कोरोनाशी लढाई
कोरोनाशी लढाई
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार एक मध्यमवर्गीय छोटसं चौकोनी सुखवस्तू कुटुंब.. आई बाबा आणि खूप हुशार सुंदर, सालस, लाघवी दोन मुली.. आईचा छोटेखानी व्यवसाय.. बाबांची कंपनीत नोकरी आणि मोठी मुलगी इंजिनीरिंग होऊन UPSC ची तयारी सुरू तर धाकटी MBBS फर्स्ट इयरला.
आई जरा धाडसी बिनधास्त.. आई बाबांचा लग्नाचा 25 सा वा वाढदिवस खूप थाटात मुलींनी साजरा केला.. भविष्याचे स्वप्न बघत दिवस आनंदात जात होते.. मग आला कोरोना.. सर्वांचीच बसलेली घडी विस्कटीत झाली.. प्रश्न जीवन मरणाचा होता.. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू झाली.. खबरदारी म्हणून सरकारने लॉकडाऊन लावलं.. कामकाज ठप्प म्हणून सगळेच घरी.. मध्यमवर्गीय सर्वसाधारण घरांमध्ये लॉकडाऊन आनंदाने स्वीकारलं गेलं..
आई बाबा मुली सगळेच एकत्र घरी...वेळ नसल्याचा सबबीवर टाळत आलेल्या सर्व गोष्टी करायला भरपूर वेळ मिळाला.. मुलींनी पण छान छान पदार्थ करून आईबाबांना खावू घातले.. हे ही दिवस छानच चालले होते सोबत कोरोना पासून बचाव म्हणून गरम पाणी.. वाफ.. काढे वगैरे बनवून पिणे.. स्वच्छता सॅनिटायझरने हात धुणे.. पाहिजे ती काळजी घेवून सगळं सुरळीत सुरू होतं..
आईचा कॅटरिंग चा.. बाहेर हॉटेल्स बंद म्हणून नेहमीचे कस्टमर आग्रह करू लागलेत जमेल तेवढं ती काम करतं होती.. त्यासाठी आईला बाहेर जावे लागायचे.. घरातील गरजेच्या वस्तू आणायला आई किंवा मुलगीच बाहेर जायच्यातं... बाबांना डायबेटिज म्हणून त्यांची खूप काळजी.. त्यांना बाहेरचे काम नाही करू द्यायचे... सगळी खबरदारी घेवून लॉकडाऊन पार पडलं तीन महिने अगदी सुरळीत गेले...
पण नंतर सरकारच ही आर्थिक गणित विस्कटलं आणि माणसाचं ही.. मग सरकारने लॉकडाऊन टप्प्या टप्प्या ने संपवलं... लोकांना स्वताची काळजी घेत कामे करायला मोकळीक मिळाली... बाबांची कंपनी सुरू झाली.. आईचेही काम सुरू झाले.. तिच्या ही व्यवसायामुळे चार पाच घरातील संसाराला हातभार लागतं होता..योग्य ती खबरदारी घेत कामे सुरू झाली... जुलै महिना उजाडला बऱ्यापैकी लोकं सरावली.. कोरोनाची जरा भीती कमी झाली लोकांच्या मनात...
एक दिवस आईला अचानक थंडी वाजून ताप आला... पण घाबरली नाही.. आपण एवढी काळजी घेतो आपल्याला कोरोना नसणारच असा ठाम विश्वास होता.. आणि खरंच एका दिवसाच्या औषधाने आई बरी झाली.. कामालाही लागली.. त्यानंतर आठ दहा दिवसांनी बाबांना लूज मोशन सुरू झालेत.. फॅमिली डॉक्टर कडून औषधं घेतली आराम पडला... दुसऱ्या दिवशी बाबांना खोकला सुरू झाला... तिसऱ्या दिवशी बाबांना ताप आला पण तरीही औषध घेवून ठीक होतील कोरोना वगैरे नसणारच.. ठाम विश्वास... पण बाबांचा ताप वाढला.. डायबिटीज असल्यामुळे कोरोना टेस्ट करावीच हा निर्णय झाला.. बाबांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला.... बाबांचा रिपोट कोरोना पॉसिटीव्ह आला.... सगळे सुन्न... आई हादरलीच.. तिची मानसिक तयारीच होतं नव्हती.. हे स्वीकारणं तिला खूप जड जात होतं.... पण सत्य स्वीकारावं च लागतं... तिनी स्वतःला सावरलं बाबांच्या ट्रीटमेंट साठी तयारी सुरू झाली... बाबांना ICU बेड ची गरज होती... प्रयत्न सुरू झाले ओळखीतल्या लोकांनी मदत केली ICU बेड मिळाला...बाबांचा त्रास वाढतंच चाललेला..
शुगर पण वाढलं थोडं क्रिटिकल झालं...बाबांवर योग्य ते उपचार सुरू झालेत...
