किती सहज हात सुटले .
किती सहज हात सुटले .


किती सहज हात सुटले ,झोप तर लागत नाही उगीच डोळे मिटले . तिला कविता आवळ्याच्या आणि मला कविता लिहायला .मैत्री झाली ,प्रेम सुद्धा झालं तिच्यावर ,मात्र देव आनंदी नव्हता गड्या माझ्या सुखावर , कारण कि तिला मात्र माझ्यावर प्रेम झालं नव्हतं .तिला मी नाही तर माझी मैत्री हवी होती .मी पण म्हंटले आता हे नाते आपण इथेच संपवू ..imo वरती मला ब्लॉक करून टाक .. माझ्या आठवणींना तुझ्या हृदयात लॉक करून टाक .ती हुंदके भरून त्या दिवशी हृदयातल्या हृदयात रडली ,माझा सुद्धा तिचा शेवटचा निरोप घेता घेता दुःखाचा हंबरडा फुटला . ती दुसऱ्या कुना वरती प्रेम करते म्हणून ,मी तिचा हाथ नाही सोडला . आठवण आहे मला माझं प्रत्येक शब्द न शब्द अन वचन .केलं होत मी तिला प्रॉमिस .
जरी तुझ्या जवळ मी नसलो तरी , तुझ्या पासून हजारो किलोमीटर दूर असलो तरी , तुझा वाढदिवस साजरा करू आपण , मी केक आणेल आणि वीडियो calling करून मी online केक कापणं . ती खूप खुश होती ऐकून माझे शब्द ,ती म्हणाली खरच तुला वाढदिवस माझे आठवण होते ,,,खरच तू माझी किती काळजी घेते .. मात्र नशिबात तिचे साथ वाढदिवसा आधीच सुटले ..उरले सुरले स्वप्न सारे तुटले ,नाती संपली होती , बोलणे संपले होते एकमेकांना ब्लॉक केले होते .तरी मात्र मी तिला केलेले प्रॉमिस मला आठवण होते .. !!! ती जरी माझ्या आयुष्यात नसली तरी , तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी केक कापून एकटाच तिचा वाढदिवस साजरा केला ,,, आठवणींच्या अश्रू ने चिंब भिजलो होतो मी, ती माझ्या आयुष्यात नसताना सुधा मी का केला साजरा ती चा वाढदिवस स्वतःलाच प्रश्न करून उत्तर शोधत होतो मी. त्या दिवशी आनंदात मीच माझ्यात उरलो नव्हतो ..
तिची मैत्री मला सुद्धा हवीहवीशी होती , ती लक्ख अंधारात ,चांदण्या प्रमाणे माझ्या साठी होती .. मात्र तिचे imo वरती दररोज चे दुःखी स्टेटस मला सुद्धा दुःखी करून जायचे . ती आता नाही माझी या गोष्टी ची जाणीव तिचे प्रत्येक स्टेटस करून जायचे . खूप हुंदके भरून मला रडू यायचे . कसे बसे खोटे हसून ,स्वतःला मी सावरायचे .पण शेवटी मी पूर्ण पणे हरलो होतो . वादळ प्रमाणे मी विखरलो होतो . मन माझं माझ्या कामात लागत नव्हतं , प्रोफेशनल लाइफ सगळी अस्तव्यस्त झाली होती . प्रत्येक क्षणाला टेंशन आणि आठवणींच्या ज्वालामुखी निर्माण व्हायच्या ,माझ्या शरीरात अक्षरशः दुःखाचा भूकंप करायच्या . मला हे सर्व अस्सय झाले होते .. कारण कि माझ्या वेदनेचे आकार आभाळा एवढे झाले होते .शेवटी मी ठरवलं कि हातातले हात आपण सोडायचे सेल्फिश बनून स्वतःचे आयुष्य आपण स्वतःच जगायचे .म्हणून तिच्या सोबत सारी नाती मी संपवली . कारण कि कदाचित हेच शेवट चे पर्याय होते . तिची काहीच चूक नाही तिने आपली मैत्री निष्टे ने निभावली होती .
मीच मर्यादा ओलांडू प्रेमाची चूक केली होती .. कदाचित ती प्रयत्न करत होती .. ती करते दुसऱ्या कोना वरती प्रेम हे मला सांगावे , मात्र माझ्या आयुष्यात खुप दुःख आहे म्हणून तिने हे मला दुःख होईल म्हणुन कधीच सांगीतले नव्हते . आज सुद्धा मला तिची काळजी होते ..ती जेवत असेल का हि फिकिर खुप होते .. मी तिला नकळत दुखावले तर नव्हते ,,,माझ्या जवळ दुसरे कोणतेच पर्याय नव्हते ..शेवटी विरह जरी असले तरी मात्र तिच्या आठवणींचे सुगन्ध सतत माझ्या अवती भवती असते .. तिचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत माझी प्रत्येक प्रार्थना हीच असते .. !!! चूक केली आम्ही दोघांनी , तिने दुसऱ्यावर प्रेम केलं ,आणि मी तिच्यावर प्रेम केलं . शेवटी दोघांना माहित होत कि प्रेमात फक्त दुःख मिळत असते ..!! प्रेमात फक्त दुःख मिळत असते .. !!!!