Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

chikne brothers

Tragedy

3  

chikne brothers

Tragedy

चुकी (आगरी कथ)

चुकी (आगरी कथ)

6 mins
996


सकालचा सारेसा वाजाचा आलाराम वाजला तसा संज्या निजनशी उठला,

बाजूला निजलेले बायकोचे अंगाव गोदरी फेकली न तो सरल खोलीनशी माजघरांन अला,बायेरचा दरवाजा उचकुंन अग्न्यान अला तवा बायेर मानसाला मानुस दिसत नवता.बाजूला दोनक कोम्बर्यावी आरवून गोंगाट घतलेला..म आंगोलीचा पानी तापवाला टाकिन हीटर लावून त्यानी टम्बरेलान पानी झेतला न डोल पुषितच परसा कर निंगला,

परसाकर जाताना दांत घसाचे बरासाव कोलगेट झेवाला इसारला नाय तो..

         आज संज्याचे मतान नाकर्त्याचा वार शनवार होता.

आज लवकरिच त्याला मारवतीचे देवलान नारोल फोराला जावाचा होता.

कुरवलेले शेताचे कान्ड्या मागे परसाकारून चा काम आटपुन तो घरा येवाला निंगला तवा वाटन त्याला रुई चा झार दिसला तशी त्यानी त्यावल्या धा-बारा फुला न थोरी पाना खुरली.

आता सकालचा उजेर वारलाता मानुस मांनसाला वलखिल आवरा दिस उजारलाता..झाराव पाखरा कील बिल कराला लागलीती पुरवेला आभालान मस्त लाल पिवला रंग पासारलाता,न वावसुली पन सुटलिती.

तशी आगोठ जवल अलती पन पानी परत नवता,दरोज सांचे-सकालचे वारा जोर धराचा न काल-भुर ढग आभालान गर्दी कराच.आज पन सकालुच वारा ज्याम होता न काले ढ़गावि हाजेरी लवलिती.वाटत्तुता क आज नक्की पानी परल,

आता लोकांची परसा कर जावाला लाईन लागलिती,बरीच ढोरा-म्हरा पन पान्याव् निग्लिति,मदिच कोणी कुदल खांद्याव झेवुन शेताव जाताना दिस्तुता,संज्यानी आता पायांचा येग वारवला,तवरऱ्यान एक टिट्वी संज्याचे डोक्यावल्या टिव-टिव करीत जेली..न रागाशी संज्या तिला पुट-पुटला "च बना मीच दिसलो क तुला सकालुच.. कवरा कलवात वारा घतले मर जा कया"

न भरा भर पावला टाकित तो घरा पोचला.घरा बायकोनी उठून ओटा बारित लवलाता.

"ए रीना आगो आज देवलान जावाचा ह पाया पराला,आंग धवाला पानी कार लवकर.. हीटर लवले बग.. तापला असल पानी"

त्यानी बायकोला आवाज दिला.

तसा संज्या चे बायकोनी हातांचा खरादा तसाच खालते टकला न ती पानी काराला जेली.

संज्या तसा चार बुका शिकलाता. पंधरावी व्हल्याव दोन वरिस गोडावुंनला आफिसान कामाला जेला न तीसरे वरसांन आस बाफासनी त्याचा लगींन लावून दिला.बायको पन बरी भेटलेली कामाची न बोलपट, एक-दिर वरसान त्याना पैली पोरी व्हलती.न तो आता डोफ्यानव चालतूता.

घरांन तसा सगला देव धर्माचा वातावरन, आस- बाफूस पैले पसून देव धरमाचे मागे, त्यान संजाचा पन देवा धर्मा बरोबर जुने सास्तरानव ज्याम इसवास होता.शिकलेल असला तरि मनान अंधशरदा पन ज्याम त्याचे,आवुक्षे-आवुक्षे गोष्टीना घाबराचा,चार वरसां आगोदर त्याला कोनी तरि शनवार उपास कराला संगलाता तवशी गऱ्यानी एक पन शनवार सोरला नाय क देवलान नारोल फोराचा इसारला नाय.

आजपन त्याजेचसाटी तो लवकर उठलाता.


"ओ या पानी टकले अंगोलीला" बायकोनी त्याला आवाज दिला.

"ती रुईची पाना-फुला हंनल्यांन बाबाला सांग हार बनवाला.!न नीम्बू असल त जरा निम्बू मिर्ची ओव तू सुतांन गारी ला बांदाला"संज्या नी बायकोला सुचना केल्या न तो मोरिन घुसला.

