Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Prajakta Dumbre

Tragedy


1.3  

Prajakta Dumbre

Tragedy


बायकांच्या जगात पिचलेला पुरुष

बायकांच्या जगात पिचलेला पुरुष

2 mins 15.5K 2 mins 15.5K

अरे रे..कस्स मॅनेज करतात हे पुरुष या बायकांच्या जगात?

 थोडंं काही झालं की उंदराचा उंट करतात बायका. किती ती दहशत.कधी कोणती बाई कशावरुन पुरुषाचा पानउतारा करेल नो गॅरंटी. 

  गर्दीनं गच्च भरलेल्या बस मध्ये बायका धडाधड ढुसण्या देत पुढ जातात. पुरुषांची एवढी हिंम्मतच नाही, पण चुकून जरी धक्का लागला तर या एकदम उसळून अंगावरच येतात. अरे बसला ब्रेक लागला तर माणसाचा जरा तोल जातो, सिंपल लाॅजिक आहे ...it's law of inertia. 

 

   कधी मनमोकळेपणे यांची स्तुती करायला जावं तरी सोय नाही. झकास, टवका, टकाटक, सेक्सी दिसतेस असलं काही बोललं तर लगेच विनयभंग वगैरे कसंंकाय होतो देव जाणे. सौंदर्याची किंवा गुणांची स्तुती करणाऱ्या पुरुषांना लगेच लाळघोटे, लंपट, पिसाट म्हणुन रिकाम व्हायचं. आणी जी स्त्री या स्तुतीने चिडणार नाही तिला लगेच गळेपडू, चिपकु अस्स काहीतरी बोलणार.

  पुरुषांनी कधी प्रामाणिक मैञीसाठी हात पुढे केला, कॉफीसाठी विचारल, फोन नं. मागितला तर कोणताच विचार न करता त्या पुरुषाला फैलावर घेणाऱ्या बायकांना ना म्हणाव वाटत की, बाई तू गळ्यात पाटी घालून फिर " मी फक्त माझं कामापुरतचं बोलते( आणि मुड असेल बोलायचा तर) बाकी मैञी बिञी साठी वेळ नाही मला ".

 

  खरचं किती अवघड आहे हे, बायकांचा धक्का लागला तर तो चुकून आणि पुरुषाचा लागला तर " ऐ टोणग्या,उगाच काय खेटतोय ? नीट उभा रहा", हा खवडा आणि ऐखादी झापड ही मिळते. 

या बायकांची तारीफ केली की यांची कळी खुलते खरी पण... "तु सेक्सी कसकाय म्हणालास, काही लाज तुला?घरी आयाबहीणांही असच बोलता वाटतं?" एखादीला " तुझा ड्रेस छान दिसतोय, ओढणी तर फारच मस्त आहे" म्हंटलात तर ती बया "तु माझ्या ओढणी पर्यंत गेलाच कसा?" म्हणून इतकं हिणवून बोलते की तो बिचारा रडवेला होतो. Dp वर कधी कौतुक म्हणुन ते डोळ्यात बदाम असलेला emoji पाठवल तर तो बिचारा कायमचा ब्लाॅकलिस्ट मध्ये पुरला जातो. म्हंजे काय, तर स्तुतीसुमनं ऊधळा, पण आम्हाला हवी त्याच format मध्ये!

  आणि या सगळ्या दहशतीची परीसिमा म्हणजे,तुम्ही कधी या दहशतवादाचे शिकार झालात आणि कुणाकडे मन हलक करायला गेलात तर आधी तुमच्या कडेच संशयाची नजर रोखली जाते.

 

  मी पण झापलंय पुरुषांना, वेळप्रसंगी मुस्कडवलं ही आहे, पण उगाचं काही विचार न करता ओरडायच,ऊठसुठ त्यांना लाळघोटे,पिसाट,तुंबलेले,लंपट,लफंगे म्हणणं हे चुकीच आहे.

बयांनो तुम्ही सावध नक्कीच रहा. पण ते पुरुष म्हणुन ते नेहमीच चुकीचे आणि तुम्ही स्त्री म्हणुन नेहमीच बरोबर अस कस असु शकत?


Rate this content
Log in

More marathi story from Prajakta Dumbre

Similar marathi story from Tragedy