STORYMIRROR

Sapana Thombare

Tragedy

3  

Sapana Thombare

Tragedy

मागासलेले गाव अंधार

मागासलेले गाव अंधार

3 mins
195

एक खेडे गाव होते. त्या गावाचे नाव अंधार होते. अंधार गाव हे खूप छोटे जंगलात वसलेले होते. गावाच्या बाहेरून पूर्ण जंगलाचा घेराव होता. आणि अंधार गाव जंगलाच्या मधोमध होते. त्या गावात शंभर दोनशे लोक राहात होते. सगळ्यांकडे शेती होती. अंधार गावातल्या लोकांची स्वतःच्या हक्काचे घर होती. काही लोकांचे घर मातीचे बांधलेले होते. काही लोकांचे घर विटांचे बांधलेले होते आणि काही लोकांच्या झोपड्या होत्या. त्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. त्या अंधार गावातील काही लोक श्रीमंत होती काही गरीब होती. अंधार गावातील लोक हे खूप जुन्या विचारांचे होते जुन्या परंपरांना मानत होते. अंधार गावातील लोक नदीचे पाणी वापरायचे शेतीसाठी वापरायचे पिण्यासाठी तिथे विहिरी होत्या. त्या गावात लाईट नव्हती नळ नव्हते.

 त्या अंधार गावात चौथीपर्यंत शाळा होती. काही मुले तिथे शिकायला जात होती काही मुली शिकायचेच नाही. त्या गावाच्या लोकांची खूप जुने विचार असल्यामुळे मुला-मुलींनी गावात जेवढी शिक्षण आहे तेवढेच शिकायचे बाहेर गावी जाऊन शिक्षण घेणे त्यांना मुळीच आवडत नव्हते. मुलींच्या बद्दल तर त्या गावात खूप तडक शिस्त होती. मुलींनी फक्त घर सांभाळायचे आई-वडील आला का कामात मदत करू लागायची आणि मोठी झाली की लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी जायचे आणि सासरचे घर सांभाळायचे असे जुने विचार तिच्या अंधार गावाच्या लोकांची होते. त्या अंधार गावात स्त्रीला फारसे महत्त्व नव्हते. घरच्या स्त्रीने बाहेरच्या पुरुषांसोबत चेहऱ्यावर घुंगट घेऊन बोलावे पुरुषांशी एक दोन मोठ्या शब्दात विचारले तेवढे उत्तर द्यावे. घरचा पुरुष घरी असल्याशिवाय कुणालाही घरात परवानगी त्या अंधार गावात नव्हती. त्या गावातले सर्व पुरुष दिवस-रात्र शेतीचे काम करायची शेतीचे पिकत होतं त्या धान्यावर पोट भरत होती. बाजार वगैरे त्या गावात भरत नव्हती. आपल्या शेतीमध्ये भाजीपाला, कडधान्य यावर त्यांचा रोजचा आहार अवलंबून असे

 त्या अंधार गावातली लोक महिन्यातून एक वेळा शहरात जात होते काही कपडे,दागिने,चप्पल, आणि जीवनावश्यक वस्तू पण मुला-मुलींना घरच्या स्त्रीला ते सोबत घेऊन जात नव्हते. प्रत्येक घरातला एक मोठा पुरुषच शहरात जायचा घरच्यांना काय आवडते काय नाही घरीच विचारायची आणि तो शहरात जाऊन घेऊन येत होते. त्या गावात एकाच जातीचे लोक होती म्हणून त्या गावात जातिभेद नव्हता त्या अंधार गावातली लोक एकमेकांशी चांगली वागत असे एकमेकांना अडचणीला मदत करत असे एकमेकांमध्ये भेदभाव करत नसते गरीब-श्रीमंत सर्वांना समान समजत होती.


 शहरातून त्या अंधार गावात जाण्यासाठी चांगला डांबरी रोड नव्हता ते अंधार गाव जंगलात असल्यामुळे त्या गावात जाण्यासाठी जंगलातून छोटासा माती गोट्यांचा रस्ता होता. त्या गावात गाडी मोटार जात नसे पायदळ पायादळ चालत जावे लागे.

 त्या अंधार गावातल्या लोकांकडे बैलगाडी होती. काही लोकांकडे घोडे होते. काही लोक बैलगाडीने चेहरा कडे जात असे काही लोक घोड्यांनी जात असे

 ते अंधार गाव पूर्णपणे मागासलेल्या गाव होते. त्या गावात कोणत्याही प्रकारची सुख सुविधा नव्हती. त्या गावातल्या लोकांचे विचारही मागासलेले होते.


 त्या अंधार गावातली लोक मुला मुलींचे लग्न आपापसातल्या नात्यात करत होती. पण गावातच लग्न करत असे गावाच्या बाहेरच्या कोणत्याच लोकांना लग्नाच्या आमंत्रण देत नव्हते मुलींच्या मनाविरुद्ध जाऊन मुलींचे लग्न करून द्यायचे

 मुलींना मुलगा पसंत असो की नाही तरी ही आई-बाबाच्या मनानेच लग्न करावे लागत होते.

 त्या अंधार गावातल्या लोकांना कधीही असे वाटत नव्हती की आपल्या गावात दुसऱ्या गावाला सारख्या सुख-सुविधा असल्या पाहिजे गावांच्या लोकांजवळ जे आहे त्यात ती खूप समाधानी होती. त्यांना असे वाटत नव्हते की आपल्या गावात लाईट, नळ, हायस्कूल, कॉलेज, असायला पाहिजे ग्रामपंचायत असायला पाहिजे. त्या अंधार गावातला सर्वात श्रीमंत व्यक्ती जो असेल तो त्या गावातला सरपंच असत असे गावात काही भांडणे समस्या काही अडचण झाल्या तर त्या सरपंचाला सांगत असे. त्या गावाची परंपरा होती की, गावातल्या सर्वात श्रीमंत माणसाने कोणत्याही समस्यांचे समस्यांचे निवारण करायला पाहिजे असे त्या गावातल्या लोकांची मत होते.


 एकदा मी त्या त्या अंधार गावात पाहणी करायला गेलो होतो तेव्हा तिच्या लोकांचे विचार परंपरा त्या गावातला मागासलेपणा मागासलेली विचार अशिक्षितपणा बघितला आणि काही दिवस त्या गावात राहून त्या लोकांचा अभ्यास पूर्णपणे केला.

 एवढे मागासलेले गाव एवढ्या जुन्या विचारांचे लोक ज्यांना चांगले-वाईट या दोघांमधला फरक सुद्धा काहीच माहित नाही माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिले होते. मी एक सरकारी नोकरीवर होतो. माझ्याकडे गावागावांत जाऊन गावांची पाहणी करणे ठीक काम सोपवलेले होते. ते काम करता करता त्या अंधार गावात हा सर्वात मोठा घेतलेला अनुभव आहे इतक्या गावांची मी पाहणी सर्वे केले पण या अंधार गावातल्या सारखी गाव माझ्या आयुष्यात मी बघितलेच नव्हते. माझ्या आयुष्यातले पहिले व शेवटचे गाव म्हणजे अंधार


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy