Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Kunda Zope

Tragedy

4  

Kunda Zope

Tragedy

कोणी आयुष्यात डोकावते तेव्हा

कोणी आयुष्यात डोकावते तेव्हा

7 mins
2.0K


उल्हा आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणच तसे आहे, शाळेसाठी तब्बल ८० लाख रूपये खर्च करून सर्व सोयीसुविंधासह एक एकर क्षेत्रात शाळेची ईमारत दिमाखात ऊभी आहे ,व आज शाळासुद्धा सर्वासोबत त्या व्यक्तीची वाट बघत आहे.जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे. सकाळी ठिक १० वाजता ठरलेल्या वेळेवर अतिशय साध्या वेशात व पायी चालत ते महान व्यक्तीमत्व शाळेजवळ आले.सर्व उपस्थित मान्यवरांसह शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना मान देत शाळेचे उदघाटन केले,.आणि आकाशाला भिडेल, अशा आवाजात टाळ्यांचा कडकडाट झाला, सारा आसमंत दुमदुमला. *आनंदाचे डोही आनंद तरंग* असा भाव सर्वाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आजच्या दिवसासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा गावकऱ्यांनी केले होते. प्रमुख पाहुणे यांनी शाळेत प्रवेश केला. फुलांनी त्यांचे स्वागत होऊ लागले .ढोलताशे लेझीम एका गजरात वाजू लागले, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटप्रमुख, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक, कितीतरी नामवंत हस्ती कार्यक्रमास हजर होत्या. तसेच आजुबाजुच्या गावातील लोक यांनी दिवस सोनीयाचा केला होता. शाळा जणू विठूरायाची पंढरीच भासत होती. प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून स्वागतगीत, ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. उपस्थित असलेल्या मान्यवर हस्तीचे स्वागत विद्यार्थांनी बनविलेल्या भेटवस्तू देऊन करण्यात आले.गाणी पोवाडे नृत्य वेशभूषा यांनी कार्यक्रम बहारदार होत होता.

कार्यक्रमामधेमधे ऊपस्थित व्यक्तीची भाषण कार्यक्रमास चार चांद लावत होते.सुत्रसंचालन करणारे श्री. विवेक सिताराम महाजन सर, यांनी जेव्हा प्रमुख पाहुणे यांना विनंती केली आपण आपले विचार मांडावेत तेव्हा त्यांनी माईक हातात घेताच सर्वत्र शांतता पसरली.सर्वासमोर ते आपली शिदोरी उघडणार होते ,ती शिदोरी गिळंकृत करण्यासाठी सर्व आतुर होते.कारण आतापर्यत या दिलदार माणसाने त्याच्या नावाचा उल्लेख कुठेच करू दिला नव्हता. सर्व श्रेय त्यांचे असुनसुद्धा त्यांनी शिक्षकांना दिले होते.सर्वप्रथम शाळेला नमस्कार करून शिक्षक मुख्याध्यापकांना नमस्कार करून *मान्यवर मोत्याचे बोल बोलू लागले.शाळा डोलू लागली, लोकांच्या माना हलू लागल्या ,पक्षी ऊडायचे थांबले ,सुर्यही तेथे थबकला, दिवसाढवळ्या आकाशी चंन्द्र आला, मंजुळ आवाज आसमंतात घुमू लागला ,गायीढोरे स्तभ झाली ,वेली झाडे आपल्या पानंवर एक एक शब्द लिहू लागली, रस्तेही याच वाटेवरती येऊन थांबले,निर्जीव वस्तूही सजीव झाली* प्रमुख पाहुण्यांच्या.मुखात सुमनपुष्पे सांडु लागली, ईमारत ऊभारली जरी मी तरी श्रेय माझ्या शिक्षकांना जाते, जिने माझ्यासारख्या दगडाला आज देवपण दिले आहे. आणि एक योगायोग म्हणजे शाळेचा वर्धापन दिवस ,व माझ्या शिक्षिकेचा जन्मदिवस एकच आहे. असे सोनेरी व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या बाई सौ.रागिणी गौतम लोखंडे.

