कविता "साथ"
कविता "साथ"
तुला आठवून खूष होतो
तू दिलेल्या जखमेला साक्षीस ठेवतो
माझी सल तुला कळणार नाही
तुझ्यात मी हे तुला उमगणारही नाही
तू हो सुखी जीवन आनंद घेत
तुझ्यातील दुःख झेलून मी राहतो सोसत
नको घाबरू, मी साथी आहे
करतो सोबत तुझी अदृश्य छाया आहे
श्वासात तुझ्या मी श्वास आहे
जेव्हा तुला सोडेल तो तव मी संपणार आहे