घे विसावा या वळणावर
घे विसावा या वळणावर
प्रिय प्रांजलीस,प्रेमळ नमस्कार. प्रिय सखी माझे पत्र पाहून तुला थोडे हायसे वाटले असेल कारण या तंत्रयुगात मी चक्क तुला पत्र लिहित आहे आपल्याकडे मोबाईल असुन सुध्दा... असो.
पत्र लिहिण्याचे कारण एकच कि,बरेच महिने झाले आपणास मनमोकळ्यापणाने गप्पा करण्यास वेळच मिळाला नाही, त्यास कारणही तसेच आहे तु डॉक्टर असल्यामुळे कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे तुला सुट्टी मिळाली नाही...सुट्टी काय... .तुला श्वास घेण्याचाही वेळ नव्हता.स्वतः चा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी तुम्ही डॉक्टर दिवस रात्र एक करून प्रयत्न करत होता. संसर्गजन्य आजार असल्यामुळे घरातील सख्खे हात लावण्यास त्यांच्याशी बोलण्यास घाबरत होते पण तुम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर उपचार केले, अंतिम संस्कारासाठी सुध्दा लोक समोर येत नव्हते अशावेळी काही समाजसेवकांनी तुमची मदत घेऊन क्रियाक्रम पूर्ण केले.जे आजार बरा होऊन घरी जात होते त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी,त्यांना घरापर्यंत सुखरुप पोहचविण्याचे कामपण तुम्ही अगदी शिताफीने केले.
चोवीस तास सेवेसाठी तत्पर राहून रुग्णांची सेवा केली आणि हे करत असताना आपल्या कुटुंबांची अजिबात पर्वा केली नाही, तुझी लहान मंजु तुझ्यासाठी कितीतरी वेळा रडली ,तुझ्याशिवाय ती झोपत नसायची त्यावेळी तुझ्या घरच्यांना खरोखर किती त्रास झाला असेल...तुझ्या वाचून तिला सांभाळणे फार कठीण होते . आणि तुझीही लेकी शिवाय मनस्थिती काय झाली असेल.. हे शब्दात सांगणे फार कठीण आहे.खरोखरच तुमच्या कार्याला सलाम. आता परिस्थिती पुर्ववत होत आहे आणि लोकांत जाग्रुकता निर्माण झाली आहे, तुमच्या कामाचा भार काही अंशी हलका झाला आहे सखे,तुला एवढेच म्हणायचे आहे, कि आता तु या वळणावर थोडा विसावा घे.
तुझी सखी
