STORYMIRROR

sandhya layaskar

Tragedy

4  

sandhya layaskar

Tragedy

जीव गुंतला तुझ्यात

जीव गुंतला तुझ्यात

1 min
159

मन होई अधीर, तुझ्या भेटीस आतुर

जीव गुंतला तुझ्यात लावू नकोस ऊशीर...1..


कुठे जुळणार नाते जन्मभर देण्या साथ

नामानिराळे होऊन सोडू नकोस हात...2..


रात्र रात्र वाट पाहून थकले माझे नयन

चैतन्य जागवीत तुझे सारखे होते स्मरण...3..


स्पंदनात मिसळती स्पंदने श्वास हृदयात साठविते

तु नाहीस म्हणून आज रूप सारखे आठवते..4..


तुझ्या माझ्या जीवनातील अनमोल क्षण

सदैव मना मोहवित मधूगंध वेडावून जाई जीव..5..


जुळली अशी लोभस नाती वंदन तुझ्या कर्तृत्वाला

ओढ अनामिक जीवा लागली मन झुरतंय मातृत्वाला..6..


सीमेवरती रक्षण करण्यास गेला किती दिवस झाले

मनात साकारतील स्वप्न वाट पाहत धूसर झाले..7..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Tragedy