इकडे घरी दुसऱ्या दिवशी मुलींना खूप ताप आणि खोकला.. आईला ही बरं नाही... सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आलेत.. आता मात्र आई पार कोलमडून गेली... काय करावे तिला कळेना... एवढी सगळी काळजी घेवून असं झालंच कसं.. सैरावैरा झाली तिची मनःस्थिती.. स्वीकारणं पचवणं अवघड झालं तिला... मित्रमंडळी नातेवाईक सर्वांनां कळवलं...प्रेमानी जोडलेली माणसं मदतीला आणि.. फोनवरून धीराचे दोन शब्द ऐकून आई पण आता ही लढाई लढायला सज्ज झाली.. मुलींची ट्रीटमेंट घरीच सुरू झाली. जेव्हा तुमच्या रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह येतो तेव्हापासून तुम्ही एकटे असता.. तुमच्या साठी फक्त दोन व्यक्ती असतात एक स्वतः तुम्ही आणि PPE किट घातलेले डॉक्टर.. तुम्ही स्वतः म्हणजे तुमचा विल पावर आत्मविश्वास तोच तुम्हांला सर्वात जास्त मदत करतो... किती जवळचे हक्काची माणसं असली तरी ती तुम्हांला लांबूनच मदत करणार.. पैश्याची मदत मिळणार.. जेवणाचे डबे मिळणार.. फोनवर धीराचे आपुलकीचे चार शब्द ऐकायला मिळणार पण पाठीवर प्रेमाचा हात नाही मिळणार... ही लढाई स्वताची स्वतःलाच लढावी लागले..
दवाखान्यात बाबांची तब्येत क्रिटिकलच... शुगर वर खाली.. श्वास घ्यायला त्रास... मुलींचा ताप पण कमी होतं नव्हता.. त्यावेळची आईच्या मनाची अवस्था मी शब्दात मांडू शकतं नाही... घालमेल.. हतबलता.. निरव शांतता 😔 पाच सहा दिवसांनी आई आणि मुलींच्या तब्येतीतं खूप सुधारणा झाल्यात... बऱ्या झाल्यात... पण इकडे बाबा ICU मधेच.. तब्येत खालावली त्यांना इंजेकशन ची गरज होती पण ते इंजेकशन खूप इझिली मिळतं नव्हतं.. मित्रमंडळी नी मदत केली... 5,400 चे इंजेकशन कधी दहा हजार तर कधी वीस हजार अशी किंमत देवून ब्लॅक मधे विकत घ्यावे लागले कारण जीव वाचवायचा होता... या इंजेकशन बद्दल कळलं की त्याची किंमत तं ही काळाबाजार करणारे तुमची आर्थिक परिथिती पाहून ठरवतात.. 25..40 हजार सुद्धा घेतात तुमची वेळ बघून... हे काळ सत्य आहे..
या कोरोना काळात कोणाच्याच जीवाची शाश्वती नाही... तरी ही माणसाची नीच प्रवृत्ती बदलत नाहीये.. जर हे इंजेक्शन एवढंच गरजेचं आहे आजारी माणसासाठी तर त्याचा मुबलक साठा हवा आणि इंजेकशन चा काळाबाजार बंद व्हायला पाहिजे पण या साठी राजकीय इच्छाशक्ती हवी..की आपले राजकारणी आणि समाजकारणी लोकं कमी पडत आहेत... आई मुली पूर्णपणे बऱ्या झाल्यात... बाबा एकवीस दिवस ICU मधे राहून बरे होऊन घरी आलेत... सर्वांनां खूप आनंद झाला... बाबांचं घरी आल्यावर पुष्यवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं गेलं...
आता सगळे आई बाबा मुली एकत्र घरी आहेत... आपापल्या रूम मधे रेस्ट घेत कारण विकनेस लवकर जात नाही... या कोरोनाच्या काळात मानसिक खच्चीकरण होतं मोठ्या प्रमाणात सगळंच पूर्वीसारखं रुळावर यायला जरा वेळ लागेल... पण जिवलग लोकांच्या प्रेमळ सहवासाने यातून बाहेर निघायला मदत सुरू आहे...लवकरच सगळं सुरळीत होईल... कोरोनाशी लढाई जिंकून आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ही गोष्ट...
कोरोनानी माणसाच्या नैसर्गिक भावनांना लगामच लावला आहे..
दुःख झालं तरी जवळच्या व्यक्तीच्या कुशीत शिरून रडताही येतं नाही...
आणि आनंद झाला तरीही आनंदाने मिठी ही मारता येतं नाही...
कोरोना तू खूप वाईट आहेस रे
कोरोना जा रे तू..
जगाला खूप मोठी शिक्षा
दिली आहेस...
अनेक संसाराची राख केली
आहेस.. थांब आता
तुझ्या निमित्ताने झालेल्या
सवयी.. नियम.. अटी
पाळतच आम्ही जगू पण
गो कोरोना गो
bhawana fulzele
