sandhya layaskar

Others

4.0  

sandhya layaskar

Others

मनभावन श्रावण

मनभावन श्रावण

1 min
193


    खूप खूप पाऊस झेलीत तनामनास आनंद झालाय, पण हासरा नाचरा, जरासा लाजरा श्रावण आला....आणि पावसाळ्यात चिंब भिजवून गारेगार झालेलं भावनिक मन आता द्विगुणित आनंदघन पांघरून मोहरून गेलंय....

    यंदा चा श्रावण तर शंभू देवाच्या शुभागममनाची नांदी घेऊन आला, 

शंकराची ऊपासना करणारे भक्त ओम नमः शिवाय जपत, शिवामूठीचं अर्ध्य देत हर्षोल्लासीत झाले. शिवाराधनेचे व्रत करून लहान थोर कृतकृत्य झालेत. कोरोनाचाही भितीयुक्त भर कमी झाला.आणि निसर्गरम्य वातावरणात सकल जनांचा अणूरेणू पल्लवित झाला, 

      नवपरिणीता ललना मंगळागौरीच्या व्रतस्थ होऊन माहेरी सुखावल्या. हिरवी झाडे वेली, पानापानावर आल्हाद घेऊन अवनीला सुशोभित करण्यात दंग झाल्यात. नद्या ,नाले ,ओहोळ धबधब्यातून कोसळणाऱ्या धारा यांना तर वर्षागमनाचा ईतका आनंद झालाय, की अवखळ किशोरवयीन मुलांप्रमाणेच ती आनंदघन घेऊन बागडू लागली, दिपपूजा, गूरूपूजा..

स्वातंत्र्य दिन , नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्णजन्म, आदी विविध सणांची रेलचेल झाली,.आणि मनभावन श्रावण आल्हादित झालाय. 

  आनंदघन भरून चैतन्यमय ढगांवर इंद्रधनू सप्तरंगात न्हाऊन निघाला . आणि अवनीवरचा कण न् कण आनंदाने बहरून गेला. निळ्याशार आभाळात क्षणात उन आणि क्षणात पाऊस असा लपाछपीचा खेळ, रंगला.

श्रावणात घन निळा बरसला

रिमझिम पाऊस झेलीत धारा 

आला गिरिधर छेडीत पावा मधुर 

शेतकरीराजा झालाआनंदी

नृत्य करिती मोर होऊन आनंद विभोर 


Rate this content
Log in