STORYMIRROR

Kiavi Kirti Ravikumar

Inspirational

3  

Kiavi Kirti Ravikumar

Inspirational

चाय वर चर्चा प्रेमाच्या बागेत

चाय वर चर्चा प्रेमाच्या बागेत

2 mins
210

                       
          
                      प्रेमाच्या बागेत

प्रेमाच्या विश्वामध्ये सर्वाधिक लोकांना हरवून जावस वाटतं. मानवाला लाभलेले प्रेम आहेतच हो इतकं प्रेमळ की, चांगले चांगले या प्रेमाच्या महासागरात ओढले जातात. खर तर प्रेमाला सीमा नाहीच मुळी,प्रित हि त्या देऊळातल्या देवाप्रमाणे अनंत, असीम, अविनाशी आहे. प्रेमाला उदय आहे,पण अंत नाही ते कायम वाहत असते.सदैव असते, विधाताप्रमाणे कणाकणात विराजमान आहे.असे मलाच काय तुम्हाला ही वाटते हो ना, 
     प्रेम म्हटले की मला फसवणूक वाटायची,प्रेमापासुन मी खुप लांब राहायची. नको वाटायचं मला ते,पण काय करणार तुमच्यासारखंच माझ्या ही हृदयाच्या कपारीत ते इवलंस लेकरुप्रमाणं वसलं होतं. आणि म्हणुन च की, काय मला ही प्रेम झालेच, पण सर्व प्राणिमात्रांवर आणि प्रिय व्यक्ति वर सुद्धा. पण,मला तेव्हा ते कळत नव्हतं, माझी खुप चिडचिड व्हायची, कोणाला प्रणयाच्या गप्पा मारतांना पाहुन, मला अस वाटायचं की मी इथून आता पळ काढावा. काय या व्यर्थ गोष्टी आहेत. मला नेहमी वाटायच की, काय ही चिल्लर टाइप आहे, पण ईथे मी चुकीचे होते. मला उमगलं की प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची पद्धत वेगळी आहे. हे आपण मान्य करायला हवे. खर तर प्रेम मानवाला मिळालेली दैवी संपत्ति होय.नादान प्रेम हे त्या जीव लावणारा मनुष्याला जास्त जमते, त्यात त्याच्याकडे स्वार्थ नसतो,तो सहनशील मात्र चांगलाच असतो.
    प्रेमाच्या या बागेत समर्पित हृदय महत्वपूर्ण भूमिका निभवते,ते पुर्णपणे सत्य,स्वच्छंदी,पवित्र निर्मळ अनुराग फुलवत असते. मग ते आई- वडील विषयी असो,गुरुप्रती असो की, प्रियकर- प्रेयसी बद्दल असो, आदर सम्मान, सत्कार तर या अशा गोड आसक्ति मधुन दरवळत असतात. 
  आपल्या या अभिलाषेत विरह, वेदना नसाव्या असं प्रत्येकाच्या काळजात ही हाक ओरड देत असते. अनुरागाचा उदय, रोज व्हावा आणि नवीन उमलत्या त्या फुलाप्रमाणं अलगद उमलावं आणि त्याच्या कुशीत लोळावं मस्त तल्लीन होऊन जावं अस प्रत्येक व्यक्तिला वाटावं. या खुल्या विश्वात आपलं प्रेम व्यक्त करावं, आणि त्याचा आनंद घ्यावा, हो पण ईथे मला एक आवरजुन सांगायचे आहे, प्रेम हिसकवून,किंवा जबरदस्ती ने मिळवता येत नाही, आपलं सोनुल प्रेम जर नाही आपल्याला मिळाल तर दुख तर आहेच, पण या सुंदर प्रेमभावनेला वैरतेची जोड देणे फार चुकीचे आहे. प्रेमाला प्रेमानेच जिंकायचे, नाही मिळाले म्हणुन काय झाले, आपल्या हृदयातला तीजोरीत वसलेल्या त्या प्रेमाला सांभाळा त्याला भयानक रूप देऊं नका. वरील म्हटल्याप्रमाणं, प्रेम हे ईश्वरप्रमाने अविनाशी आहे, त्याचा विस्तार अनंताच्या दिशेने होऊं द्या.......
           By kiavi 
            Pune


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Kiavi Kirti Ravikumar

Similar marathi story from Inspirational