त्या शाळेत बदली होऊन आल्या आणि जणू काही परमेश्वरच आला.त्या येताच शाळेत येताच शाळेच रूपच पालटल आणि माझ्या आयुष्याला नवी कलांटणीच मिळाली .मी ५ वर्षाचा असताना आई वडिल वारले.आजी आजोबांनी मला व बहिणीला सांभाळल .म्हातारे असले तरी आता आमच्यासाठी तरूण होत होते,रात्रंदिवस काम करत होते, पण जड काम म्हातारपण दाखवत होते. त्यामुळे कधीकधी ऊपासमार व्हायची.बहिण मोठी असली तरी तीला कामाला नाही पाठवायच,अस मी चौथीत असतानाच ठरवल.अन कुणी सांगेल ते काम करु लागला.वाऱ्यासारखा बेभान धावायचो, एका क्षणात ईथून तिथे असायचो, मला सर्व वादळ,तूफान म्हणूनच ओळखायचे.शाळेत वेळेवर जायचो पण शिक्षकांची नजर चुकवून मध्येच पळायचो व नंतर शाळेत हजर व्हायच , शिक्षकसुद्धा मला कंटाळले होते,समजावयचे पण मी ऐकायचो नाही. मग अतिच झाले तर कधीकधी बेदम मारायचे.पण ऐकतो आहे तो मी कुठला.शिक्षा म्हणून माझ्याकडुन शिक्षकसुद्धा काम करून घ्यायचे ,मी तर ते काम चुटकीसरशी करून टाकायचो. त्यामुळे कधीकधी त्यांना डोक्याला हात लावायची वेळ यायची.आजी आजोबांना शाळेत घेऊन ये अस बजावून सांगायचे.त्यांना आणायला सांगितले की, मी शाळेत नाही जायचो, मग शिक्षकच घरी यायचे, आजीआजोबांकडे बघुन माझी तक्रार न करताच निघून जायचे .कुणीही काहीही काम सांगत होते व मी करत होता ,अशातच मला गुटखा बिडी ओढणे ही व व्यसनसुदधा लागली. अन शिक्षकांच्या डोक्याला मी तापच झालो.मला ते दाखला घेऊन जा, अशी धमकी सुद्धा दयायचे मात्र दयायचे नाही ,अशातच शिक्षकांची बदली झाली .अन मला रान मोकळ झाल .वाईट कामांचे पैसेसुद्धा चांगले, अन ही माणस तर आमच्यासारख्या पोरांच्या शोधातच चांगले फावते यांना,.पकडलो तर आम्ही पकडलो जाणार ,त्यांच नाव थोडच खराब होणार .पण नावच माझ तुफान मी कसला जातोय पकडला.आता मला माझ्या नावाचाही विसर पडला होता. शाळेच्या हजेरीवर अन माझे आजी आजोबा प्रेमान हाक मारायचे तेवढच .

शाळेत दप्तर ठेवायच अन पळ काढायचा हा माझा क्रम.आता शाळेत नवीन बाई आल्या होत्या ,फार शिस्तप्रिय दिसायलाच लय खडुस दिसायच्या .सर्वाची माहिती त्यांनी आल्याआल्याच काढली व घरी कोणी रहायच नाही अस कान धरून बजावल सुद्धा सगळ्या पोरांना त्यात मी ही होतो.सगळे बाईंना सांगायचे बाई सिद्धीपासुन साभाळून बर का, लय वात्रट पोरगा आहे वंगाळ आहे नुसता. अन बाईला वर्गाची व माझी हळूहळू ओळख झाली.बाईफार कडक त्यांची नजर चुकवण म्हणजे तारेवरची कसरत. आता माझी पंचाईत होऊ लागली ,मग मी ठरवल शाळा सोडायची पण त्यांची नजर माझा शोध घेऊ लागली.बाई डायरेक घरापर्यत आल्या.मी जेवायला बसलेलो होतो.कसा ऊठुन पळणार.आजीला त्यांनी ओळख करून दिली व मी शाळेत येत नाही सांगितले आजी आजोबांच्या डोळ्यातुन टचाटचा पाणी टपकल म्हणाले बाई याच्या मायबापाच स्वप्न होत यान अधिकारी बनाव .पण देवान नेल बोलावून.अन हा बघा कसा पांग फेडतोया शिकायच सोडुन ईकड तिकड मरतोया. बाई मला तशाच अवतारात शाळेत घेऊन आल्या .परिक्षा सुरू होती बाईंनी पेपर दिला सर्व पेपरला हजर राहण्यास सांगितले .मी पेपर जे शिकलो होतो ते सगळ लिहल जे आल नाही ते नाही लिहल .मी नापास झालो .बाई मला काहीच बोलत नव्हत्या.पोर बाईंना सांगण होती बाई हा कायबी काम करतो कायबी गलतसलत खातो .लय वंगाळवंगाळ पोरांसोबत राहतो अन पत्ते बी खेळतो.आता म्हणल बाई लय बदडवणार पण त्या फक्त हू हू करत होत्या. एकदिवस मुख्याध्यापक वर्गात आले नापास झालेल्या मुलांची यादी मागवली .आता म्हटल हा आता शाळेतुनच हाकलेल ,पण बाई म्हणाल्या माझ्या वर्गात कोणीच नापास नाही.तेव्हा सगळे माझ्याकडे बघू लागले,बाई फक्त हसल्या.

