माणुसकीच हरपली.....
माणुसकीच हरपली.....


रात्र खुप झाली होती..आकाशात टिमटिमणारया चांदण्या फारच छान दिसत होत्या.त्यांच्यामधे दडुन बसलेला पांढरा शुभ्र चंद्र सगळीकडे उजेडचा जणू वर्षावच करत होता. त्या रात्री जो प्रसंग घडला तो नक्की जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. रात्र ..बारा साडे बाराच्या सुमारास एका घरातून ओरडण्याचा जोरदार आवाज कानी पडला...तितक्यात उठून बघतो तर काय ! अचानक दिवे विझले...घरात दिवे लावण्यासाठी जाऊ लागलो....तोवर पुन्हा किंचाळण्याचा आवाज ऐकू आला...पण काय करणार....बाहेर खुप अंधार पडला होता....त्यामूळे जाता येतं नव्हतं....आवाज सारखाच येत राहिला...काय झाल काही कळत नव्हतं.... हा आवाज खालच्या गल्लीतून येत होता...थोड्या वेळाने खांबावरील दिवे लागले.तोवर आवाज थोडा कमी झाला होता.घराच दार लावत लावत केशव चे अर्धे लक्ष त्या आवाजाकडे होते..कारण तो आवाज इतका भयंकर होता की कोनालाही भिती वाटेल.
शेवटी दार लावले आणि तो खालच्या गल्लीच्या दिशेने जाऊ लागला...अर्ध्या वाटेत गेल्यावर त्याला पुन्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला...तो खुप घाबरला..तितक्यात आजुबाजुची लोकं त्या ठिकाणी धावत,पळत येऊ लागली. तोही त्यांच्या सोबत त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी गेल्यावर त्याला जो प्रसंग दिसला तो पाहिल्यावर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली....अंग थरथर कापत होते...अंगाला घाम फुटला...
कारण ते दृश्यच तसे होते...समोर एक माणुस जमिनिवर पडला होता...त्याची बायको आकांतान ओरडून मदतीची हाक मारत होती... त्यांना मदत करायला कोणीच जवळ येत नव्हतं..ती खुप रडत होती.
रडून रडून तिचा कंठ दाटून आला होता.तिला काय करावे काहिचं समजत नव्हतं. लोक दूरूनच तिला पाहत होते पण जवळ जायची कोणाची हिम्मत होत नव्हती...केशवचा जीव खाली वर होत होता..त्याला असे वाटत होते आपण काहितरी मदत करायला पाहिजे...पण करणार तरी कसे... त्याला शरीराने अपंगत्व होते..तो पाहू शकत होतो...मदत करायला त्याच्या हातात ताकद नव्हती...मग समजले की गावातील हे सर्वात गरीब कुटुंब आहे..थोडेच दिवसाआधी हे लोक बाहेरुन गावात रहायला आले होते म्हणून...काम करण्यासाठी .... त्याला एक लहानशी मुलगी सुद्धा होती..तिला काहीही समजत नव्हतं काय झाल आहे ते.....ती फक्त तिच्या आईकडे आकांतान पाहत होती....तिची आई रडत रडत आवाज देत होती.....अरे उठ ना रे सुदामा...काय झाल तुला...तिचा ओरडण्याचा आवाज वाढतच चालला होता..तरीही लोक काही मदतीला धावून आले नाही..ते फक्त बघतच उभे होते. बराच उशिर झाला होता तरिही सुदामा काहिचं बोलत नव्हता...थोड्या वेळाने त्याचा लहान भाऊ तिथे आला...ते चित्र पाहून तो मोठ मोठ्याने ओरडून त्याला आवाज देऊ लागला....अरे उठ ना रे दादा...उठ ना...काय झाल तुला ! सांग तरी मला...आणि तो रडत बसला....तितक्यात त्याची भाहुजयी त्याला शांत करत करत म्हणाली....अहो दामोदर...तुम्ही रडू नका असे....यांना पहिले उचला आणि एखाद्या दवाखान्यात घेऊन चला....दामोदरने त्याला कसाबसा उचलला आणि खंद्यावर घेऊन दवाखान्याकडे निघाला....त्याच्या पाठोपाठ त्याची भाऊजयी तिच्या मुलीला काखेत घेउन निघाली.....
लोक अजूनही त्यांच्याकडे नुसते उभे राहून पाहत होते......दामोदर गावच्या बाहेर येऊ लागला..सुदामा त्याच्या खांद्यावर होता. गावाबाहेरील रस्ता खुप खराब होता आणि खांबावरील दिवाबत्ती सुद्धा व्यवस्थीत लागत नव्हती.थोडं अंतरावर जाताच दामोदरचा पाय दगडाला लागून तो खाली कोसळला .सुदामा सुद्धा खाली पडला.त्याच्या पाठीमागुन लोक चालत चालत येत होते...तरी पण त्याला उचलायला कोणीच मदत केली नाही.हे दृश्य पाहुन केशवच्या डोळ्यातून पाणी आले.त्याच्या मनात सारखे विचार यायला लागले....तो स्व्तःला दोष देऊ लागला. तो मनातल्या मनात स्व्तःला प्रश्न विचारु लागला...का असा जन्म दिला मला ??? यापेक्षा लहानपणीच माझा जीव गेला असता तर बर झाल असतं ! आज हे चित्र पहायला नसतं मिळालं...थू...आहे अशा जिंदगीवर ....राग येत आहे माझा मला.....पण सांगाव तरी कुणाला....जे आपल्या सोबत आहेत....ते तर आपल्या पेक्षा वाईट जिवन जगत आहे....माणसं म्हणून जन्माला आले आहेत याची जाणीव करून दिली पाहिजे त्यांना एकदा...लाज वाटत आहे आज मला की माणुस म्हणून जन्माला आलो याची ! इतक्या दिवस टिव्ही वर बघत होतो की माणसातली माणुसकी हरपली आहे....पण आज डोळ्याने बघितली...खुप वाईट वाटले आहे आज....डोळ्यातील पाणी पुसत पुसत केशव समोर पाहू लागला...तितक्यात दामोदरने सुदामाला परत उचलून घेतले आणि तो दवाखान्याच्या दिशेने निघाला.दवाखाना थोडाच अंतरावर राहिला होता तितक्यात सुदामाच्या तोंडातून फेस येऊ लागला...ते पाहुन त्याची बायको अजून जोरात रडू लागली...तिला काय करावे काही सुचत नव्हतं...मुलीला काखेत घेउन ती कसीबसी दवाखान्यापर्यंत आली...तितक्यात आतून डॉक्टर पळत पळत सुदामाच्या जवळ आला आणि त्याचा हात पकडून त्याची नाडी तपासायला लागला......तेवढ्यात त्याची बायको आकांतान ओरडून विचारु लागली....काय झाल हो साहेब...माझ्या सुदामाला..तो काहिच कसा बोलत नाही..तिची लहानशी मुलगी सुद्धा जमिनीवर बसून तिला पाहुन रडत होती......तेवढ्यात डॉक्टर साहेब म्हणाले...खुप उशिर झाला आहे आता...तुम्ही याला घरी घेउन जा...हे ऐकताच दामोदरच्या पाया खालची जमीनच सरकली......तो जागीच हलला..त्याला काहिच सुचत नव्हतं...तो डोक्याला हात लावून रडत बसला होता....
गावातील मंडळी नुसता हा तमाशा पाहत होती ...
केशव तर फारच खचून गेला होता..तो शांत खाली बसला होता. शेवटी दवाखान्यातील गाडी आली आणि सुदामाला गाडीत टाकुन घेऊन जाऊ लागली....समोर जात असतांना गाडीतून दोन्ही हात जोडून दामोदर लोकांना मनातल्या मनात कळकळीचा नमस्कार करू लागला....आणि म्हणत होता धिक्कार आहे तुमच्या या माणसातल्या माणूसकीला......परत एकदा नमस्कार करतो....तेवढ्यात गाडी वेगाने पुढे निघुन गेली............