अंतयात्रा
अंतयात्रा


दुर्गापूर मध्ये राहणारे एक पती-पत्नी होते असा त्यांचा छोटा आणि सुखी परिवार होता.आणि त्यांचा दोन वर्षांचा एक मुलगा होता. परिवार खूप व्यवस्थित चाललं होतं. अचानक एक दिवस पतीचा देहावसान झालं. स्त्री एकटी झाली. तो मुलगा एकटा पडला. धाडसाने त्याच्या आईने आपल्या मुलाचं संगोपन केलं. प्रत्येक वेळी तिने त्याला सांगितलं, बाळा तुला खूप मोठं व्हायचं आहे. तुला तुझ्या वडिलांपेक्षा मोठा इंजिनियर व्हायचं आहे. तुला यश मिळालेच पाहिजे. दिवसरात्र एकच ध्यास की माझा मुलगा इंजिनीअर झाला पाहिजे. दिवस-रात्र कष्ट करून, आईने मुला ला शिक्षणासाठी हवं ते पुरवलं. आई मुलाकडून अभ्यास एका अभ्यास करून घेत होती. वडिलांनंतर त्या सगळ्या जबाबदाऱ्या एकटे आईने पूर्ण केल्या. घर संभाळत मुलाचं शिक्षण केलं.मुलगा हळूहळू मोठा होत गेला. खूप हुशार मुलगा. दहावी पास झाला. त्याला सुयश प्राप्त झालं. चांगल्या प्रकारच्या स्कॉलरशिप मुलाला मिळत गेल्या. स्कॉलरशिप च्या आधारे मुलगा चांगल्या कॉलेज मध्ये शिकू लागला इंजिनिअरींग पास झाला. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला अमेरिकेत गेला. तिथे शिकला. खूप चांगली नोकरी त्याला मिळाली. चांगला पगार, मोठा बंगला, सगळं होतं. कादंबरीतल्या सारखं! मुलाने तिथेच लग्न करून घेतलं. पण अचानक एके दिवशी त्या मुलाने आपल्या आईला पत्र लिहिलं, आई! आयुष्यभर तू माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेस. तुला म्हातारपण आल आहे. माझी इच्छा आहे की तू आपलं सगळं काही विकून अमेरिकत यावसं' माउलीला खूप आनंद झाला. त्याला किती काळजी आहे! पण आई जन्मभर भारतात राहिलेली. तिने पत्र लिहिलं की, बाळा! मला हे शक्य नाही. जन्म भारतात गेला. आपले सगळे नातेवाईक पण इथे आहेत. तू तिथे सुखी आहेस. यातच माझं सुख आहे. ' पण त्या मुलाला ते मानवलं नाही. तो म्हणाला मी पुढच्या महिन्यात भारतात येतो. आपलं सगळं विकू, आणि ते पैसे घेऊन अमेरिकेतच राहू. तुझ्या करता चांगले डॉक्टर्स उपलब्ध आहेत. गावात राहून ज्या फॅसिलिटी तुला मिळणार नाही त्या इथे तुला शहरात मिळतील, योग्य प्रकारे देखभाल होईल. सोबत आम्ही दोघी असूच कीअगदी काही काही काळजी करू नको. तू फक्त इकडे अमेरिकेत आमच्यासोबत राहिला तयार हो!
माउलीने विचार केला. ठीक आहे. मुलगा एवढा प्रेमाने काळजीने, म्हणतो आहे. माझंही वय झालं आहे. मी अंथरुणावर पडले तर माझं कोण करणार? ती हो म्हणाली, मुलगा आला तो मोठं प्रशस्त घर होतं, शेत, जमीन, दागिने, शेअर्स, फिक्स डिपॉझिट सगळं मोडलं. पंधरा दिवसात सगळं होऊन गेलं. दुर्गा पुरून मुलगा आणि आई अमेरिकेला जाण्याकरता कलकत्त्याच्या विमानतळावर आले. संध्याकाळी सात वाजता ते पोहोचले. मुलगा आईला म्हणाला, सामना जवळ बस. विमानाची वेळ बघतो. आणखी पण काही काम करून येतो. तीन तास गेले. मुलाचा पत्ताच नाही. ती माऊली बसली होती समोरच ऎर्वेस काउंटर होतं. एक मुलगी बसली होती. तिला वाटले तिथे काहीतरी वेगळं घडत आहे. तिने माऊलीला विचारू असे ठरवलं. मावशी तुम्ही इथे किती वेळ बसला आहात? तुमचे कोणी नातेवाईक विमानाने येणार आहेत का? माऊली म्हणाली नाही ग. मी माझ्या मुलाबरोबर अमेरिकेत जाते आहे. काही चौकशी करायला गेला आहे. तो आला की निघून जाईल. का येईल च हा विश्वास.
' कोणत्या फ्लाईटने तुमचा मुलगा जाणार होता? ' माउलीने तिला माहित होता तो तपशील सांगितला. मुलगी म्हणाली, तुम्ही बसा, जरा चौकशी करून येते. त्या हुशार मुलीने ऎर्वेस च्या काऊंटरवर जाऊन चौकशी केली. तेव्हा अशी बातमी मिळाली की विमान निघून गेल आहे. हे कळाल्यावर माऊलीचं तिथल्या तिथे भान हरपून गेलं झाली मुलीने सांगितलं की तुमचा मुलगा फ्लाईटने अमेरिकेला निघून गेला. हे कठोर शब्द ऐकताच, दुःख सहन न झाल्याने माऊलीने यातनेत डोळे कायमचे मिटले. सोबत समोर असलेल्या मुलीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी थांबू नाही शकले. ही सगळी वाईट बातमी कळून देखील आईच्या अंत्ययात्रेस मुलगा हजर झाला नाही. या बातमीने सारे शहर अगदी हळहळले. जो तो आपल्या मुलांच्या बाबतीत चिंतित होऊ लागला. नको त्या विचारांनी मुलांच्या आई-वडिलांच्या डोक्याला ग्रासून टाकलं. याचं दिवसाकरता माउलीने त्या मुलाला मोठं केलं होतं का?
आईने मुलाला सगळं शिकवलं. मोठा इंजिनियर केलं. पण मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, शिकवलेच नाही. फक्त माझं करियर, माझी नोकरी, पैसे एवढच शिकवलं. खरं काय आणि खोटं काही ते तिने मुलाला शिकवलच नाही. फिजिक्स शीक, इकॉनॉमिक्स शीक, केमिस्ट्री शिक, मॅथ शिक, सगळं काही शिक.
मुलांना त्यांची जीविका कमावता यावी यासाठी केवळ शिक्षण दिले जात नाही, तर कमावल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा यासाठी दिलं जात. सध्या तर उर्फटी प्रक्रिया आहे. आई-वडील म्हातारे झाले नंतर मुलं त्यांचा उपयोग संपला समजतात.
शिक्षणाची, नोकरीची गरज होती, तोपर्यंत मी आई-वडिलांचा जवळ राहिलो, मला चांगली नोकरी मिळाली, आई वडील यांच्या कष्टामुळे माझी चांगली बायको मुलं आहेत मानायलाच तयार नाहीयेत. म्हाताऱ्या आई-वडिलांकडे बघायला देखील, वेळ नाही. ते वृद्धआश्रमातच बरी ही शोकांतिका. शिक्षण तर हवच पण, शिक्षणाला संस्काराची जोड नसेल तर जीवन शेवटी नाही तर सुरुवातीपासूनच अंत्ययात्रा आहे आहे.