Kanchan Vispute Wagh

Tragedy

4.0  

Kanchan Vispute Wagh

Tragedy

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

2 mins
281


 मुंबईच्या चकमकीच्या दुनियेत बुडालेली मी गावाला जणू विसरूनच गेली होती. अचानक आलेल्या कोरोनाच्या आजारामुळे आणि सक्तीची रेल्वे बंद यामुळे रजा मिळालेली मी मुंबईतील दिवसान गणित वाढत्या रुग्णसंख्ये च्या भितीमुळे लॉकडाउन शितील होताच मी गावाकडे धाव घेतली.

  सुरुवातीचे दिवस मजेत गेले बाबांच्या कौतुकाने आणि सुगरण आजीचा हातचे जेवण खात-खात एकामागुन एक दिवस मजेत जात होते. रोज बाबांसोबत शेतात जाऊन शेतीत काम करणे आणि रिमझिम रिमझिम त्या पावसाचा मनसोक्त आनंद घेणे यात मी पूर्ण धुंद झाली होती.अचानक एके दिवशी निसर्गाने आपले रूद रूप दाखवले पावसाच्या रिमझिम रिमझिम सरींची जागा टपोऱ्या धारांनी घेऊन मुसळधार पाऊस सुरू झाला.

    एक-दोन दिवस सतत मुसळधार पाऊस कोसळत होता पावसाने आधी शेतावरील पिकांवर ताबा घेतला नंतर पावसाची स्वारी आमच्या घरापर्यंत येऊन टेकली घरात कमरेपर्यंत पाणी पाणी झाले घरातील सर्व वस्तू वाहून जाऊ लागल्या साठवणीतल्या अन्नधान्याची नासाडी झाली पावसाचा वाढता धोका बघून गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही डोंगरावर असलेल्या देवळात राहिला गेलो.

गावकऱ्यांनी एकमेकांना सहाय्य करून कशीबशी जेवणाची पुजारा च्या साह्याने सोय करत एकमेकांना धीर दिला. रात्र थंडीने कुडकुडत कशीबशी आम्ही घालवली पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता . सकाळ होताच पाऊसाने रजा घेतली मी धावत धावतच शेताकडे गेली. सर्व पिकांची नासाडी झाली होती महिनाभर केलेल्या कष्टाची आठवण होऊन मी मोठ्याने रडू लागले माझ्या मागून माझा बाबा धावतच माझ्या मागे आला आणि म्हणाला चल उठ लागू कामाला "जो थांबला तो संपला" वर्षभर शेतात राब राब राबून हाती काहीच न पडता हिमतीने कामाला लागलेला बाबा निसर्गावर न रागवता राबराब राबणारा ७० वर्षाचा बाबा मला माझ्या पेक्षाही जवान वाटला.

 अचानक ऑफिसमधून जॉइनिंग होण्याचा कॉल आल्यामुळे मी माझी स्वारी परत मुंबईला वळवली पण माझ्या मनातून दोन तीन दिवसाचा आठवणीतला पाऊस व पावसाचे कटू अनुभव आणि नव्याने उभे राहण्याची बाबाची तयारी जिद्द दोन्ही जात नव्हती. 


Rate this content
Log in

More marathi story from Kanchan Vispute Wagh

Similar marathi story from Tragedy