शाळा सुटताना,बाई म्हणाल्या सिदधी शाळेतील मागची खोली आहे आहे, ती आपण साफ करूया तू उद्या ये.मी म्हटल शिक्षा असेल. मी दुसऱ्यादिवशी १० वाजता शाळेत गेलो.बाईंनी खोली साफ केलेली होती.मी म्हटले मग मला कशाला बोलावल.बाई डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हे बघ सिद्धी ,अन आज मला माझे नाव ऐकतच रहावयस वाटल .त्यांच्या डोक्यावरील ठेवलेल्या हातान माझ्या डोळ्यातुन गंगा जमुना वाहू लागल्या. त्यांनी माझे डोळे पुसले अन म्हणाल्या *आपल्यापासून जर देवाने आपले आईवडिल हिसकावून घेतले तर आपण त्यांना परत आणू शकत नाही पण त्यांचे आशिर्वाद देव नक्किच आपल्यापर्यत पोहचवू शकतो तू जर तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण केलेस तर त्यांचे आशिर्वाद तुला कोणत्याही रूपात मिळत राहतील* आता मात्र माझा चेहरा फुलला खर सांगताय बाई .पण माझ्याकडे पैसा नाही मी कसा अधिकारी होणार. बाई बोलल्या तुझ्या आईवडिलांचा आशिर्वाद तुला मदत करेल ,पण सोबत तुला खुप अभ्यास करावा लागला मेहनत घ्यावी लागेल वाईट सवयी सोडाव्या लागतील .मी लगेच हो म्हणालो, आता मी दररोज शाळेत येणार.माझ्या आईबाबांसाठी काहीही करणार. बाई आता माझ्यासाठी व शाळेतील सर्व गरिब मुलांसाठी मोठमोठ्या संस्थांची एन जी ओ ची मदत घेऊ लागल्या. जिथून मदत मिळेल तिथे जाऊ लागल्या. शाळेसाठी मुलांसाठी मदत मागू लागल्या.आजी आजोबांना सुदधा निराधार भत्ता मिळवून दिला.ताईला मुलींच्या सुविधा ऊपलब्ध करून दिल्या. बाई रात्रंदिवस कष्ट करत होत्या मला दिसत होते .खरच देवाच आशिर्वादच होत्या बाई.८वी च्या वर्गात मला शिष्यवृत्ती मिळाली.व माझा अभ्यासातील प्रगतीचा डोंगर वाढू लागला.गावासाठी सुदधा बाईंनी खुप काही योजना आणल्या, बाई आता सर्वाच्या गळ्यातील ताईत झाल्या होत्या.पण म्हणतात ना *दैव देते अन कर्म नेते* अस काहीसे झाले .आणि कालपर्यत एकही दिवस सुट्टी न घेतलेल्या बाई आज अचानक शाळेत आल्या नाही.सर्वाच्या नजरा बाईंना शोधू लागल्या.

मुख्याध्यापकांना विचारणा केली असता मुख्याध्यापक म्हणाले बाईंची बदली झाली असे सांगितले. अभ्यासात दंग झालेला मी बाईंची चौकशी करू लागलो.मला एकटे एकटे वाटू लागले.एक दिवस शाळेत माझ्या नावाची चिठ्ठि आली.चिठ्ठी बाईंची होती ,मला खुप खुप आनंद झाला.चिठ्ठीत लिहलेले होते. *सिद्धी कसा आहेस बाळ स्वःताची व आजीआजोबा बहिणीची काळजी घे आणि आज मला एक वचन दे, तू तुझ्या आईवडिलांचे स्वप्न करशील आणि जर तु मला वचन देत असशील तर चिठ्ठीत हो असे लिही* आता माझ्या मनात अनेक विचार आले.बाईंनी चिठ्ठी का पाठवली त्या स्वतः का आल्या नाही अशातच फोनची बेल वाजली, व मुख्याध्यापकांनी शाळेला सुट्टी जाहिर केली. सर्व शिक्षक विद्यार्थी परिपाठाच्या ठीकाणी बोलावले, व सांगितले आपल्या शाळेतील शिक्षिका सौ.रागिणी गौतम लोखंडे मँडम यांना दोन महिन्यापुर्वीच निदान झालेल्या कर्करोगाने त्याच्या शरीरावर ताबा घेतला ,व त्यांना आपल्या पासुन दुर घेऊन गेला .बाईंना ठिक १ वाजता देवाज्ञा झाली.त्या पाच दिवसापासून दवाखान्यात अँडमिट होत्या. त्यांची अशी ईच्छा होती की मुलांपासून ही गोष्ट लपवावी,परिक्षेचे दिवस आहेत, त्यांना समजले तर ते माझ्या साठी परिक्षाही देणार नाहीत त्यांना सांगा माझी बदली झाली. बरी झाली तर येईलच.पण काळाने खरोखर कधीही परत येता येणार नाही अशा ठिकाणी बाईंची बदली केली. संपुर्ण शाळा रडू लागली .आणि मी तर बेभाध होऊन रडू लागलो व भानावर येत मोठ्याअक्षरात चिठ्ठिवर *हो* असे लिहले. आज तीच चिठ्ठी साहेबांनी सोन्याच्या फ्रेममध्ये तयार करून आणली होती.त्यांच्या डोळयातुन अश्रूंच्या धारा वाहत होत्या.कारण प्रमुख पाहुणे होते *त्याच शाळेतील विद्यार्थी श्री. सिद्धी सोमनाथ इंगळे* आणि शाळेतील प्राथमिक विदयालयाला नाव दिले *सौ.रागिणी गौतम लोखंडे* प्रमुख पाहुणे बोलता बोलता तेथील मुख्याध्यापकांच्या पायावर नतमस्तक झाले. व चिमुरड्यांसोबत पुन्हा कार्यक्रमात रमले.


Rate this content
Log in

More marathi story from Kunda Zope

Similar marathi story from Tragedy