Shital Kuber

Tragedy

4.7  

Shital Kuber

Tragedy

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही...

4 mins
1.2K


दिवस मावळतीला आला ..त्याच्या डोळ्यात जिंकल्याचा हर्ष दिसत होती. भारताचा विजय झाला होता. तो आणि त्याच्या हाताखालील अधिकारी कित्येक दिवसांचा मागोवा घेत बसले. प्रत्येकजण आपापल्या हाताखालील सैनिकांची कामगिरी अभिमानाने सांगत होता. शत्रुसैन्याची कशी धूळधाण उडवली हेच प्रत्येकाच्या तोंडात होते. तोफांचे आवाज मंदावले होते. बंदुका शांत झाल्या होत्या.

पूर्ण देश जवानांचे कौतुक करत होता. 2 दिवसांनी त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार बहाल करण्यात येणार होता. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव त्याच्यावर होत होता. वायुसेनेत तर नवीन जोश होता कारण त्यांच्यातील तडफदार अधिकाऱ्याला शौर्यपदक बहाल करण्यात येणार होते. कौतुकाचे बोल ऐकण्यात 2 दिवस कसे गेले हे त्याचे त्याला कळाले नाही. नि तो दिवस उजाडला. भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत होता. राष्ट्रगीताची धून ऐकताच शरीरात नवा उत्साह संचारत होता. सगळे नौदलाचे, वायुदलातील अधिकारी त्याच्याकडे अभिमानाने पाहत होते. अभिमान इतका ओसंडून वाहात होता. की जणू काही प्रत्येकाला वाटत होते की पुरस्कार त्यांच्यातील एका कुटुंबियाला भेटतोय.आभाळ पण आज भर उन्हात ढगाळ झाल्यासारखे भासत होते. जणू काही आभाळाला पण भरून आले होते. त्याची पत्नी त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती. ती केवळ एकाच आनंदात होती की नवरा सुखरूप परतला आहे. कित्येक दिवस तिने टीव्ही पहायचे पण सोडले होते कारण दिवसरात्र एकाच भीतीने तिला ग्रासले होते ती भीती होती नवरा जाइल याची..तिला भीती होती ती मुलाच्या भवितव्याची... वृत्तवाहिन्या प्रत्येक वेळी नाट्यरुपातर करून हल्ल्याची भीषणता दाखवण्यात मग्न होती.. दरवेळी ते पाहत असताना तिच्या डोक्यावर नवऱ्याच्या मृत्यूचे सावट घुमयचे.. जेवणाचा एक एक कण ती पोटात कसाबसा ढकलत होती.त्या दुःखाची जागा आज आनंदाने घेतली होती. तेच दुःख आज अभिमानाने बाहेर पडत होते. डोळ्यातले पाणी अभिमान, देशभक्ती याचीच साक्ष देत होते. आज त्याच्याप्रती तिला वेगळेच प्रेम भासत होते. आणि त्याला तिच्याप्रति...


आज 15 ऑगस्ट.. भारताचा स्वातंत्र्यदिन. प्रत्येक राज्य आपल्या संस्कृतीची ओळख नाट्यपथकातून करून देत होते. पण त्याचे लक्ष कुठल्याच पथकाकडे न्हवते. इतर सांस्कृतिक गाणी आज त्याला ऐकावी वाटत न्हवती. सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर शौर्यपदकं बहाल करण्यात येणार होती.आणि तो प्रतीक्षा करत होता त्या क्षणाची. त्याच्या हातात शूर जवानांची यादी होती. जे जवान देशासाठी शहीद झाले होते. त्याच्या हातात अशा जवानांची यादी होती ज्यांना कायमचे अपंगत्व आले होते. एक दुसरी पण त्याच्या हातात यादी होती ती आर्मीतल्या डॉक्टरांची .ज्यांनी अहोरात्र कित्येक सैनिकांचे प्राण वाचावेत म्हणून प्रयत्न केले होते.आणि आता तो भानावर आला ते त्याच्या मुलाच्या रडण्याने..स्वतःच्या कुटुंबाकडे बघून त्याला त्यांनी भोगलेल्या दुखाची जाणीव झाली कित्येक दिवसांत काय झाले याची या छोट्या जीवाला काही कल्पना न्हवती. त्याने मुलाला कडेवर घेताच त्याचं रडणं थांबले. त्याच्यातला पिता आज समाधानी पावला. शेजारीच 2 खुर्च्या सोडून त्याच्या मित्राची विधवा पत्नी बसली होती. वीरपत्नी म्हणून तिचाही सत्कार करण्यात येणार होता. सगळे जवळच्यांचे चेहरे त्याच्या नजरेसमोरून तरळत होते.त्याच्या हाताखाली खूप मोठी सैन्यदलाची टीम होती. तो नुसता अधिकारीच नाही तर खूप जणांचा मित्र पण होता. एका मुलाचा पिता होता. कुणाचा’ तरी मुलगा होता. नवरा होता.त्याला त्याच्या एकेका मित्राचे मरण आठवत होते. मरण..हे मरण वीरमरण आहे साधे नाही. कुणाला वाटते मरताना काशियात्रा पूर्ण करावी...मरताना कुराण ऐकावं..मरताना..मरताना माझ्या जवळचे माझ्या सोबत असावेत. मरण वेदनादायी नको. पण या मरणात कसल्या अपेक्षा.पण हे मरण तुमच्या देशासाठी आहे यापेक्षा दुसरे पुण्य नाही. कित्येक सैनिकांची तुकडी पुर्णतः बेचिराख होताना पहिली होती. कित्येक मृतदेह तर ओळखू पण येत न्हवते.राहून राहून एक प्रश्न त्याच्या मनात येत होता युद्ध टाळता आला असतं तर. काही गोष्टी टाळता येत नाही हेच खरे. हे विचार एकीकडे सुरू असतानाच त्याच नाव जाहीर झालं. राष्टपतींच्या हस्ते पुरस्कार घेताना त्याला खूप कृतकृत्य वाटत होतं..


समारंभ आटोपला नि तो घरी जायला निघाला. रस्त्यात त्याची नजर एक घरावर गेली नि त्याच्या पोटात धस्स झाले. छोटेसे मुलं घराच्या अंगणात रांगत त्या घरासमोर येताच दुखा:ने त्याच्या मनात घर पडली. दैव पण कस असत ते घर त्याच्या मित्राचं होत..राजशेखर... त्याच्या डोळ्यासमोर 10 वर्षाची गोष्ट तरळली. मुलगा एकुलता एक असल्याने त्याचे वडील त्याच्या आर्मीत दाखल होण्याच्या निर्णयाने व्यथित झाले होते. त्यांचे मन वळविण्यात त्याने केलेले प्रयत्न त्याला आठवले. तुम्हाला एक नाही तर दोन मुल आहेत हे त्याने मोठ्या आत्मविश्वासाने म्हणून दाखवले होते पण या युद्धाने

त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच्याकडून नेला होता. कुठलाही पुरस्कार त्यांना आनंद देणार नव्हता.. शासनाची मदत ही मुलाच्या बलिदाना पुढे शुल्लक होती. मित्राची बायको.. ती अभागी विधवा.. . तिचा 2 वर्षाचा मुलगा ज्याला आपण कुठल्या परिस्थितीतून जातोय याची तिळमात्र कल्पना नव्हती. तो राजशेखर च्या घरी जाऊन काय सांत्वन करणार होता.. त्याच्या घरी तर सगळे निःशब्द

होते.. आवाज फक्त त्या 2 वर्षाच्या बाळाचा येत होता... त्याच्या खेळण्याचा.. त्याच्या रांगण्याचा... ते पाहून त्याचे मन हेलावून गेले.



आणि तो मोठ्यांदा ओरडला... थांबवा... थांबवा..भारत शांतीचा उपासक आहे . भारत अहिंसेचा पुजारी आहे.. नर्सने त्याच्याकडे घेतली.. सर्व छावणीत असलेले जखमी सैनिक त्याच्याकडे बघू लागले.. जागे होताच त्याला आपण अपंग झाल्याची.. जखमी झाल्याची..पाय गेल्याची जाणीव .. तो एका दुःखद स्वप्ना तून जागा झाला होता शेवटी ज्याची भीती त्याला जास्त वाटत होती तेच आज त्याच्या जास्त विचार करण्याने त्याच्या स्वप्ना मध्ये आले होते .. तोच छावणीत एक बातमी आली.. राजशेखर गेल्याची... त्याच्या डोळ्यात मित्राच्या मृत्यूच्या बातमीने पाणी तरळले.. छावणी परत सुन्न झाली.... शेवटी काय.. तिला अजून खूप काही सहन करायच होत.. युद्ध संपेपर्यंत.... युद्ध संपेपर्यंत.. युद्ध संपेपर्यंत...



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy