STORYMIRROR

Aarti Mungase

Horror

3  

Aarti Mungase

Horror

काली सावली

काली सावली

2 mins
30


हि घटना 2013 साली घडलेली आहे आणि ठिकाण विमाननगर पुणे असे आहे.

तो क्षण होता कंपनी मधील पार्किंग मधला , वेळ होती रात्री ची , गेट मधून प्रवेश करताच मागून एक सावली समोर येत होती , मागे वळून पाहताच कोणी दिसेनासा झाले मनात जरा धाकधूक सुरु झाली... पुढे सरळ रस्ता काही संपत नव्हता . आजू बाजूला देखील कोणी दिसत नव्हते मागून एक आवाज आला आग थांब जरा माझ्या सोबत चल आवाज तर ओळखीचा वाटत नव्हता मागे वळून बगताच एक काली सावली दिसली , तो देखील अंगाचा फक्त अर्धा भाग दिसत होता .

माझी तर वाचा फुटत नव्हती , काय करावे काही सुचत्त नव्हते तसाच तिथून पळत सुटले . कशी बशी तिथून बाहेर पडले आणि एका ठिकाणी स्टॉप घेतला विचार करता करता सहज एक रस्त्या वर एक बॉर्ड कडे लक्ष गेले त्या वर लिहले होते  रस्त्याचे काम चालू आहे वाहने सावकाश चालवा ... तिथे काही दिवसापूर्वी एक अपघात झाला होता आणि नंतर काही वेळेत माझ्या लक्षात आले कि अमावस्या आहे आणि नेमके मी जेवणासाठी जो डबा नेला होता तो अर्धवट राहिला होता कदाचित या कारणामुळे मला असा अनुभव आलेला असेल .घरी जाताना अंगात काही प्राण उरले नव्हते , ह्या नंतर अंगात प्रमाणापेक्षा ताप आणि अशक्तपणा आला होता आठ ते पंधरा दिवस लागले ह्या धक्या मधून सावरण्या साठी . 

असा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदा अनुभवला आहे आणि आज हि ती वेळ आठवली तरी अंगाचा थरकाप होतो !!


. 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror