STORYMIRROR

RAHUL GOVINDA PAWAR (RP)

Romance

4  

RAHUL GOVINDA PAWAR (RP)

Romance

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात

1 min
428

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल,

तिला पाहताच त्याला तीच वेड लागल,

वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल,

पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने

स्वत:ला सावरल,


वेल मात्र आपली हसत ,खेळत राहत होती,

ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती ,

काही दिवसाने वेल मात्र जमिनीवर पसरू लागली ,

ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली,


वेल म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे ,

तू मला आधार देशील का ??

यावर झाड़ म्हणाले, तू माझी होशील का ???


ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली,

ते पाहून झाडाची निराशा झाली,

हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले,


विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले,

वचन देताच वेल मात्र झाडाला बिलगली,

अन , हसता हसता त्याची आसवेहळूच ओघळली,

आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from RAHUL GOVINDA PAWAR (RP)

Similar marathi story from Romance