Ushatai Rahangdale

Tragedy

4.5  

Ushatai Rahangdale

Tragedy

कर्माची वाट

कर्माची वाट

1 min
256


माझं म्हणून मिरवलास

रमलास मौज मस्तीत |

भुललास कर्माची वाट

चंदेरी दुनियेच्या धुंदीत ||१||

 

जगमगणाऱ्या या दुनियेत

विसरून अपुला बालपण |

मायेचे ते  सोनेरी दिवस

कशी तुला नसावी आठवण ||२||


ज्या हातांनी घडविले तुला

बनले तुझे  सदैव रक्षक |

अपयशाच्या  मार्गावरही

तुला बनू न दिले भक्षक ||३||


वेळ आता तुझ्या कर्तव्याची

पाठ फिरवून सोडतो हात |

टाकतो अधांतरीत मायबापाला,

वृद्धाश्रमाच्या दुःखी जीवनात ||४|


होतासं तू मायबापाची आशा

पण शेवटी तुझा सुटला तोल |

मायबापाविना जगात अशा

मनुष्याची किंमत मातीमोल ||५||


Rate this content
Log in

More marathi story from Ushatai Rahangdale

Similar marathi story from Tragedy