जिणं जगता
जिणं जगता
मी कवी प्रकाश उर्फ लोकेश, इच्छा तं होती खूप मोठं व्हायची पण मला मोठं होता आलं नाही कारण माझी वाढ एखादया अंकुरासारखी झाली, ज्यांना खाद मिळाल ते वाढले आणि जे किनारी पडले त्यांना अपुरं खाद मिळाल्यामुळे ते बारिकच फक्त जगाकडे बघत राहिले अन शब्द जोडत गीत गात वाऱ्यावर समाधानानं डोलत राहिले की आलो ते आता अनुभवतं पहात जाऊ नेमकं मी भाग कश्याचा त्याच तरी शोध घेत पडलं ते काम करतं जिणं काय असतं हे समजून तरी घेऊ म्हणून जगत आहे मी गरीब कुटूंबात जन्मलेलो माणूस परिस्थिती खूप हलाकीची असताना सुद्धा माय माझी मोल मजुरी करून मला शिकवत होती व बाप लोकांन सोबत भांडण कुरापती काढण्यात व्यस्त असायचे आणि माझ्या आईला पण मारहाण करतं राहायचे त्यामुळे माझे लहान मन नेहमी कोमजलेले असायचे व शिक्षण शिकण्यात मन रमत नसे त्यामुळे अभ्यास घोकंपट्टी करतं पास होतं आलो, माझी बारावी झाली होती आता पुढे काय करायच या विचारात घरीच फिरून काही दिवस लोकांच्या विहिरीवर काम करून एक दोन वर्ष वाया घालून बी. ए. ला प्रवेश घेतल होतं, वाटलं होतं पदवी पूर्ण करून mpsc ची परीक्षा द्यावी, त्यामधी पण मी अपयशी ठरलो अन औरंगाबाद शहराची वाट धरून कंपनी मध्ये काम करून माझ्या जीवनाचे मी खूप महत्त्वाचे दिवस वाया घालवले त्यात मी कंपनीतं काम करून कॉम्पुटर सॉफ्टवेअरचे कोर्स शिकत असतानी जास्त जागरणामुळे मी एवढा बिमार पडलो होतो की मला पोटाचे ऑपरेशन करावे लागले तेव्हा मित्रांनीचं मला मरता मरता वाचवले व माझी हिंमत कमी झाल्यामुळे मी पुढे काहीच करू शकलो नाही अन घरी आलो आणि तेंव्हा पासून मिळेल ते काम करतं आलो करतं आहे.............