तशी ति वैतागली "मना अजुन चपात्या न भाजी कराची ह आयला संगताव कराला. तुमी आंग धवून झ्या."असा बोलत परत तीनी खरादा हातान झेतला न ओटा बाराला लागली.

   जशी सकाल पकीच वरते येवाला लागली तशी आता संज्याची पोरी सोरून घरांची समदी मानसा जागी व्हलती, संज्याचे बाफासनी रुचे पानांचा हार ओवून गारीला लिंबू मिरची पन बनवलीती रिनानी चपात्या-भाजी बनवी परेन संज्या देवालान जावाला तयार व्हला.काल कामावशी घरा येताना हनलेला नारोल ना घरांचे देवाऱ्यानशी दोन उदबत्त्या कारून रुचे पानांचा हार झेवून संज्या घाईनच मारवतीचे देवालान जेला. 

   देऊल तसा जवलच होता ना आज शनवार होता म्हगून उगराच होता.

आक्खे दगराची एकच बनवलेली म्होटी मारवतीची मूरती आज जरा पकीच भरक न चिकट दिसतूती.

दोघा-तिघावी शेंदूर-तेल टाकून मारवतीचे आंगावल्या ओल कारलाता,

"कृपया नारळ बाहेर फोडावे"अशी पाटी बाजूलाच लवलीती तरी ज्याचा तो मारवतीचे पुऱ्यानच नारोल फोरून थोरा पानी त्याचे आंगाव शिंपरूतुता न थोरा सवता पितुता.

समदे देवलान पान्याचा चिगदान व्हलता त्याव बाकी कोनचा ध्यान नवता,

  संज्या नी देवलाची घंटा पाचक फेल्या वाजवली तसा आक्खे देवलान यो टानटांन आवाज घुमाला लागला. बिजी देवलांची मानसा त्याचे कर अशी बगाला लागली जसा संज्या नाय त कंचा माकुर अले.त्यानी मारवतीचे जवल येऊन हात जोरलं.रुचा हार मारवतीचे ओले गल्यान घतला ना "झें देवा खा-पी मजा कर पोरा बालांव लक्ष ठेव"

असा बोलत मारवतीचे पुऱ्यान नारोल आपटला.

न तवाच....कसा क..? क माहीत..?

संज्याचा नारोल उभाच कला नी फुटावा.? तसा संज्या कावरा-बावरा व्हला..

मारवतीचे आंगाव पानी उरवीत तो बोलाला लागला..

"देवा आज नारोल उभा फुटले कइ चुकला माकला आसलं त माप कर न गोर मानून झें"

न तो टोंड आऊसा करूनच घरा परातला.

सकाल्या परसाकरूनशी येताना टिटवी कोकलत डोक्यावल्या जेली,आता मारवतीचा नारोल उभा फुटला या दोन गोष्टीवी आज त्याला बराचसा घाबरवलाता.

  आता संज्यानी सवताचे दोनचाकी हिरोहुंडाला लिंबू-मिरची बांदुन रिनानी बनवलेला डबा झेतला आफिसला निंगला. 

घरापसून आफिस तसा लांब नवता. गावाचे खालची

खारी जमीन लोकांवी थोरी इकलीती त कैकावी गोडाऊना बांधाला दिलती तयाच एके म्होटे कंपनीचे गोडाऊनला आफिसान संज्या कामाला होता.

आफिसला जावाला दोन रस्त होत...

येक पक्का.. शालेजवलशी नाक्यावल्या जातूता न बीजा कच्चा.. गावाचे बायेरश्या शेतांशी मालरानावल्या जातूता..पन जरा शाटकट..

   संज्या नेमी पक्के रसत्याशीच जावाचा.त्याला तोच चंगला वाटाचा. कवचित टाइम व्हला म कच्चा रसता पकराचा..

 आज पन त्यांनी शालेजवलचा रसता पकरलाता.

सकाल पसून सुटलेले वाऱ्याचा जसा येग वारलाता तास संज्याचें गारीचा पन येग वारलाता.

आभालान ढग पन गरगाराला लागलत.नाक्यावली शाला क्रास करून संज्या पक्के रसत्याव अला न तयाच संज्याचे पूर बीजा अपसकुन घरला..

...'संज्याचे गारीचे समोरशी येक काली माजर आरवी जेली,तसा संज्यानी कचकीशी गारीचा बीरेक मरला.माजर जागच दबाकली संजाचे कर येकदा ओखली न कंचे कया पलाली त सांगून सोय नाय,

पन संजाचे तोंडांचा बाकी ती पानी पलवुन जेली.

