डीग्या आणि शेवंता ( गरिबी)
डीग्या आणि शेवंता ( गरिबी)
उन्हाळ्याचे दिवस आणि सकाळच्या कोवळ्या शांत वातावरणात 'डीग्या' त्याच्या झोपडीच्या अंगणात दरवाजाला पाठ टेकवून, उजव्या पायाच्या गुडघ्यावर डोके ठेवून, खाली सावरलेल्या वटट्यावर हातातल्या काडीने गिरवत विचार करत बसला होता. 'डीग्या' तसा गरीब व साधा भोळा कुणाच्याही भानगडीत न पडणारा आणि अडाणी असल्यामुळे शिक्षणाचा काही गंधच नव्हता.
तितक्यात त्याला कुणीतरी हाक मारल्याचा आवाज आला. मान वर करुन समोर बगितलं तेंव्हा शेजारचा राम्या, खांद्यांवर कुदळ आणि हातात भाकरीची पिशवी घेऊन डीग्याकडे आला आणि डीग्या आवरलं का नाही तुझं ` काल मालकानं काय सांगितलं ते माहीत हाय का नाही तुला?
पण, डीग्या खालून उठत गंभीर आवाजात, 'राम्या आज मी कामावर येऊ शकत नाही. तुझी वहिनी लई बिमार हाय, तिला दवाखान्यात घेऊन जावं म्हणतूया पर जवळ एक पैक भी नाही, आणि सन जवळ आलाया पण घरात एक दाणा भी नाही, मालकाकड थोडं पैकं मागावं म्हंतूया पण मालक कसला हाय ते तर तुला भी माहीत हाय. मी काय करू तूच सांग राम्या'
तितक्यात डीग्याची पोर बंड्या आणि राणी डीग्याजवळ येऊन
बंड्या: बाबा माझी वही आणि पेन संपलिया.
राणी: मला शाळेत फीस भरायची आहे.
ह्यांच बोलणं डीग्या शांत ऐकून घेत असताना, मधून डीग्याची बायको `शेवंता' तापाने फणफणत, डोळे तापाने लालबुंद झालेले कशीबशी थरथरत बाहेर येऊन' ये कार्ट्यानो काय लावलाय रे सकाळी सकाळी तुम्हाला माहीत नाही का आपली काय हालत हाय ती चला निघा शाळेला. तसा राम्या, शेवंता जवळ येऊन अहो वहिनी तुम्ही आपल्या गरिबीचा राग त्यांच्यावर काय काढताय, ती अजून लहान हायती. असं म्हणत, राम्या मुलांना जवळ घेऊन तुम्ही आत्ता शाळेला जा, मी उद्या द्यायला लावतो पेन. मूल रागाने शाळेला निघून गेली. शेवंता घरात जाऊन 'भाकरीची टोपली बाहेर घेऊन आली, आणि धनी चला, मालक ओरडलं आधीच लई उशीर झालाय. हा शेवंताचा प्रकार बगून' डीग्या बोलला आग ये शेवंता हे काय चाललंय तुझं. एवढा ताप चढलाय अंगात, आराम करायचा सोडून तु कुठं निघालीस हे भाकरीची टोपली घेऊन?
तशी शेवंता म्हणाली,'मी आत्ता बरी हाय चला. डीग्या एवढा सांगुन सुद्धा ऐकत नव्हती, शेवटी डीग्या राम्या ला म्हणाला आर राम्या तु तर सांग की र हिला, तोवर राम्या बोलला, डीग्या तु एवढ सांगुन सुद्धा ती ऐकाया तयार नाही, एवढ तिच्यात जोर असला तर येऊ दे की,
डीग्या: चला मग म्हणत, तिघेही शेताच्या बांधावर आलेली मालकाला दिसली, तसा मालकानं हाक मारून ए डीग्या, ए शेवंता, कुट होता एवढा वेळ दुपार झालीया तरी तुमच्या कामाचा पत्ता नाही, बर आत्ता आला तर चला लागा कामाला, म्हणत मालक घराकड निघून गेला.
