STORYMIRROR

अशोक ढेंगळे

Tragedy

4  

अशोक ढेंगळे

Tragedy

गावाकडचा महिला दिन

गावाकडचा महिला दिन

2 mins
361

कोंबड्याने दुसऱ्यांदा बांग दिली, अंग ठणकत होते, डोळे उघडत नव्हते, तरीही उठल्याशिवाय गत्यंतर नाही. कशीबशी उठली पिंढऱ्यानी जोरदार ठणका धरला होता. तांबडं फुटलं, फड्याच्या पायापडून झाडलोट सुरु झाली. चुलीला पोतेरं करून दारातले सडा सारवान संपत आले. रसरशीत हार पडलेल्या चुलीवरच कडक पाणी अंगावर पडल्यावर कुठं हायसं वाटू लागलं.


जवारीच्या भाकरी दणादणा थापून कालवानाची तयारी सुरु झाली, सासूबाईला अंगुळीला पाणी काढून दिलं, नवऱ्यानं आणून ठेवलेली दुधाची बादली घेतली, वतावती झाली, बादली इसळून ओसरीला मांडली. ऊन दिसून लागली, मोठ्या पोरीने शाळेला उशीर झाला म्हणून भोंगा पसरला. पीक विमा भरायचा म्हणून नवरा तालुक्याला जायचा होता त्याची वेगळीच घाई.


मागच्या आठवड्यापासून सासरा रानात जागलीवरच होता, त्याच्या न्याहारीच्या टाइम टाळून गेला म्हणून सासूनं तगादा लावला. डोक्यावर भाकरी कालवणात टोपलं, एका बगलेत तान्हं लेकरू, दुसऱ्या हातामध्ये गाईचा कासरा. गाईने तहानलेल्या अवस्थेत हाताला दिलेला जोरदार हिसका मानेपर्यंत बसला, हातपंपाकडे बघून. मोठ्या लकबीने गाईचा कासरा खाली सोडला, पायाखाली दाबून धरला. लेकरू खाली ठेऊन भाकरीचं टोपलं अलगद वडाच्या सावलीला मारुतीच्या पारावर मांडलं. लेकराच्या म्होरं वडाची पान गोळा करून टाकली नादी लागावं म्हणून.


हातपंप मारून दमछाक झाली, गाय पण जास्तच तानेजलेली होती. हातपंप वरखाली करताना उघड्या बरगड्या झाकून राहतील याची पुरेपूर काळजी घेतली गेली, घामाघूम झाली तरी डोईचा पदर ढळला नाही, तोवर पोरानं सूर धरला. ऊन जरा जास्तच चढली, पारा जास्तच तापला होता. झपाझप पावलं टाकत माऊली निघाली, दिवसभराच्या कामाच्या मोजमापाच्या तंद्रीत. तंद्रीतून बाहेर पडली, गावकुसाच्या बाहेर आली तेव्हा शाळेतल्या मोठ्या आवाजाच्या भाषणाने, जागतिक महिला दिनाच्या...


Rate this content
Log in

More marathi story from अशोक ढेंगळे

Similar marathi story from Tragedy