संज्या जागच थांबला एकदा रागान पचकन थुकला.

मनानं आता त्याचे रागा बरबर भीती पन पैदा व्हली.आता क करावा त्याला संमजनासा व्हला, माग येवावा क पूरं जावावा यो येगलाच सवाल त्याचा जीव खावाला लागला,

आज सकाल पसून यो तिसरा अपसकुन होता त्याजे साटी.एक येल माजरीची पाठ झेवावी न एकच उपटीश्या तिला जागच निजवावी असा पन त्याला वाटला.पन माजरीला बोलते सात जलम असतान.न तिला ठार केल्याव पका पाप लागते,असा त्याला कोनी तरी संगलाता म्हगून तो इचार पन त्यांनी सोरून दिला,

कोनी आपल्याला मगारी टाकुन पूरं जल मंग आपन मागशी जावं तवा कै नाय व्हनार असापन त्याला वाटला. पन आवरा थांबाला टाइम नवता त्याजे जवंल,कारन आफिसला टाइम व्हतुता.

शेवटाला म त्यांनी बीजे कच्चे रसत्यांशी हाफिसला जावाचा मनाश्या पक्का केला.लगेच गारी वलवली.त्याचे मतांन त्याशीव पर्याय नवता...कारन माजर आरवी जाना त्याजे साटी पका म्होटा आपसकून होता.

त्यानं पुना पनवती अशी होती की शिंम-शिंम पान्याची सुरवात व्हलती.वारा डबल चे येगानं वारलाता,

      संज्या बीजे रस्त्यांशी जावाला जवा मालरानाव अला तवा समदे कर धुल उधाल्लीती.झाराची पाना सोसो कर्तुती.न पयले पान्याचा वास पन सुटलाता,आता त्याज कपरं पन धूलीन ज्याम माखलत न पान्यान भिजून ओल व्हलत.तशी संज्यानी रसत्याचे मेरला येके मोवाचे झाराखाली गारी थांबवली ना तो वारापानी कमी व्हवाची वाट बगाला लागला...

पन...

कंचा क न कंचा क.?

ज्या आकरित घराचा त्या शेवटाला घरलाच...

संज्या रस्त्यानं ज्या मोवाचे झारा खाली थांबलाता ते झाराचा एक म्होटा खांदा वाऱ्या-पान्याशी धपकन संज्याचें आंगाव कोसालला,

न गारी सगट संज्या ते खांद्या खाली गारला.

आरधे झाराचा एकच खांदा तो.. जसा कोसालला तसा पका म्होटा खारकन आवाज झला ते आवाजान आजूबाजूला वाऱ्याना "काकऱ्या-शिरवलं" लावाला जमिनींन 'आली' पारनारे लोखावी मोवाचे झाराकर धाव झेतली.

तया अल्याव त्यांना समाजला संज्या हिरवे पानाश्या भरलेले खांद्याचे खाली ह.तसा घाई घाईन चौघा पाच जनावी तो खांदा बाजूला केला.

संज्याचे गारी चा साफ चेमका व्हलता.बेसुद परलेले संज्याचे डोक्याला खोखु परलाता. त्यांशी निंगनारे रगतान संज्या आक्खा न्हानलाता,न त्याचा उजवा हात खांद्यांशी लुलापांगला व्हलता..

लोखावी संज्याला उठवला त तो कैच हालचाल करीत नवता. म त्यांनी त्याला हुसल्ला गावानं नाक्याव शाळेजवल हनला ना एकानी रिक्षांन टाकून दवाखान्यांन पोचवला,

आवरा समदा रामायन येवाना संज्याचे घरा कवाच समाजलाता,रिना लरत-लरतच दवाखान्यांन पोचली न तिजे माग संज्याचा अस न बाफूस पन पोचला..

तीन-चार तासान संज्या दवाखान्यांन सूदिव अला तंवा आंगामासाला बंदलेल्या पट्ट्या बगून सकाल पसून चा समदा इथ्यास संजाचे डोल्या समोर अला.

टिटवी..रु ची पाना... लिंबूमिरची... उभा फुटलेला नारोल..आरवी जेलेली काली माजर...बदललेला रस्ता..न मोवाचा खांदा.

आता त्याला समजत नव्हता.

माजर आरवी जेल्याव रस्ता बदलाला पजे होता क.? नक्की चुकी कोनची होती.??

टीटवीची,नारलाची,काले माजरीची,क त्याजी सवताची...??


Rate this content
Log in