Nagesh Tayade

Tragedy

4.3  

Nagesh Tayade

Tragedy

आस मुलास भेटण्याची ..

आस मुलास भेटण्याची ..

3 mins
450


     ही कथा आहे एका व्यक्तीची जी, पैशाने श्रीमंत आहेच पण मनाने ही श्रीमंत आहे. भाऊसाहेब नावाने गावात ओळखला जात होता. व्यवसायाने शेतकरी हा बागायत शेती करून वडिलोपार्जित शेती व्यवसाय चालवत होता.

     लग्न होऊन २ वर्षच झाली होती, अजून मूल झाले नव्हते. भाऊसाहेब आणि त्यांची पत्नी यांचा परिवार पूर्ण होण्यासाठी आस होतो ती, एक मुलाची आणि ५ वर्षानंतर तो दिवस आलाच त्यांना एक सुंदर गोंडस मूल झाले. कुटुंब पूर्ण झाले होते. खुप वर्षांनी घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या बाळाचे खुप लाड करत, त्याचे सर्वच हट्ट पुरवल्या जात होते. 

      मात्र हे सुखाचे दिवस जास्त काळ टिकले नाही , भाऊसाहेबांची पत्नी यांना अर्धांग वायूचा झटका आला आणि त्यांचे उजवी बाजूचे शरीर संपूर्ण निकानी झाले.

      बायकोचा उपचार आणि मुलाचे पालन करताना भाऊसाहेबांना खुप अडचणी येत होत्या पण त्यांनी कधीच ते जाणवू दिले नाही. दिवस रात्र आपल्या बायकोची सेवा करून तिचा इलाज करत होता. आणि लहान मुलाला सांभाळत होते.

       काही वर्ष असेच निघून गेले, मुलगा आता मोठा झाला होता. पण बायकोच्या ताब्यातील काही सुधारणा होत नव्हती. मुलाच्या शिक्षणासाठी भाऊसाहेबांनी मोठ्यातल्या मोठ्या कॉलेज मध्ये एडमिशन घेऊन दिले. मुलगा आता कॉलेजला जात होता. आणि भाऊसाहेब आपल्या बागायती शेती सांभाळून बायकोचा इलाज करत होता. 

       मुलाचे शिक्षण पूर्ण झाले, भाऊसाहेबांना आता वाटत होते की , आपल्या मुलाने आपला व्यवसाय सांभाळावा. सर्व जबाबदारी सांभाळावी पण असे काही झाले नाही. ज्या मुलाचा लाड करताना ,हट्ट पुरविताना भाऊसाहेब आणि त्यांच्या पत्नीने कधीच मागे पाहिले नाही तो मुलगा आज आई वडिलांना सोडून विदेशात जाऊन काम करण्याचे ठरवत होता.

       भाऊसाहेबांच्या खुप समजावण्याने ही, मुलाचा हट्ट काही जात नव्हता , शेवटी भाऊसाहेबांनी आणि त्यांच्या पत्नीने त्याला विदेशात जाण्यास परवानगी दिली.

मुलगा परदेशात जाऊन आपल नाव वाढवेल , आणि येईल परत आपल्या जवळ याच आशेवर भाऊसाहेब आणि त्याची पत्नी जगात होती.

        एक दोन वर्ष झाली तरी मुलगा काही परत आलाच नाही आणि नाही त्याचा काही निरोप आला, मुलाच्या आठवणीत ती माय माऊली देवाघरी गेली. पण मुलगा काही आलाच नाही. भाऊसाहेब आता एकटेच पडले होते. त्यांच्या जगण्याची पण एकच आस लागली होती मुलगा कधी तरी परत येईल.

        दिवसामागून दिवस जात होते. भाऊसाहेब बायकोच्या आठवणीत आणि मुलाच्या आठवणीत व्यवसायाकडे दुर्लक्ष करत होते. हळू हळू एक दिवस असा आला की त्यांच्या जवळ असलेले सर्व संपत्ती संपली आणि त्यांनी त्यांचे बागायती शेती पण कौडीमोल भावात विकून टाकली. 

         मिळालेल्या पैशातून भाऊसाहेबांनी जणू अनाथांचा बापच बनुन बाल आश्रमाला दान करून टाकले. आणि आता मुलगा येईलच की, नाही याची खात्री नव्हती आणि बायकोच्या जाण्याने मनातून निराश होऊन जगणं कठीण झाले होते. म्हणून गाव सोडून निघून गेला होता.

          काही वर्षांनंतर गावाच्या वेशीजवळ एक फाटक्या कपड्यात, तळपायाला भेगा पडलेला माणूस झोपलेला होता. दोन तीन दिवस झाले तरी हा माणूस जागेवरून उठात नव्हता, काही गावकऱ्यांनी त्यांच्या जवळ जाऊन पाहिले असता तो मरण पावला आहे हे कळलं होत. 

           गावामध्ये सर्व ठिकाणी याची चर्चा सुरू झाली होती आणि त्या पाहण्यास तिथे गर्दी होत होती. गर्दीतल्या एक गावकऱ्यांनी त्या माणसाला ओलखले , तो दुसरा तिसरा कोणी नसून बायको आणि मुलाच्या आठवणीत जगणार, गावात चांगला नाव असणारा भाऊसाहेबांच होत.

           आयुष्याचं शेवट अशा पद्धतीने होईल हे कधीच वाटलं नव्हतं. बायको आणि मुलगा यांच्याच आठवणीत आज हा बाप आणि नवरा अनाथ होऊनच देवा घरी गेला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy