम्मत हारला नाही ,नियतीशी लढत राहिला पण त्या नियतीशी सांगा कुणी जिंकले का? 

    

     बहीण बारावी परीक्षेत यशस्वी झाली चांगल्या गुणांनी आणि त्या दोघांचे स्वप्न पुर्ण करण्याचे दिवस आले . बहिणीला डॉक्टर करायचे स्वप्न कारण गावात डॉक्टर नसल्या कारणांनी त्याचे आईवडील गेले होते म्हणून दोघांनी ठरवले होते की डॉक्टर होऊन तिने गावाची सेवा करायची आणि त्यासाठी शहरात जाऊन शिकायचे पण कसे? कारण दोन वर्ष झाले पाऊस नाही, पीक नाही खाण्याला अन्न नाही शिकायचे कसे ? कारण तिला गुण असून, सरकारी पातळीवर नंबर लागून देखील पैसे मागत होते महाविद्यायात. पण काही झाले तरी हार मानायची नाही हे ठरलेले होते. त्याने सावकाराकडून कर्ज काढले. आशाबाईने आपले सर्व दागिने विकून पैसे गोळा केले आणि मनु ला शहरात पाठवले डॉक्टर होण्यासाठी. शांताराम ची एवढी एक चांगली गोष्ट होती की प्रत्येक वेळी पत्नीची साथ असे त्यामुळं तो आनंदी होता .


    एक दिवस त्या आनंदाला नियतीची नजर लागली, सावकार त्याच्याकडे आला आणि म्हणाला की तू घेतलेले पैसे दे नाहीतर तुझी जमीन मी घेऊन टाकेल, हे ऐकुन तो पूर्ण पणे कोसळला , इकडे पाऊस कोसळत नव्हता आणि एवढे पैसे कसे द्यायचे? या विचारत घरी येतच होता की त्याला पत्र मिळाले मनु चे त्यात तिने लिहिले होते की तिला पैश्यांची गरज आहे. नाहीतर तिला महाविद्यालयातून काढून टाकू असे सांगितले. आता काय करावे ? जगावे की मरावे या पेचात तो होता घरी उपाशी बायको मुलगी आणि वरून हा दुःखाचा डोंगर तो त्याखाली दबून गेला होता. पण तो हार मानणारा नव्हता त्याने मार्ग काढण्याचे ठरवले आणि त्याने काढला देखील.


     घरी आला आपल्या बायकोला आणि मुलीला भेटला आणि तसाच शेतात गेला . पण पुन्हा नाही आला धनी घरी का नाही आले अजून म्हणून आशाबाई शेतात गेली तर काय तिथे शांताराम कायमचा शांत झाला होता . त्याच्या जवळ एक कागद मिळाला त्यावर लिहिलेले होते की "मला माफ करा पण दुसरा पर्याय नव्हता मी नियतीशी हरलो म्हणून नाही जात ये तर जिंकून जातोय . शेतकऱ्याच्या आत्महत्येवर सरकार पैसे देते ते पैसे घेऊन सावकाराकडून माझी जमीन सोडवा , आणि मनुलाही काही पैसे पाठव ती डॉक्टर झाली पाहिजे , आणि माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्या , असे सांगून तो निघून गेला . गावात पाऊस तर आला नाही पण प्रत्येकाच्या मनात आज अश्रूंचा पाऊस वाहत होता. 


         असा हा पाऊस 

         कधीच न येवो

         वैऱ्यानिही असा

          दिवस न पाहो


      पण करणार काय आता सारे फक्त पाहत होते मनु ची वाट , ती शहरातून आली की तिचा दादा शांताराम शांत आराम करण्यासाठी जाणार होता. आज कळतं नव्हते शांताराम जिंकला की नियती? कोणीही जिंकू पण आता शांताराम नाही म्हणून सारे गाव मनात अश्रूंचा पाऊस ढाळत बसले होते.


प्रत्येक मनात देऊन अश्रूंचा पाऊस

तो अलगद शांतपणे निघून गेला

स्वतःचा तर जीव त्याने आज दिला 

आठवन बनून प्रत्येकाच्या मनात राहिला


Rate this content
Log in

More marathi story from Prashant Tribhuwan

Similar marathi story from Tragedy