STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy

4  

akshata alias shubhada Tirodkar

Fantasy

आर्ची

आर्ची

2 mins
355

लालपरी दिमाखात बस स्थानकांवर उभी होती आर्चीने बस चा बोर्ड पहिला आणि सरळ आत शिरली तिनी खिडकी जवळची सीट पकडली एका बाजूला सामान आणि खिडकी शेजारी ती बसली आर्ची तशी बिंदास मुलगी तिनी बॅग मधून एअर फोन काढला आणि मोबाईल वर संगीत ऐकण्यात मंत्र मुग्ध झाली

थोड्याच वेळात एक बाई बस मध्ये चढली

"ये पोरी सामान उचल आणि खाली ठेव "

"काय आजकालच्या पोरी पुढ्यातलं ऐकू येत नाही "

आर्ची मात्र आपल्यातच मग्न होती त्या बाईचा आवाज ऐकून कंडक्टर आला

'काय झालं "

"अहो कंडक्टर भाऊ सामान सीट वर मग आम्ही कुठे बसायचं "?

"अहो मॅडम अहो "

"काय आहे "

"सामान खाली ठेवा ह्या बाईना बसू द्या "

"मी माझं सामान खाली नाही ठेवणार "

"अगं ये पोरी बस काय तू विकत घेतलीस "?

"होय हि माझी सीट आहे आणि मी पैसे देणार "

"हो का आणि आम्ही काय फुकट जाणार "

"हो शांत वाह काय चालाय "?

"मॅडम त्यांना सीट "

"बरं बस "

बस सुटली आणि प्रवास सुरु झाला एक एक करून बस रिकामी होऊ लागली. मध्येच पाठी मागे बसलेला एक माणूस आला आणि आर्ची शेजारी बाई बसलेली तिच्यावर बंदूक रोखली ती बाई दागिन्याने मढलेली होती.

"ये सगळे दागिने काडून दे "

"काय "?

"काय रे तिचे दागिने तुला कशाला हवे "

"ये तू गप्प बस "

"ये अर्चिला गप्प बस म्हणतो"

आर्ची उठली आणि सरळ त्याच्या कानशिलात लावली

"काय रे काय समजलास तू मला.. आर्ची आहे मी! गप्प गुमान बस मधून उत्तर हो कंडक्टर भाऊ बस थांबवा "

कंडक्टर ने बस थांबवली तो चोर गप्प गुमान उतरला

ये पाहतोस काय चल फूट कि देऊ एक मुक्का "

त्याला तिथे उतरतून बस निघाली सगळ्यांनी आर्ची चे कौतुक केले

"वाह पोरी माझे जीव वाचवलेस पोरी "

"असू द्या हो मावशी असल्या ना असलाच धडा शिकवायचा असतो "

"पोरी मी तुला वाईट समजले पण तू तर फणसासारखी वरून कडक पण आतून प्रेमळ "

आर्ची आहे मी आर्ची रफ अँड टफ

म्हणजे

इंग्लिश मध्ये नाही समजलं कंडक्टर भाऊ मराठी मध्ये सांगू

" चला उशीर होतोय "



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Fantasy