p>
इकड डीग्या, राम्या आणि सोबतची लोक आप आपल्या कामाला लागले. शेवंता भाकरीची टोपली झाडाखाली ठेवून पारुबाई जवळ आली,
पारुबाई: अग शेवंता एवढा उशीर का? शेवंता म्हणाली मला जरा बर नव्हतं म्हणून उशीर झाला. आता तर बर हाय न्हव? हे बग भरलेली टोपली उचल आणि त्या बांधावर टाकून ये. असा म्हणत पारुबाई पण शेवांताला मदत करू लागली. उन्हाचा पारा चढल्यामुळे शेवंताच्या अंगात ताप वाढला होता. तोंड पांढरा शीपट पडलं होतं.
शेवंताने एक बार आपल्या धन्याकडे बगितला आणि कंबरेला पदर खोचून कामाला लागली. अंगात आवसानं नव्हत तरी पण कशी बाशी चार पाच टोपल्या टाकून आली आणि सहावी टोपली उचलताना धाडकन खाली कोसळली हे बगून पारुबाई धावत शेवांताजवळ आली आणि, शेवंताच डोकं मांडीवर ठेवलं, ये शेवंता उठ की काय झालं.'
पण शेवंता काही बोलत नाही, पारुबाई घाबरून डीग्याला जोरात हाक मारली.`ये डीग्या शेवांताला काय झालंय की र, शेवंता काय बोलत भी नाय. हे ऐकुन डीग्याच्या काळजाचं पाणी- पाणी झाल, जिवाच्या आकांतान पळत शेवंताजवळ आला तसा राम्या सुध्दा माग माग पळत आला. आणि डीग्या जवळ येऊन' ये शेवंता उठ की काय झालं, मला एकदा तरी बोल की, माझ्याशी रुसलीस का म्हणत डीग्या शेवांताला जवळ घेऊन मोठ्याने आक्रोश करत होता. पारुबाई डीग्याच्या पाठीवर हात ठेवत डीगु शेवंता आपल्याला सोडून गेली की र ती रुसली आपल्याला म्हणत पारुबाई सुध्दा रडायला लागली. डीग्याला काय करावं काही सुचत नव्हत, राम्या डीग्याला धीर देत, डीगु शांत हो' मरण कोणाला चुकलय का, आपल्याला सुध्दा एक दिवस जायचं हाय. तिचा आयुष्या एवढच होता म्हणत स्वतः ला सावरत होता. तिकडून कोणीतरी मालकाला सोबत घेऊन आला. मालक जवळ येऊन डीग्याला, डीग्या हे कसा झाला काही सांगशील का? तसा राम्या खालून उठत, शेवंता आपल्याला सोडून गेली मालक ऐकुन मालकाच्या डोळ्यात पाणी आलं पण सगळ्याला धीर देत राम्याला आणि धोंडीबाला बैलगाडी आणायला सांगितलं शेवांताला गाडीत टाकून डीग्याच्या घरी घेऊन आलं.
बंड्या आणि राणी शाळेत गेल्यामुळे त्यांना काहीच माहिती नव्हतं. राम्या शाळेत पळत जाऊन, बंड्या, सरला दोघाला घरी घेऊन आला. आपल्या घरा समोर एवढी गर्दी बगून बंड्या आ राणी डीग्याजवळ गेली, तसा डीग्या दोघांना आपल्या कुशीत घेत तुमची आई तुम्हाला कायमची सोडून गेली रं. तीन तुमच्या शिक्षणापायी गरिबीला तोंड देत कधी जीवाची पर्वा सुध्दा केली नाही, म्हणत मोठयान आक्रोश करून रडत होता.
त्या बापाच्या डोळ्यातून पडणाऱ्या अश्रूचा एक एक थेंब जणू काही त्या मुलांना गरिबीची व दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी, भविष्यासाठी प्रेरणा देत होता.