आई
आई
आज मला तुझी खूप आठवण येत आहे ग आई. मला आठवते ग अजूनही तुझी शिकवण, तु नेहमी म्हणायचीस अनोळखी माणसाला बोलु नये,
कुठे जाऊ नये. तु असे का सांगायचीस ते आज मला कळले, जेव्हा मी तुझा हात सोडून दुसऱ्या मुलाचा हात धरला. आई तु माझी किती काळजी करायची हे आज मला कळले. पण आता खूप उशीर झाला न , आई तूझ्या एवढी माया माझ्या वर कुणीच करत नाही ग. तुझा हात सोडला आणि या स्वार्थी जगात हरवून गेले ग मी. मला तुझी खूप आठवण येते ग...
मी खूप अभागी जीवन जगत आहे ग तू असतानाही तूझ्या मायेच्या सावलीला पारखे झाले आहे खूप पोरक्या सारखे वाटते ग... तुझ्याएवढी काळजी घेणार माझं कुणीच नाही ग. मी प्रेमात आंधळे होऊन निघून गेले आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा वेळ निघून गेलेली होती. आयुष्याला जर रिवर्स गेर असता ना तर मी नक्कीच माझी चूक दुरुस्त केली असती आणि तुझं मन मी कधीच दुखावले नसते. पण मला आता एकही संधी मिळणार नाही मला माहित आहे. पण वाट पाहीन ग आई.. तू परत मला कधीतरी पहिल्यासारखी मिठीत घेशील का ग आई. मी देवाजवळ एकच प्रार्थना रोज करते ग माझा पुन्हा तुझ्यापोटी जन्म होऊ दे या जन्मात मी तुझे उपकार फेडले नाही पण पुढल्या जन्मी नक्की फेडेल ग मला एक संधी हवी आहे. मिळेल का मला एक संधी.
मला तुझी खूप आठवण येते ग तूझ्या प्रेमासमोर जगात कुणाचंच प्रेम खरं नाही. मला माफ करशील ना ग , पुन्हा मला मायेने मिठीत घेशील ना ग आई...
