अश्रूंचे ते चिपळूण.....
अश्रूंचे ते चिपळूण.....
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी माणुस पाऊस पडण्यासाठी आवर्जून देवाकडे साकडे मागत असतो,पण हाच पाऊस अनेकांचा जीव धोक्यात टाकेल असे वाटले नाही.पाऊस इतक्या प्रमाणात जोरात पडू लागला कि ती 22 जुलै ची रात्र ती रात्र नव्हती,आमच्या साठी काळरात्र ठरली... आणि 23 जुलै ची होणारी पहाट जीवन मरणाची पहाट ठरत होती.स्वर्गाहुनी सुंदर कोकण म्हणून ओळखले जाणारे ह्याच कोकणातील चिपळूण शहरात पहाटे ४.०० वाजता महापुराची लाट आली,आणि सारे चिपळूण गाव पाण्याखाली जाऊन गजबलेले चिपळूण पुरगस्त झाले..
"महापुराचा पाऊस हा
झाला हा गुंड,
निसर्गापुढे कोण
थोपटणार दंड,,...
घरे गेली, गुरे गेली
गेले सर्वकाही,
रडून आता थकले डोळे
रडण्याला अश्रू नाही",,....
ह्या कवितेतून महापुराचा चिपळूणकरांना बसणारा फटका समजलाच असेल.महापुरात चिपळूणकरांनी सगळ काही गमावल आहे. 'ना संसार राहिला ना शेती, कसे उभे होणार ह्याचीच मनाला भीती".पाऊस ह्या आधी ही बऱ्याच वेळा पडला पण असा प्रसंग कधी घडला नाही मग आता असा कसा घडला, ह्याला दोषी कोण? विचार तर मनाला येतोच,पण निसर्गापुढे कुणाच काही चालत नाही.वाटल ही नव्हते अस काय होईल. महापुरामध्ये सगळ गमावून बसलेले हे चिपळूण करांची वेळ आज पोट भरायला अन्न तर सोडा,साध पिण्याचे पाणी ही राहिलेल नव्हत.तुडुंब पाण्याखाली गेलेले हे चिपळूण शहर त्या क्षणाला आधाराचे ठिकाण बघत होते?? तेथील नागरिकांनी 'कोणी घेतला घराच्या माळ्याचा आधार तर कोणी शेजाराच्या डबल घर असणारच्या वरच्या मजल्याचा आधार,काही जण घराच्या पत्रावरती चढून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते,तर काही त्या पाण्यात वाहून जीव गमवलेली होती ...
घर असू किंवा दुकान, चिपळूण करांचे जे होते ते महापुराने नाहीसे केले, सगळ्या बाजार पेठा आज कचऱ्याने भरल्या.एकही वस्तू चिपळूण मध्ये वापरा करिता येईल अशी राहिलीच नव्हती.सगळ काही महापुरामध्ये कचरा,चिखल ह्यानेच सगळीकडे भरलेल दिसून येत होत.जे नागरिक पाण्यामध्ये अडकले होते त्यांच्या मदतीला आजूबाजूचे लोक मदत करत होते,स्वतःचा जीव धोक्यात घालून शेजारच्यांचा जीव वाचवत होते,आणि मदतीला व हा प्रकार सांगण्यासाठी मुंबई पुणे बाहेरच्या शहरात राहणाऱ्या नातेवाईकांना सांगण्यासाठी रेंज ही नव्हती आणि हातात मोबाईल ही राहिलेले नव्हते.कालांतराने तिथे सरकारची मदत पोहचली, NDA, व रेस्क्यू टीम मदतीला धावली, पण त्या मदतीला माणसांचे जीव वाचले पण मुख्या जाणवरांचे मात्र जीव गेले.
पाणी कमी झाल्यावर जे दृश्य नजरेस बघायला मिळाले ते फक्त कचरा आणि चिखल दिसून येत होते.घरात चिखल बाहेर चिखल,घरात काहीच राहील नव्हत जे वापरता येईल.नुकसान तर प्रचंड झाली.घरात चूल असून आज त्या चुलीवर ठेवायला भांडी राहिलेली नव्हती किंवा चुल जाळायला लाकड.अंगावर घाळायला ही दुसरे कपडे राहिले नाहीत,जे अंगावरती होते तोच एक आधार राहिला होता.शेतकरी असू किंवा स्वतःचा धंदा करणारा व्यापारी सगळ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती. वाहने हे पुरात वाहून गेली प्रत्येक चिपळूणकर आज ह्या क्षणाला दुःखाचे ओझे पाठीवर घेऊन आश्रू वाहत होता.हे क्षण न्युज चॅनेल ला पाहिल्यावर मुबंई पुणे अश्या ठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकी - ते सार बघून प्रत्येक शहरात राहणारा नातेवाईक हा चिपळूण ला राहत असणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या चौकशी साठी संपर्क करत होता, परंतु कुणाचा ही संपर्क होत नव्हता.प्रत्येक जण दुःखाच्या वाटेवर प्रत्येक चिपळूणकराच्या काळजीची वाट बघत बसला होता.महापुराने ह्या चिपळूण शहराच्या काही नागरिकांचे व मुख्या जाणवरांचे श्वास कोंढले आणि जीव ही देहातुनी नाहीसे केले.खरच खूप वाईट क्षण आज चिपळूणकरांवरती आला.अधिच अखंड देशात कोरोनाच्या रोगाची महामारी चालू होती त्यात ही काळजी घेऊन चालेले सुखाचे क्षण ह्या महापुराने दुःखाचे रूप चिपळूणकरांच्या वाटेला आणून सोडले.चिपळूण शहर हे बाजारपेठ म्हणून ओळखत असलेले आज पूर्णपणे महापुराने कचऱ्याने व चिखलाने गजबलेले चिपळूण झाले होते.शेवटी उरल्या त्या मनात आठवणी ..
"काळाने ही घातला घाला
राहले नाही काही,
रडून आता थकले डोळे
रडण्याला अश्रु उरले नाही",,...
"हे ही दिवस जातील
समजवावे लागेल मना,
तोवर ईश्वरा शक्ती दे
उध्वस्त झालेल्या जना".....
