कोवळ्या मनावरील आघात......
कोवळ्या मनावरील आघात......


कोवळ्या वयात मनावर हळूच प्रेमाने फुंकर घालायचे काम आई करते. खास करुन मुलींना.....
पण अशी पण मुले असतात त्यांना अशा वयात जे त्यांना कळू नये किंवा बघू नये अशा घटना घडतात.
आता तुम्ही म्हणाल की हे अस फक्त सिनेमात होते पण अस नाही.
एक मानसी नावाची मुलगी होती, तिच्या ऐन कोवळ्या वयात तिच्या आयुष्यात एक विचित्र प्रसंग घडला.
तो प्रसंग खूप वाईट होता, कारण तो तिच्या आईच्या बाबतीत होता.
मानसी वयात यायच्या आधी तिला काही कळत नव्हते पण नंतर ती वयात आली तेव्हा मात्र तिच्या समोर जे येत होत ते म्हणजे तिच्या आईचे पर पुरूषांबरोबर अनैतिक संबंध होते.
आणि ती मानसी आणि तिच्या बाबा ना फसवून बाहेर जायची. आणि.........
पण मानसी च्या आईला हे कळतच नव्हते की आपली मुलगी आता वयात आली आहे.
त्यात कहर म्हणजे तिची आई बाबा ना संशय येईल म्हणून चक्क मानसी ला बाहेर घेऊन जाउ लागली. मग तर काय मानसी ला सगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला.
ती बिचारी खूपच गोंधळात पडलेली होती. की हे विचारायचे तरी कोणाला ?.....
नंतर तिच्या आईने जरा जास्तच केलं घरी हे सगळं चालू केलं. ती तेव्हा रविवारी मानसी ला आणि तिच्या बाबा ना बाहेर पाठवायची आणि मग......
मानसीला खूप राग यायचा पण नाही म्हणून सांगायचं तर तिची आई धमकी द्यायची की मी निघून जाईन.....तिला एक प्रश्न नेहमी पडायचा की आपल्या बाबा ना या गोष्टींचा राग कसा येत नाही. मग तिने तिच्या बाबा ना हिंमत करून विचारले......
तर ते पण तेच म्हणाले की तुझी आई मला पण धमकी देते. पण मला तुझी काळजी वाटते बाळा ती गेली तर तुला मी आईची माया कशी देउ. मला पण खूप त्रास होतो पण फक्त तुझ्या साठी मी गप्प आहे.
त्या नंतर असचं खूप दिवस गेले........
मानसी ला मात्र हे सगळं खूप त्रास देत होते तिला ही गोष्ट पचत नव्हती. की तिच्या बाबांशिवाय तिच्या घरात हा बाहेरचा माणूस कसा काय आपल्या घरात हक्क दाखवू शकतो.
मग मानसी ने आईला या सगळ्याचा जाब विचारायचे ठरवले. एक दिवस मानसी खूप रागाने आईला खूप बोलली.
अगदी मानसी किंवा तो व्यक्ती अशी निवड करावी असे पण बोलली.
पण तिच्या आईकडून एकच उत्तर आले की मी त्याच्या शिवाय जगू शकत नाही. तूम्हाला नसेल पटत तर मी जाते त्याच्या बरोबर. मग मात्र मानसीला रडू कोसळले.
रडता रडता ती म्हणाली की तुला आम्ही नको आहे का तर आई म्हणाली की मला तो हवाय.
त्या नंतर त्यांच्या मधील संवाद संपला.
मानसी आतून पूर्णपने तुटली होती. तिला हे सगळं कोणाला तरी सांगून मन मोकळे करायचे होते, पण ही गोष्ट अशी होती की कोणालाही सांगता येत नव्हती.
ती खूप रडली. नंतर बाबांजवळ पण रडली.असं होउन पण तिच्या आईचं हे सगळं थांबत नव्हते मग मानसीने एक निर्णय घेतला की आपल्या आईला तो व्यक्ती पाहिजे आणि आपल्याला आई तर आपण हे सगळं मान्य करु.
मानसीने अगदी मोठ्या माणसांप्रमाणे आईला सांगितले की आम्ही त्या व्यक्तीला स्विकारले. तू घरी बोलव.आम्हाला भेटायला.
मानसी आणि तिच्या बाबांनी खूप मोठ्या मनाने हे मान्य करून पुढे गेले.
आता या सगळ्याला खूप काळ झाला तो व्यक्ती आता मानसीच्या घरात राहतो.
पण मानसी ते सगळं विसरलेली नाही. पण त्या घटनेमुळे मानसी खूप समजुतदार झाली.
असं हे कोणत्याही मुलांना सहन करायला लागू नये...........